Wednesday, September 21, 2011

फटाके दिवाळीनंतर : राज

खालील लेख म टा च्या सौजन्याने ......


मी एक वाक्य बोललो तर एवढे झोंबले. त्यावर जे काही माझ्याबद्दल लिहून आलंय, ती त्यांची परंपरा आहे. मी आता फक्त एक टिचकी मारलीय, दिवाळीनंतर माझे फटाके सुरू होतील, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी उद्धव यांच्या विखारी टीकेवर दिलंय.

खडकवासला येथील मनसे आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर होणा-या पोटनिवडणुकीसंदर्भात मनसेची भूमिका मांडण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या टीकेसंदर्भात पत्रकारांनी छेडले असता त्यांनी थोडक्यात उत्तर दिलंय. काल शिवसेनेने पत्रक काढून राज ठाकरे यांना नावानीशी फुकट-राज ’, ‘ नमकहराम ’, ‘ बेईमान अशी भाषा केली होती.

खडकवासल्यातील भूमिकेपेक्षा राज उद्धव यांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याप्रमाणे आजच्या सामना मध्ये जे काही छापून आलंय, त्यावर तुमचे मत काय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राज म्हणाले, की आत्ताच यावर काहीही बोलणार नाही. माझे एक वाक्य एवढे झोंबले तर निवडणुकीच्या वेळी काय होईल त्याचा तुम्हीच विचार करा ’.

आज जे पत्र आलंय ते मी सेफ डिपॉझिटमध्ये ठेवलंय. योग्य वेळी बाहेर काढेन. खरं तर मी अजून काहीच बाहेर काढलेले नाही. कदाचित त्यांना नरेंद्र मोदी किंमत देत नाहीत म्हणून काय त्रागा असावा, अशी कोपरखळीही त्यांनी उद्धव यांना मारली.

खडकवासल्यातून मनसेचा उमेदवार नाही

मनसेचे आमदार रमेश वांजळे काय होते, आमच्यासाठी त्यांचे स्थान काय होते हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही. पण आज वांजळे वहिनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असे चाललंय. मी माझ्या परीने समजावायचा प्रयत्न केला. पण एकीकडे मी तुमच्या पक्षांचे मंगळसूत्र घातले आहे असे बोलायचे आणि दुसरीकडे वेगळी चर्चा करायची हे मला मान्य नाही. अशा एक-दोन आमदारांनी आमचे काही अडणार नाही. पण जे काही चाललंय ते नैतिकतेला धरून नाही. म्हणूनच त्यांना वागायचे तसे वागो, आम्ही आमच्या रमेश वांजळेंना श्रद्धांजली म्हणून आम्ही खडकवासल्यातून उमेदवार देणार नाही.

No comments:

Post a Comment