काल रात्रीच्या बातम्या बघितल्या आणि नंतर आज सकाळचे वर्त्तमान पत्र वाचली आणि आमचं तर डोकच फ़िरलं। आम्हाला राहुल गांधीन बद्दल आणि त्यांच्या प्रगल्भते बद्दल आशा होती पण त्यानीं ती पर धुळीला मिळवली । त्यांच्या म्हणन्या प्रमाने मराठी माणुस मुंबई च रक्षण करू शकत नाही आणि आम्हाला यु पी , बिहारच्या लोकांची मदत घ्यावी लगते । हा तर २६/११ च्या लढ्यात शहीद झालेल्या लोकांचा अपमान आहे , ह्या लढ्यात असख्यं स्थानिक लोकानी प्रशासनास मदत केली त्यांचा अपमान आहे आणि हा उभय महाराष्ट्राचा अपमान आहे। त्यांनी जर इतिहास तपासून पहिला तर त्यांना कळेल की ह्या महाराष्ट्राने आणि सह्याद्रिने दिल्लीचे तख्त राखले आहे आणि परकीय आक्रमनाला आपल्या पराक्रमाने परतवून लावले आहे । जर NSG कमांडो चा बेसच दिल्लीला आहे आणि राज्य स्तरावर जर अशी यंत्रणा नाही तर महाराष्ट्रातील पोलिसानां किवां राज्य शासनाला दिल्लीची मदत घ्यावीच लागणार त्यात प्रांतवाद आला कुठे? हे तर केंद्र शासनाचा अपयश आहे की त्यानी राज्य स्तरावर अशी यंत्रणा उभी नाही केली आणि केंद्रात , राज्यात तर ह्यांचच सरकार आहे । राहुल गांधीनी उभ्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे हे निच्छित आणि हे आम्ही विसरणार नाही ।
म टा च्या सौजन्याने
2 Feb 2010, 0115 hrs IST
२६/११च्या दहशतवाद्यांना कंठस्नान कुणी घातले? बिहार, यूपीच्या एनएसजी कमांडोंनी! - राहुल
शिवसेना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील वादाने 'मराठी मुंबई'चा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला असताना काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी त्यात उडी घेतली। '२६/११ रोजी मुंबईवर भीषण हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान कुणी घातले? बिहार, उत्तर प्रदेशच्या एनएसजी कमांडोंनी. त्यामुळे दहशतवाद्यांशी लढायचे तर बिहारींना मुंबईतच राहू दे' असे धक्कादायक उद्गार राहुल यांनी बिहारमध्ये काढले.
एनएसयूआयच्या सदस्यांशी राहुल यांनी सोमवारी येथे संवाद साधला। त्यादरम्यान मुंबई व मराठीचा मुद्दा उपस्थित झाला असता राहुल गांधींची गाडी अचानक २६/११वर घसरली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सातत्याने बिहारींना मुंबईतून हाकलून द्या, अशी भाषा करीत असतात. मुंबईवरील हल्ल्याचेवेळी छातीचा कोट करून बिहार, उत्तर प्रदेश व देशाच्या इतर राज्यांतील एनएसजी कमांडोंनी मुंबईला, मुंबईकरांना वाचवले. त्यावेळी 'बिहारींना हाकला' अशी मागणी राज यांनी केली नाही, असे उद्गार राहुल यांनी काढले. बिहारमध्ये या वषीर् विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या डोळ्यांसमोर ठेवून राहुल यांनी हे वक्तव्य केल्याचे मानले जात असले तरी मुंबई-महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत......... ......
आथिर्क राजधानी कुणाची? उत्तरांना जोर
मराठी मुंबईच्या मुद्द्यावर सोमवारी राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत होत्या। 'मुंबई सगळ्यांची आहे. मुंबईतील उत्तर प्रदेशींना संघाचे स्वयंसेवक संरक्षण देतील' या संघाच्या पवित्र्याचा शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'संघाने मुंबईची उठाठेव करू नये' असे सांगत चांगलाच समाचार घेतला; तर 'जन्माने मराठी असलेल्यांनाच महाराष्ट्रात नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळाले पाहिजे' असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बजावले. भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी, देशाच्या कोनाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला देशभरात कोठेही जाण्याची मुभा आहे. भाजप आणि शिवसेनेत काही मुद्द्यांवर मतभेद असू शकतात, अशी भूमिका घेतली. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी संघाच्या या मुद्द्यावरील भूमिकेला मात्र पाठिंबा दिला. मुंबईत राहण्याचा, काम करण्याचा प्रत्येक भारतीयाला अधिकार आहे, अशी भूमिका गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मांडली. तर मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना आणि मनसेने कायदा हातात घेऊ नये, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment