Thursday, November 17, 2011

आयत्या बिळावर नागोबा ....

कल्याण येथे मनसे चे आमदार श्री प्रकाश भोईर ह्यांच्या प्रयत्नातून एक सुंदर असे उद्यान साकार होत आहे. शिवसेनेचा ह्या उद्यानाशी काडीमात्र संबंध नसताना स्थानिक नगरसेवकांनी ह्या उद्यानाचे उद्घाटन कार्याध्याक्ष्य उद्धव ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्याचा डाव आखला तो मनसे च्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला ...... महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार श्री प्रकाश भोईर ह्यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार होत आहे आणि त्यांनी स्वता ह्या उद्यानासाठी अथक परिश्रम केले आहेत असे असताना शिवसेनेने ह्या उद्यानाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तर मनसैनिक गप्पं कशे बसतील?

वाचा लोकसत्ता मधील बातमी

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=194200:2011-11-16-18-37-13&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3


कल्याण, १६ नोव्हेंबर / प्रतिनिधी
altकल्याणमधील ठाणकरपाडा येथील माता रमाबाई आंबेडकर उद्यानाची पाहणी करण्यासाठी काही क्षण आलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोरच आज संध्याकाळी उद्यानाच्या विकासाचे श्रेय घेण्यावरून मनसे सैनिक आणि शिवसैनिक समोरासमोर भिडले. दोन्ही गटांत झालेल्या बाचाबाची आणि धक्काबुक्कीत एका शिवसैनिकाने मनसेच्या नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांना अर्वाच्य शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याने वातावरण तप्त झाले.
आधारवाडी येथील सीमेंट रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकून उद्धव ठाकरे शिवसेनापुरस्कृत अपक्ष नगरसेवक मोहन उगले यांच्या ठाणकरपाडा प्रभागातील रमाबाई आंबेडकर उद्यानाची पाहणी करण्यासाठी आले; परंतु या उद्यानासाठी मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी लाखो रुपयांचा निधी उभारला आहे. त्यांची कामे येथे सुरू आहेत. या उद्यानात ठाकरे येणार म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष काका मांडले, सरचिटणीस इरफान शेख, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसैनिक मोठय़ा संख्येने उद्यानाच्या प्रवेशद्वारावर जमले होते.
गेल्या आठवडय़ात मोहन उगले यांनी उद्यानातील ध्यानधारणा केंद्राचे उद्घाटन केले होते. त्यामुळे शिवसैनिक आणि मनसे सैनिकांमध्ये धुसफूस सुरू होती. उद्यानाच्या ठिकाणी वातावरण तंग बनले होते. पोलीस बंदोबस्त येथे होता.
उद्धव ठाकरे येण्यापूर्वी आमदार एकनाथ शिंदे, महापौर वैजयंती गुजर, खासदार आनंद परांजपे, राजेंद्र देवळेकर हे उद्यानात प्रवेश करीत असताना शिवसैनिक मोठय़ा संख्येने घोषणाबाजी करीत उद्यानात घुसले. त्यापाठोपाठ मनसे कार्यकर्तेही घुसले. घोषणाबाजी सुरू झाली. उद्धव ठाकरे उद्यानाची पाहणी करीत असतानाच शिवसैनिक आणि मनसे सैनिक समोरासमोर भिडले. बाचाबाची, धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीत एका शिवसैनिकाने मनसे नगरसेविका डोईफोडे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. वातावरण अधिक चिघळू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी तेथून काढता पाय घेतला.
मनसेचे मंदार हळबे, इरफान शेख यांनी सांगितले, आमच्या नगरसेविकेला शिवसैनिकाने धक्काबुक्की करून तिला शिवीगाळ केली आहे. त्या शिवसैनिकाच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सुनील जोशींचे प्रकरण घडले त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी उगले हे अपक्ष नगरसेवक आहेत असे जाहीर केले होते. मग आज एका अपक्ष नगरसेवकाच्या मागे फरफटत उद्धव हे उद्यानाचे काम पूर्ण झाले नसताना का फरफटत आले, असा प्रश्न हळबे यांनी केला.

No comments:

Post a Comment