Tuesday, November 22, 2011

पवारसाहेबांच्या कृपने मिळालेलं मंत्रिपद सांभाळा : राज ठाकरे

खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने ...................


मुंबई : राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील वाकयुद्ध सुरूच आहे. "अजित पवार यांना शरद पवारसाहेबांच्या कृपेने मंत्रिपद मिळालंय, नामदारकी मिळालीय, त्यांनी ती नीट सांभाळावी, नको त्या भानगडी कशासाठी?", असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.

"पवार साहेबांचे शिक्षक बोललेच आहेत ना, पवार साहेब निवृत्त झाले तर राष्ट्रवादी कुणी सांभाळणार नाही". "दुसऱ्याकडे बोटं दाखवण्यापेक्षा याचा जास्त विचार करावा", अशा शब्दात राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केलीय.

ठाकरे-पवार क्रिकेट वॉर
टेस्ट क्रिकेटर सदू शिंदे हे माझे आजोबा होते, असं उत्तर अजित पवारांनी राज ठाकरेंना दिलं होतं. यावर उत्तर देतांना राज ठाकरे म्हणाले, मला वाटतं कुणाचेही वडिल आपले आजोबा कसे मानावेत? सदू शिंदे शरद पवारांचे ते सासरे.

हे अजित पवारांचे आजोबा कसे झाले? हे अजूनपर्यंत मला कळलं नाही. हे कुठची नाती बघतात? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

माझ्या चुलत-चुलत भावाची आई, तिची जी सख्खी बहिण होती, त्यांचे मिस्टर हे व्ही.शांताराम होते. मग मी काय 'प्रभात'वर हक्क सांगू का? असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय.

दारासिंह ही यांचे आजोबा असतील?

कदाचित मला माहित नाही, दारासिंहपण यांचे आजोबा असतील. कारण हे कोणत्यातरी कुस्ती संघटनेचे पण अध्यक्ष आहेत म्हणे, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केलीय.

राज ठाकरे पुढे बोलतांना म्हणाले, 'प्रश्न शेतीचा आहे, अजित पवार शेतकरी आहेत ना, या गोष्टींची सुरूवात त्यांनीच करायची, आम्ही विचारलंय का यांना?, हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत. तुम्ही कधी करणार म्हणून..'

No comments:

Post a Comment