Monday, January 11, 2010

ओरियन्टल इन्शुरन्सचा निर्लज्जपणा

मित्रानो, स्टार माझा वर कालच एक बातमी बघितली आणि ती तुमच्या सोबत शेयर करीत आहे। ह्या ओरिएंटल इन्शुरसं कंपनी चा आपण निषेध केला पाहिजे, पण कसा? मी त्यांचा कस्टमर केयर चा ईमेल ID शोधुन काढला आहे आणि तो आहे csd@orientalinsurance.org.in . मी त्यानां आजच ईमेल पाठवत आहे, जमल्यास तुम्ही देखिल करा
ही बातमी स्टार माझा वर ह्या पत्त्यावर देखिल मिलु शकेल http://www.starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=9076













रेल्वे ट्रॅकवर चोराचा पाठलाग करताना शहीद झालेल्या रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलला इन्शुरन्स कंपनीनं विम्याची रक्कम देण्यास नकार दिलाय. प्रवाशाचा मोबाईल चोरून पळणाऱ्या एका चोराचा पाठलाग करताना लक्ष्मण अहिवने यांना रेल्वेची धडक बसल्यानं ते मरण पावले होते.
बांद्रा आणि माहीम स्टेशनवरच्या रेल्वे ट्रॅकदरम्यान हा प्रकार घडला होता. कर्तव्य बजावताना मृत्यू आलेला असतानाही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीनं मात्र त्यांच्या कुटुंबियांना जीवन विम्याची 2.5 लाख रक्कम नाकारली आहे.
रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान बेकायदेशीरपणे पहारा देत असताना हा मृत्यू झाल्यानं विमा नाकारत असल्याचं कंपनीनं आपल्या पत्रात म्हटलंय. लक्ष्मण यांच्या विधवा पत्नी अलका यांना चरितार्थ चालवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.
अवघ्या सहा हजार रुपयांच्या पेन्शनमध्ये त्यांना दोन मुलींच्या आणि एका मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवावा लागतोय. त्यामुळं त्यांच्यासाठी ही रक्कम मिळणं गरजेचं बनलंय.दरम्यान जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ओरिएंटलशी पत्रव्यवहार करुन अहिवणे कुटुंबियांना न्याय देण्याची विनंती केली आहे.

3 comments:

  1. कोणत्य़ा तरतुदीनुसार हा नकार दिला गेला हे समजल्यास ई-मेल परिणामकारक ठरेल

    ReplyDelete
  2. हा विषय ओरिएंटल इन्शुअरन्सच्या वरिष्ट अधिकार्‍यांपर्यंत रेल्वेच्या संबंधित अधिकार्‍यांच्या मदतीने लावून धरल्यास तरतुदी बाजूला ठेवून विम्याचे पैसे मिळवून देणे शक्य आहे. अहिवने यांच्या सहकार्‍यांनी त्यांच्या युनियनतर्फे दबाव आणावा असे मी सुचवीन. विमा कंपनीच्या वरिष्ट अधिकार्‍यांना याबाबत पुरेसे अधिकार जरूर असतात फक्त त्यांच्यापर्यंत प्रकरण जावे लागते व discretion वापरने कंपनीच्याच प्रतिमेला उजळ करण्यासाठी उपयुक्त ठरेल हे लक्षात आणून दिले पाहिजे.

    ReplyDelete
  3. तुमच्या मता बद्दल धन्यवाद् । कालच बातमी बघितली की मुख्य मंत्री स्वता ह्या बाबतीत लक्ष घालणार आहेत आणि जीतेन्द्र आव्हाडानीं देखिल ह्या प्रश्नावर आन्दोलन करण्याचा इशारा दिला आहे तेव्हा हा प्रश्न निकालात निघायला हवा। स्टार माझा नि हा प्रश्न लाउन धरून फार चांगले काम केले आहे आणि त्याबद्दल त्यांचे धन्यवादच मानायला हवे ।

    ReplyDelete