Monday, August 9, 2010

मलेरियाबाबत पालिकेची दिशाभूलः राज ठाकरे

म टा च्या सौजन्याने

मलेरियाबाबत मुंबई महापालिका दिशाभूल करीत असून मृतांचे आकडेवारी चुकीची देत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केला. आरोग्याची जबाबदारीबाबत महापालिका आणि राज्य सरकार एकेमेकांकडे बोटं दाखवित आहेत, त्यामुळे आपणच यात लक्ष घातले पाहीजे, त्यामुळे प्रत्येकाना आजपासून स्वच्छता मोहिम हाती घ्या, असा आदेशही त्यांनी यावेळी मनसे पदाधिका-यांना दिला.

माटुंग्यातील यशवंतराव नाट्यगृहात मनसेतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे बोलत होते. या वेळी ते म्हणाले, देशभरात पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मुंबईतही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मुंबईत पावसाळ्यात रोगराईची परिस्थिती अशी झाली आहे. पावसाळा संपायला आला की ही परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याचे अनेक डॉक्टरांनी मला सांगितले आहे.
मुंबई महापालिका आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोटं दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. महापालिका मलेरियाने झालेल्या मृत्यूंची आकडेवारी चुकीचे सांगत आहे. केईएममधील आकडेवारीची मी माहिती घेतली तर असे लक्षात आले की, जुलै महिन्यांपर्यंत मलेरियाने ५६ व्यक्तिंना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मलेरियाने मृत्यू झालेल्या माणसाचा वृद्धपकाळाने मृत्यू अशी नोंद करतात, हॉस्पिटलचे खरे रिपोर्ट पुढेच नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
या रोगराईपासून बचावासाठी आपणच रस्त्यावर उतरले पाहीजे, त्यामुळे आजपासूनच स्वच्छता मोहिम हाती घ्या. तसेच नागरिकांना भेटून त्यांनाही रस्त्यावर कचरा टाकू नका याचे आवाहन करा, केवळ फोटोबाजीसाठी स्वच्छता मोहिम हाती घेऊ नका. जनता केवळ फोटोद्वारेच तुमच्या कामाची दखल घेतल नाही. चांगले काम केल्यावरही दखल घेते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment