Thursday, January 7, 2010

‘मटा’नायक जनतेला समर्पितः राज


म टा च्या सौजन्याने

7 Jan 2010, 1912 hrs ईस्ट

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
पक्षाच्या रुपाने मी मतदानाला सामोरे गेलो आहे, पण माझ्या बाबतीत मतदानाची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मला नायक बनवले, त्यामुळे मी जनतेचे आभार मानतो. पण कुठलाही पुरस्कार घेणार नसल्याचे मी यापूर्वीच ठरवत असल्याने ‘ मटा ’ नायक हा पुरस्कार मी पुन्हा जनतेला समर्पित करतो, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ‘ मटा नायक ’पुरस्कार प्रदान समारंभात सांगितले.
गेल्या सात वर्षांपासून ‘ महाराष्ट्र टाइम्स ’ तर्फे जनतेचा कौल घेऊन ‘ मटा ’ नायक ठरविण्यात येतो. यंदा एकूण मतदानाच्या ५५ टक्के मते मिळवून म्हणजे ४५ हजार मते मिळून राज ठाकरे यांनी निर्वीवाद पुरस्कारावर आपले नावं कोरले. यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर यांनी पुष्पगुच्छ आणि ‘ मटा ’ नायकचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना, राज ठाकरे म्हणाले, कुठलाही पुरस्कार न घेण्याचे मी ठरवले आहे. पण हा पुरस्कार कोणत्याही संस्थेने दिला नसून जनतेने दिला आहे. त्यामुळे मी त्याचा स्वीकार करतो. परंतु, पुरस्कार स्वीकारून मी कुठेही समाधानाची पावती घेऊ इच्छित नाही. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारण्या पेक्षा मी तो जनतेलाच अर्पण करतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
पुरस्कार वितरणानंतर राज ठाकरे यांनी ‘ मटा ’ ऑनलाइनच्या ऑफिसला भेट दिली. मटा ऑनलाइनचे प्रमुख सुहास फडके यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले


No comments:

Post a Comment