Tuesday, August 17, 2010

'खळ्ळ खटाक'चा 'पिक्चर' अधिवेशनात

म टा च्या सौजन्याने


मल्टिप्लेक्समध्ये 'प्राइम टाइम'ला मराठी चित्रपटच दाखविले पाहिजे याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पुनरुच्चार केला. मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत काढण्यात आलेल्या सरकारी जीआरची अमलबजावणी व्हावी, यासाठी मनसे हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करेल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

मराठी चित्रपट निर्मात्यांसोबत एमआयजी क्लब येथे आयोजित केलेल्या बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. मराठी चित्रपट प्राइम टाइमला न दाखविणाऱ्या मल्टिप्लेक्सची मनसे कार्यर्कत्यांनी केलेल्या तोडफोडीचा दाखला देत मराठी चित्रपट दाखविले नाहीत तर काय होते हे आम्ही गेल्याच आठवड्यात दाखवून दिले आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मराठी चित्रपट सीरियल्ससारखे असतील तर ते कोण पाहणार? मराठी चित्रपट निर्मार्त्यांन नव्या संकल्पना, विषय हाताळावेत आणि मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे खेचून आणावे, असे आवाहन त्यांनी यावेळी मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना केलेे.

अनोखे पत्र

मराठी नाटक आणि चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मराठी बोलणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपण व्यक्तिश: पत्र लिहून चित्रपटगृहात जाऊन नाटक आणि सिनेमे पाहण्याबाबत आवाहन करणार असल्याचा मनोदय राज यांनी यावेळी व्यक्त केला.

4 comments:

  1. हे अगदी बरोबर आहे . कायदा केला म्हणून सिनेमा जरी लावला तरीही लोकांनी तो पहायला हवा , जर चित्रपटामधे काही दम नसेल तर कोण खर्च करून मराठी सिनेमा पहायला जाईल मल्टीप्लेक्स मधे.
    ह्या शिवाय खाण्याच्या गोश्टीचे अव्वाच्या सव्वा लावले जाणारे भाव कमी करायला हवे. तुम्ही जेंव्हा सिनेमाला जाता, तेंव्हा तुमच्या कडे दुसरा काहीच ऑप्शन नसतो म्हणुन तुम्हाला तिथेच मिळेल त्या भावाने खाद्य वस्तू विकत घ्याव्या लागतात. त्यावर पण काहीतरी बंधन असायला हवे असे वाटते.

    ReplyDelete
  2. चित्रपट चांगले यावेत म्हणजे आपोआप प्रेक्षक सिनेमा गृहात जातील त्याबरोबर त्यांना प्रदर्शित व्हायला व्यासपीठ देखील असावा म्हणजे दर्जात सुधारणा होईल. त्या दिवशी स्टार नाझा वर चर्चा सत्र होती आणि प्रसाद ज्या पोट तिडकीने बोलत होता (त्याच्या कडे पुरावे सुद्धा होते) त्यावरून तरी वाटतं कि हे मल्टीप्लेक्स वाले ह्यांची अडवणूक करीत आसनार. त्यादिवशी टाईम्स मध्ये कोणी मराठी समीक्षक म्हणत होता कि सकाळी चित्रपटाला जायला काय प्रॉब्लेम आहे? कधी कधी असं वाटत कि ह्या लोकांच्या कानाखालीच आवाज काढायला पाहिजे त्याशिवाय सुधारणार नाही

    ReplyDelete
  3. शेवटी प्रश्न कायद्याच्या अंमलबजावणीचा आहे. तीच जर होणार नसेल तर कितीही चांगला सिनेमा असला तरी तो बघणार कसा? यावरचं माझ पोस्ट वाचा http://prabhunarendra.blogspot.com/2010/08/blog-post_16.html

    ReplyDelete
  4. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद नरेंद्र,
    मी तुमचा लेख वाचला आणि मी तुमच्या मताशी सहमत आहे. कायद्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून तर त्यांना आठवण करून द्यावी लागते आणि सरकारला खळ फटाक चीच भाषा कळते त्याला काय करणार. अर्थात आंदोलनाचा मुल उद्देश नुसती आठवण करून देणे नाही तर ह्या प्रश्नाला हात घालून काहीतरी ठोस उपाय योजना करणे हा आहे आणि राज साहेबांकडून आमची तीच अपेक्षा आहे. (आणि ती राज साहेब पूर्ण करणार ह्याबद्दल कार्यकर्त्यांना विश्वास आहे)

    ReplyDelete