Wednesday, January 20, 2010

जनतेच्या अपेक्षांचे दडपण येते - राज

म टा च्या सौजन्याने ......


20 Jan 2010, 0149 hrs ईस्ट
- म। टा. प्रतिनिधी
'मी जिथे जातो तिथे लोकांचा गराडा माझ्याभोवती जमतो। शिट्या वाजतात. टाळ्यांचा कडकडाट होतो. माझ्या सह्या घेण्यासाठी लोकांची झुंबड उडते. लाखो लोक माझ्याकडे अपेक्षेने बघत असतात. हे सारे बघितल्यानंतर जनतेच्या आपल्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत, हे जाणवते. त्यांच्याच अपेक्षांचे प्रचंड दडपण माझ्यावर येते. दुसऱ्या क्षणाला माझी खरोखरच तेवढी लायकी आहे का, असा प्रश्न मनात निर्माण होतो...' हे शब्द आहेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे!

नवनिर्माण करीअर अकादमीच्यावतीने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। डॉ। संदीप केळकर, ठाण्यातले दक्ष नागरिक प्रदीप इंदुलकर, जिज्ञासा ट्रस्टचे सुरेंद दिघे, वेटलिफ्टर संदीप आवारी आणि पत्रकार श्रीकांत बोजेवार यांना नवनिर्माण गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पत्रकार राजू परुळेकर, संदीप आचार्य आणि कवी अशोक नायगावकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राज यांनी आपले मन मोकळे केले.

'लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला भरपूर काम करायचे आहे। त्यासाठी माझे पाय जमिनीवरच राहिले पाहिजे. दहा वषेर् फिरूनही पक्षाच्या प्रसाराचे जेवढे काम करता आले नसते तेवढे काम काही महिन्यांत प्रसिद्धीमाध्यमांमुळे झाले. त्यामुळे कोणतेही पाऊल टाकताना विचार करून टाकावे लागते. कुठलेही आंदोलन करताना ते फार काळ रेंगाळत ठेवायचे नसते. 'ओव्हर एक्स्पोजर' मोठे घातक असते. १३ आमदार निवडून आल्यानंतर मी शिवतिर्थावर विजयी मेळावा घेऊ शकलो असतो. परंतु, तसे केले असते तर कार्यर्कत्यांमध्ये उन्माद निर्माण झाला असता. उद्धट झाले असते. त्यामुळे काही काळ शांत बसणेच इष्ट असते. कायद्याचे कुणालाही भर राहिले नसल्यामुळे आंदोलने करताना कायदा हातात घ्यावा लागतो. परंतु, त्यातून अनेक कार्यर्कत्यांवर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे कायदा हातात तरी किती वेळा घ्यायचा? मला कार्यर्कत्यांचाही विचार करावा लागतो', असेही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 'लोकांच्या मनात जो राग आहे. तोच माझ्या मनातही आहे. परंतु, थोडी सबुरी ठेवा. आजवर जे पाहिले नाही ते यापुढे पहाल, असे सांगत आपली भावी वाटचाल अधिक आक्रमक असेल', असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

रिक्षावाल्यांशी मराठीतच बोला
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सीचे परवाने मिळवायचे असतील तर मराठी भाषा बोलता आली पाहिजे, हा नियम आहे। त्यामुळे या रिक्षा आणि टॅक्सीचालकांशी मराठीतच बोला, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. दक्षिणेतल्या लोकांनी आपल्या भाषेची जशी भिंत उभी करून ठेवली आहे, तशीच भिंत महाराष्ट्रातही उभी राहिली पाहिजे. तसे झाले तरच इथली संस्कृती आणि भाषा टिकेल', असे राज यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment