Friday, November 4, 2011

... तर, महाराष्ट्रात दंगली पेटतील!

खालील बातमी म टा च्या सौजन्याने



मराठी माणसाच्या विरोधात उत्तर भारतीयांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची आणखी विधाने येत राहिली तर माझा मराठी माणूस खवळेल आणि मग महाराष्ट्रात दंगली पेटतील. मात्र याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. आपण पोकळ धमक्या देत नसून मराठी माणसाला भडकाविणाऱ्या नेत्यांना बेडरूमच्या बाहेर पडणे मुश्किल करून टाकू, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे खा. संजय निरुपम, मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह तसेच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. या सर्व नेत्यांना मराठी नेत्यांनीच आश्रय दिला. निरुपम हा उद्धवच्या गळ्यातला ताईत होता. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच छटपूजा गिरगाव चौपाटीवर नेऊन तिचे स्वरूप मोठे करण्यात आले. कृपाशंकरच्या घरी उद्धव ठाकरे जातात आणि छटपूजेचे स्वागत करणारे शिवसेनेचे होर्डिंगजही लागतात, असा टोलाही लगावला.

उत्तर भारतीय नेत्यांनी वेड्यावाकड्या गोष्टी करून दाखवाव्यात, असे माझे त्यांना आव्हान आहे, मग ते कसे घराबाहेर पडतात ते मी पाहीन, असा इशारा त्यांनी दिला. माझ्याविरोधात आग ओकणाऱ्या हिंदी चॅनेल्सवर माझी करडी नजर आहे. मी आग ओकतो आणि हे नेते काय मध ओकतात का? माझ्या वाक्यांचा हिंदी चॅनेल्सवाल्यांनी विपर्यास केल्यास त्यांचे कॅमेरे महाराष्ट्रात फिरणार नाहीत, याचाही बंदोबस्त मी करेन, असे ते म्हणाले.


1 comment:

  1. दंगली राडा करणे यातून बाहेर पड़ा नाही तर एक दिवस महाराष्ट्र भारतात खालून पहिला नंबर होइल . भिहर च्या मुख्यमंत्र्या कड़े पहा . कर्नाटक चा अगरबत्ती उद्योग बिहारात वाढवला.
    http://lokprabha.loksatta.com/15738/Lokprabha/11-11-2011#p=page:n=19:z=2
    नुसता आरडओरड दमबाजी, भाषेचा दुराभिमान करत भाषेचे राजकारण करून तरुणांना बहाकावण्या बरोबर गुप्त ब्लू प्रिंट चे गाजर दाखवत मोकाट सुटण्या पेक्षा बिहारच्या नितीश कुमारचा आदर्श घ्या. IT उद्योगा मुळे बंगलोर म्हैसूर चा अगरबत्ती उद्योग कामगाराच्या वाढत्या वेतनमानाच्या मागणी मुळे अडचणीत आला . नितीशकुमारांनी हि बाब हेरून आपले तज्ञ अध...िकारी म्हैसूर ला या व्यवसायाच्या अभ्यासासाठी आणि हा व्यवसाय बिहारला खेचून आणण्यासाठी पाठवले .आणि हा उद्योग बिहार मध्ये उभारला . अगरबत्ती उद्योग हा परंपरेने म्हैसूरचा म्हणून ओळखला जातो. पण गेल्या काही वर्षांत टप्प्याटप्प्याने कर्नाटकातला हा उद्योग बिहारमध्ये स्थलांतरित झाला. अगरबत्ती बनवण्यासाठी आवश्यक कोळसा मिश्रित मसाला, वळलेल्या बांबूच्या काडय़ा आता बिहारमधून येतात. आज देश-विदेशातल्या अगरबत्ती काडीची मोठी गरज बिहार भागवतो आहे. या कुटिरोद्योगाच्या आधारे बिहारमधल्या गया, मुंगेर, भागलपूर या भागांतली सहा लाख कुटुंबं आणि ५०० च्यावर व्यापारी या उद्योगावर उपजीविका करीत आहेत.

    ReplyDelete