Thursday, September 15, 2011

मराठी मत्सराच्या 'क्रिएटिव्हिटी'वर राज यांचा हल्ला

टाटा डोकोमो ची जाहिरात बघितली तेव्हाच संताप आला ....... ह्या लोकांना मोलकरीण म्हणून नउ वारी साडी घातलेली महाराष्ट्रीयन बाईच दिसते का ??? आणि ह्या उप्पर तिला चोर म्हणून पण दाखवलं .... असल्या लोकांना पायतनाने तुडवले पाहिजे .....

आपला

विनोद शिरसाठ

खालील बातमी म टा च्या सौजन्याने ......


' जाहिराती वा चित्रपटांमध्ये मराठीजनांना कमी लेखणे वा त्यांचे पात्र जाणीवपूर्वक नोकराचे दाखविणे हे आता इंग्रजाळलेल्या क्रिएटिव्ह मंडळींनी थांबवावे. हा महाराष्ट्राचाच अपमानच असून असा प्रकार करणाऱ्यांची क्रिएटिव्हिटी बाहेर काढायला माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयार आहे', असा सज्जड इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

जाहिरात कंपन्यांमधील क्रिएटिव्ह मंडळींना उद्देशून राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिले असून त्यात हा इशारा दिला आहे. टाटा डोकोमो कंपनीने त्यांच्या जाहिरातीमध्ये मराठी मोलकरीण मोबाइल फोन चोरतानाचे दृश्य दाखविले आहे. टाटा कंपनीला याविषयी विचारले असता, त्यांना याची काहीच कल्पना नव्हती. त्यांनी ताबडतोब जाहिरीत मागे घेतल्याचेही आम्हाला कळविले आहे. त्यामुळे माझा आक्षेप त्यांच्याविषयी नसून जाहिरात बनविणाऱ्या आणि इंग्रजाळलेल्या, मराठी माणसाचा द्वेष करणाऱ्या वर्गाला आहे. मी स्वत: जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून व्यंगचित्रकला शिकलो आहे.

जाहिराती या उत्पादन विकण्यासाठी असतात. स्थानिक जनतेच्या भावना दुखावून त्यांना अपमानित करण्यासाठी नसतात, असे राज यांनी या पत्रात म्हटले आहे. आंदोलनाची शस्त्रे आम्ही म्यान केलेली नाहीत आणि करणारही नाही. यापुढे लेखी वा तोंडी भाषा बोलली जाणार नाही. मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या जाहिराती वा चित्रपट बनविणाऱ्यांशी माझे कार्यकर्ते क्रिएटिव्ह पद्धतीने व्यवहार करतील, असा इशाराही पत्राच्या शेवटी राज ठाकरे यांनी दिला आहे.

................................

विनोद आणि मत्सर यातील अंतर कळते

मराठी सोडून प्रामुख्याने हिंदी व इतर भाषांमधील चॅनेलवर ज्या मालिका दाखवतात किंवा चित्रपट निघतात त्यात मराठी माणसाचे अवमुल्यांकन करून त्याचे पात्र दाखविले जाते. विनोद आम्हालाही समजतो आणि जमतो. अनेक चित्रपटांत मराठी माणसाचे कॅरेक्टर विनोदाने दाखवले आहे. त्यावर आम्ही कधी आक्षेप घेतला नाही. मात्र विनोद आणि मत्सर यातले अंतर आम्हाला समजत नाही, असे समजून आपण महाराष्ट्रात राहू नका. हे यापुढे चालणार नाही.

No comments:

Post a Comment