Tuesday, August 17, 2010

टोलनाक्यावर मनसेचा हल्लाबोल

म टा च्या सौजन्याने

जर रस्ता दुरुस्त करत नसतील तर टोल कशाला भरायचा ?????

विनोद



खड्डयात गेलेल्या मुंब्रा बायपास रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांचे अतोनात हाल होत असून त्याच्या निषेधार्थ मनसेने सोमवारी येथील टोलनाक्यावर हल्लाबोल केला. टोल वसुली करणाऱ्या केबिनवर तुफान दगडफेक करून त्या केबिन कार्यर्कत्यांनी उलथवून टाकल्या. आंदोलन सुरू असेपर्यंत टोलवसुली बंद झाली होती.

खड्डयात गेलेल्या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती केली नाही, तर या रस्त्यावरील टोल वसुली बंद करू, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी दिला असला, तरी मुंब्रा बायपासचे काम पाहणाऱ्या अटलांटा कंपनीने या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. रस्त्याची दुरूस्ती कासवाच्या गतीने सुरू आहे. या खड्ड्यात गेेलेल्या रस्त्यावरील प्रवासासाठी टोल भरावा लागत असल्याने वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही मुंब्रा बायपासची दुरूस्ती होत नव्हती आणि टोल वसुली सुरू होती. त्यामुळे मनसेच्या कार्यर्कत्यांनी शहर अध्यक्ष हरी माळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. रस्ता दुरूस्त होत नाही, तोपर्यंत टोल वसुली करू दिली जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका कार्यर्कत्यांनी घेतली. सुरवातीला कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाल्यानंतर मनसेच्या कार्यर्कत्यांनी दगडफेक केली. मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूवीर्च हे आंदोलनकतेर् पसार झाले होते.

2 comments:

  1. हे टोलनाके म्हणजे प्रवाश्यांना लुटणारी केंद्रच आहेत. खर्चाची वसुली झाली तरी टोलनाक्यांची खंडणी चालूच असते.

    ReplyDelete
  2. आम्हाला कल्याण मधून बाहेर पडताना कोण गावाजवळ काही कारण नसताना टोल भरावा लागतो (आम्ही पूर्ण रस्ता वापरात देखील नाही, कारण टोल कल्याण ते डोम्बिवली च्या रस्त्यासाठी आहे). कल्याणकर ३ किलोमीटर च्या रस्त्यासाठी ४० रुपयांचा टोल आहे. खरोखर अन्यायकारक !!! आणि ह्या दरोडे खोरांबरोबर सरकार सामील आहे म्हणूनच तर हे लुटमार करू शकतात

    ReplyDelete