आता लालूला कळेल कि बिहारच्या मुलांची आय क़्यु महाराष्ट्राच्या मुलांपेक्षा जास्त का आहे ...... हे साले त्यांचे एजंट बसले आहेत ना त्यांना कामावर चीटकवायला ........
खालील माहिती सकाळ ह्या वृत्तपत्राच्या सौजन्याने .....
आपला विनोद
मुंबई - रेल्वे भरती मंडळाच्या अध्यक्षांच्या मुलासह आठ जणांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी पैशांसाठी प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी अटक केली. या कारवाईमुळे रेल्वे भरती प्रक्रियेतील कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आणल्याचा दावा सीबीआयने केला.
मुंबईतील रेल्वे भरती मंडळाचे अध्यक्ष एस. एम. शर्मा यांचा मुलगा विवेक भारद्वाज शर्मा याचा या गैरव्यवहारात समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सीबीआयने मुंबई, बंगळूर, रायपूर, कोलकाता आणि हैदराबादमध्ये एकाचवेळी छापे टाकले.
असिस्टंट लोको पायलट आणि सहायक स्थानक अधिकारी या पदांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका कोट्यवधी रुपयांना विकण्यात आल्याचे सीबीआयचे प्रवक्ते हर्ष भाल यांनी सांगितले. निवडीसाठी प्रत्येक उमेदवाराने साडे तीन लाख रुपये दिले होते. परीक्षेच्या एक दिवस अगोदर संबंधित विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment