Thursday, June 10, 2010

विबग्योर शाळेची मुजोरी

मित्रानो,

कालच स्टार माझा वर वीबग्योर शाळे ची बातमी बघितली. ह्या शाळेने पालकांनी फी वाढीबद्दल आंदोलन केले म्हणून एका मुलीला काहीही कारण न देता शाळेतून काढून टाकले. हे म्हणजे अतीच झाले आणि ही तर सरळ सरळ दादागिरी आहे. काल त्या शाळेची कोणी राठोड म्हणून प्रवक्ता आहेत, त्या सांगत होत्या की महाराष्ट्र शासनाचे कोणतेही नियम आम्हाला लागू होत नाही कारण वीबग्योर हे प्रायवेट स्कूल आहे. हा सरळ सरळ अन्याय आहे आणि आपण ह्या अन्याय विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे.

खाली वीबग्योर शाळेचा पत्ता आणि इमेल आय डी दिला आहे .... मी आजच त्यांना इमेल पाठवत आहे कि त्यांनी अधिश्री ह्या पाल्या वर अन्याय केलं आहे आणि तिला परत शाळेत घेतलं पाहिजे

ही बातमी तुम्ही खालील लिंक वर देखील वाचू शकता


VIBGYOR High International School
Motilal Nagar-1
Srirang Sabde Marg
Off. Link Road, Goregaon (W)
Mumbai – 400 104
Phone: (022)-39577070
Email:
helpdesk.mumbai10@vibgyorhigh.com

विनोद


विबग्योर शाळेची मुजोरी

फी वाढी विरोधात बोलाल तर खबरदार, तुमच्या पाल्याला शाळेतुन सरळ काढुन टाकण्यात येईल, असा पवित्रा घेतलाय मुंबईतल्या एका खाजगी विबग्योर नावाच्या शाळेनं.

अधीश्री गोपालक्रिश्नन असं या मुलीचं नाव आहे, शाळा सुरु व्हायच्या फक्त १ दिवस आधी तिला शाळेनं पत्र पाठवुन तिला शाळेतुन काढून टाकण्यात आलंय असं कळवलं. आता तिचे आईवडील सरकार दरबारी जाऊन तिला न्याय मिळवुन देण्याची मागणी करतायत.


अधीश्रीने मुख्यन्याधीशांकडे दाद मागितली

निरागस अधीश्री आपल्या आईवडीलांबरोबर सरकार दरबारी खेटे घालतेय आपल्याल न्याय मागण्यासाठी. आज तर ती सरळ मुख्य न्यायाधीशांना भेटायला सरळ मुंबई उच्च न्यायालयात गेली, तिनं न्यायाची मागणी करणार पत्र दिलं. चिफ जस्टीस तर भेटले नाहीत पण ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचतं केलं जाईल आणि अधीश्री न्याय मिळेल असं तिला वाटतंय.adhishree vibgour.jpg

काय कारण असेल अधीश्रीला शाळेतून काढून टाकण्याचं?
अधीश्री कुठलीही चुक नसताना तिच्या शाळेनं सरळ तिला शाळेतुन काढून टाकलं. तेही तिचं ऍडमिशन झालं असताना, तिच्याकडुन शाळेनं ३३ हजार रुपये इतकी फी घेतली आहे. शाळेनं तिला २०१०-२०११ या शैक्षणिक वर्षासाठी पुस्तक दिली असताना. अधीश्रीच्या आईनं फीवाढीविरोधात शाळेविरुद्ध आंदोलनं केलं होतं.

शाळेनं ही कारणं दिलेली ही वागणूक योग्य आहे का?

फीवाढी विरोधात अधीश्रीच्या आईबरोबर अनेक पालकांनीही फीवाढीविराधात आंदोलन केलं होत आणि कोर्टात याचिकाही दाखल केली होती. पण याचा फटका फक्त अधीश्रीलाच का? अशी विचारणा करणाऱ्या पालकांना मात्र तिला शाळेत !ऍडमिशन कोणत्याही अटीवर दिलं जाणार नाही असंच सांगितलं जातंय.

राज्य सरकार काहीच करू शकत नाही?

अगदी महाराष्ट्र सरकारनं हस्तक्षेप केला तरी इतकंच नाही तर शाळेनं अधीश्रीला याआधीच काढुन टाकलं नाही यासाठी अधीश्रीच्या पालकांनी शाळेचे आभार मानायला हवे असही विबग्योरच्या प्रवक्त्या हरप्रितकौर राठोड यांनी सांगितलंय.

मुजोर शाळा
अर्थ असाच होतो की कुणाचाही शिक्षणाचा अधिकार काढुन घेण्याइतकी ही शाळा मुजोर आहे.. जिथं शासन मुलींना शिक्षण मिळावं यासाठी नवनवीन कायदे करतंय आणि इथे ही शाळा प्रशासन मात्र आपल्याला हे नियम लागु करू शकत नाहीत असा उद्धटपणा दाखवतेय.







2 comments:

  1. विनोदजी
    या हलकट मनोवत्तीला ताबडतोब लगाम घातलाच पाहिजे नाहीतर हे लोकं असेच डोक्यावर बसतील. मुलींना मेंदी लावणे, टीकली लावणे सगळ्यावर बंदी आहेच. आमची संस्कृती नामशष करण्याचा हा पध्दत शिर प्रयत्न आहे या शाळांचा.
    माझी काही मदत होऊ शकत असेल तर अवश्य सांगा!

    ReplyDelete
  2. महेंद्रजी

    मी सध्या तरी त्यांना इमेल पाठवला आहे. खरं म्हणजे ह्यांच्या विरुद्ध आंदोलन झालं पाहिजे. मी मनसे च्या वेब साईट वर सूचना लिहितो. ह्या गोष्टींसाठी आपण काही करू शकत नाही (इमेल हा फारच पुळचट प्रकार झाला) ह्याच वैषम्य वाटतं.

    विनोद

    ReplyDelete