Friday, February 26, 2010

२७ फेब्रुवरी- मराठी भाषा दिन

मनसे च्या संकेत स्थळाच्या सौजन्याने .....
कृपया अधिक माहिती साठी ह्या संकेत स्थळाला भेट दया ,
https://www.manase.org/mbdivas/index.html

कवी कुसुमाग्रज उर्फ वि।वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा दिवस !

कुसुमाग्रजांना मराठी साहित्यातील योगदानाबद्दल १९८८-८९ मध्ये भारतातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला। असा बहुमान मिळवणारे-वि.स.खांडेकर यांच्यानंतरचे -ते दुसरे मराठी साहित्यिक होत. कुसुमाग्रज मुंबई येथे आयोजित पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे (१९८९) अध्यक्ष होते. या परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना कुसुमाग्रजांनी मराठी भाषेच्या चिंताजनक स्थितीविषयी आणि शासनाच्या अनास्थेविषयी भाष्य केले होते. ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारतानाही त्यांनी मराठी भाषेविषयीचे विचार व्यक्त केले होते. ‘माय मराठी मरते इकडे, परकीचे पद चेपू नका’, ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतिचाही दिवा विझे; गुलामभाषिक होऊनी अपुल्या प्रगतीचे शिर कापू नका’ या त्यांच्या काव्यपंक्तींतून त्यांचे मराठी-प्रेम दिसून येते.कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदान व त्यांचे भाषा-प्रेम यांचा विचार करता जागतिक मराठी परिषदेच्या वतीने त्यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवरी) ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. मराठीविषयीचा अभिमान, भाषा-अभ्यास-संशोधन-संरक्षण व भाषाविकास या घटकांबद्दलची जाणीवजागृती हा यामागचा उद्देश !काही वर्षे काही सांस्कृतिक संस्थाच हा दिवस साजरा करत होत्या. आता या निमित्त उपक्रम-कार्यक्रम करणार्‍या संस्था-व्यक्तींची संख्या वाढत आहे. प्रत्येक मराठी माणसाने या सोहळ्यात-कार्यक्रम-उपक्रमात यथाशक्ति सहभागी झालेच पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही ‘हा’ दिवस दिमाखात साजरा करण्याचे ठरवले आहे.

1 comment:

  1. मराठी भाषा दिनाला उत्सवासारखे महत्व आले ते केवळ मनसेमुळे.राजसाहेब ठाकरे झिंदाबाद.

    ReplyDelete