Friday, November 4, 2011

राज, आझमी यांची वक्तव्ये तपासणार - आर आर आबा ...

आर आर आबांची ट्युब लाईट एवढ्या उशिरा का पेटते ??? जेव्हा निरुपम काही बोलला आणि नंतर कृपा शंकर जे काही बरळला तेव्हा त्यांची वक्तव्य त्यांनी तपासून का नाही बघितली ???? म्हणजे आम्ही त्यावर जर प्रतिक्रिया दिली तर लगेच आबा कामाला लागले ..... वा, आबा धन्य तुम्ही आणि तुमचे सरकार.

खालील बातमी म टा च्या सौजन्याने



छट पूजेच्या निमित्ताने आपल्या भाषण बाजीतून उत्तर भारतीय आणि मराठी अशा वादाला पुन्हा उकरून काढणा-या काँग्रेसचे संजय निरुपम, समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणं तपासण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री आर. आर पाटील यांनी शुक्रवारी दिले. त्यामुळे या भाषणबाजी करणा-या नेत्यांसमोर आता अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राजकीय स्वार्थासाठी भाषणबाजी करून समाजात फूट पाडणा-यांवर योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन आर. आर. पाटील यांनी दिले. त्यासाठी पुढील दोन दिवसात अबू आझमी, निरुपम आणि राज ठाकरे या तिघांची भाषणे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तपासात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आहेत.

महापालिकेच्या निवडणूका समोर असल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. अशावेळी प्रत्येक राजकीय पक्ष व्होटबँकेचे गणित समोर ठेऊनच भाषणबाजी करताना दिसत आहे. या आठवडाभरात छटपूजेच्या निमित्ताने जमलेल्या उत्तर भारतीयांसमोर मुंबई बंद करण्याची भाषा केली होती. तर अबू आझमी यांनी उत्तर भारतीयांविरोधात बोलणा-या एकएकाला बघून घेईन अशी भाषा केली होती. प्रत्युत्तरा दाखल राज ठाकरे यांनी ही भाषणबाजी बंद झाली नाही तर दंगली भडकतील, असा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यातील वातावर गढूळ होण्यास सुरुवात झाली आहे.


No comments:

Post a Comment