Tuesday, August 17, 2010

डोंबिवली शिधावाटप कार्यालयात 'अंधारच'

म टा च्या सौजन्याने


डोंबिवली पूवेर्तील शिधावाटप कार्यालयाचे उद्घाटन झाल्याला वर्ष उलटले, तरी अद्याप हे कार्यालय नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. या कार्यालयासाठीचे वीजमीटर महापालिकेने घ्यायचे की शिधावाटप विभागाने, असा वाद आहे. क्षुल्लक कारणामुळे शिधावाटपासारखे महत्वाचे कार्यालय सुरू होत नसल्याने मनसैनिकांनी या कार्यालयाचे सोमवारी वर्षश्राध्द घातले.

डोंबिवली पूवेर्कडील लाखो रहिवाशांना शिधावाटप कार्यालय नव्हते. त्यामुळे केडीएमसीने पूवेर्ला छत्रपती शिवाजी महाराज भाजीमंडईत शिधावाटप कार्यालयासाठी जागा दिली. तत्कालीन आमदार हरिश्चंद पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून १० लाख रुपये कार्यालयासाठी दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी मागील वषीर् १६ ऑगस्ट रोजी या कार्यालयाचे वाजतगाजत उद्घाटन झाले.

उद्घाटनानंतर या कार्यालयातून प्रत्यक्ष सेवा मिळण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. पण एक वर्ष उलटल्यावरही कार्यालयाचे दरवाजे उघडलेले नाही. ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याने पालिकेने वीजेचे मीटर घ्यावे, आम्ही बिल भरू असे शिधावाटप कार्यालयातील अधिकाऱ्यांचे, तर भाडेकरू असले तरी मीटर शिधावाटप विभागानेच घ्यावे असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

त्यामुळे मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यालयाचे वर्षश्राध्द घालून आपला संताप व्यक्त केला. श्राध्दाच्या वेळी होणारे सर्व विधी या कार्यालयात सकाळी करण्यात आले. आंदोलनाचा हा नवा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गदीर् उसळली होती. एवढा प्रकार झाल्यावर तरी हा प्रश्न मागीर् लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेने मीटर घेतल्यास आम्ही २४ तासांत कार्यालय सुरू करू असे शिधावाटप कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कदम यांना सांगितले. आंदोलनाच्या धसक्याने महापालिकेने मात्र मीटरच्या रकमेचा तातडीने भरणा केला. या कार्यालयासाठी आवश्यक असलेली पाण्याची जोडणीही येत्या २ दिवसांत दिली जाईल, अशी माहिती डोंबिवलीचे प्रभारी उपायुक्त सुभाष भुजबळ यांनी दिली.

No comments:

Post a Comment