Wednesday, September 28, 2011

फेसबुक वरील ग्रुप - मी वाचलेलं पुस्तक (झाडाझडती)

खालील लेख फेसबुक वरील मी वाचलेलं पुस्तक ह्या ग्रुप वरून घेतलेलं आहे .....

सदरचा लेख महेंद्र कुलकर्णी चा आहे



झाडाझडती - विश्वास पाटिल

एकूणच ग्रामिण जीवनाचा, गावकीतल्या गुंतागुंतीच्या राजकारणाचा विश्वास पाटलांचा अभ्यास अचाट आहे. वरवर पाहता शांत एकसुरी आयुष्य जगणा-या ह्या एका गावावर धरणाचा नांगर फ़िरतो आणि गावच्या गाव देशोधडीला कसं लागतं त्याचं वर्णन ह्या कादंबरीत वाचायला मिळतं.

आपल्यासारख्या शहरी जीवनाला चटावलेल्या लोकांना धरण = वीज एवढंच गणित कळतं, अधिकाधीक वीज उत्पादनासाठी अधिकाधीक धरणं बांधायला हवीत अशी किमान माझी तरी अपेक्षा असायची. पण अशा धरणांखाली गाडल्या गेलेल्या गावांची, गावक-यांच्या स्वप्नांची मोजदाद करायला आपल्याला वेळ तरी कुठे असतो.

गावातलं वातावरण, तिथलं राजकारण तिथली शासनव्यवस्था आपल्याला आधी अनाकलनीय वाटल्या तरी कादंबरी अर्धी वाचुन होईपर्यंत आपल्या अंगवळणी पडतात. सर्वस्व पणाला लागलेल्या धरण विरोधी लढ्यातही आपलं, आपल्या जातीचं वेगळेपण शाबुत ठेवण्यासाठीची धडपड बघुन कीव करावीशी वाटली तरी त्या गोष्टी टाळता येण्यासारख्या नसतात.

पाटलांनी उभ्या केलेल्या प्रत्येक व्यक्तीरेखेला वेगळं अस्तित्व आहे, प्रत्येक व्यक्तीरेखा आपल्यासमोर वेगवेगळे प्रश्न उभे करते. देशाच्या, राज्याच्या भल्यासाठी शेतक-यांनी घरादाराची होळी करायची आणि राजकारण्यांनी तोंडाला पानं पुसायची हा प्रकार आता नवा राहीलेला नाही.

झाडाझडती जेव्हा पहिल्यांदा वाचलं तेव्हा लिहीलेल्या काही ओळी इथे द्यायचा मोह आवरत नाही

धराण

त्यांचं हुतया धराण
आमचं हुतया मराण

धरनाची ईज म्हनं राज्याला देनार
आमी मातुर घुबडागत अंधारात सडनार

जवा कोसळंल पाउस, धराण भरंल
मोडल्याल गाव पाक भिकेला लागंल

नेमाप्रमानं सरकारन जमीन दीली व्हती
पांढ-या कागदावर काळी शाय वतली व्हाती

आमदार खासदार येत्यात
ईकासाचं गाजार दाखीवत्यात
उर फ़ुटेस्तोवर शेतकरी
नव्या रानातलं दगुड फ़ोडत्यात

पुनर्वसनाच्या नावाखाली
आमास्नी आयुष्यातुन उठीवलं
सोन्यासारखी जमीन बुडवुन,
दगड धोंडं गळ्यात मारलं

गावतली पोरं तालुक्याला भीक मागत्यात
आमच्या आयाभनी लोकाची भांडी घासत्यात

सरकारचं डोळं फ़ुटल्यात आमच दिस फ़ीरल्यात
कुनाला काय बी दिसत न्हाय
ह्या आमच्या वांझोट्या जमीनीत
दगड धोंडयांशीवाय कायबी पीकत न्हाय


Wednesday, September 21, 2011

फटाके दिवाळीनंतर : राज

खालील लेख म टा च्या सौजन्याने ......


मी एक वाक्य बोललो तर एवढे झोंबले. त्यावर जे काही माझ्याबद्दल लिहून आलंय, ती त्यांची परंपरा आहे. मी आता फक्त एक टिचकी मारलीय, दिवाळीनंतर माझे फटाके सुरू होतील, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी उद्धव यांच्या विखारी टीकेवर दिलंय.

खडकवासला येथील मनसे आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर होणा-या पोटनिवडणुकीसंदर्भात मनसेची भूमिका मांडण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या टीकेसंदर्भात पत्रकारांनी छेडले असता त्यांनी थोडक्यात उत्तर दिलंय. काल शिवसेनेने पत्रक काढून राज ठाकरे यांना नावानीशी फुकट-राज ’, ‘ नमकहराम ’, ‘ बेईमान अशी भाषा केली होती.

खडकवासल्यातील भूमिकेपेक्षा राज उद्धव यांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्याप्रमाणे आजच्या सामना मध्ये जे काही छापून आलंय, त्यावर तुमचे मत काय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर राज म्हणाले, की आत्ताच यावर काहीही बोलणार नाही. माझे एक वाक्य एवढे झोंबले तर निवडणुकीच्या वेळी काय होईल त्याचा तुम्हीच विचार करा ’.

आज जे पत्र आलंय ते मी सेफ डिपॉझिटमध्ये ठेवलंय. योग्य वेळी बाहेर काढेन. खरं तर मी अजून काहीच बाहेर काढलेले नाही. कदाचित त्यांना नरेंद्र मोदी किंमत देत नाहीत म्हणून काय त्रागा असावा, अशी कोपरखळीही त्यांनी उद्धव यांना मारली.

खडकवासल्यातून मनसेचा उमेदवार नाही

मनसेचे आमदार रमेश वांजळे काय होते, आमच्यासाठी त्यांचे स्थान काय होते हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही. पण आज वांजळे वहिनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असे चाललंय. मी माझ्या परीने समजावायचा प्रयत्न केला. पण एकीकडे मी तुमच्या पक्षांचे मंगळसूत्र घातले आहे असे बोलायचे आणि दुसरीकडे वेगळी चर्चा करायची हे मला मान्य नाही. अशा एक-दोन आमदारांनी आमचे काही अडणार नाही. पण जे काही चाललंय ते नैतिकतेला धरून नाही. म्हणूनच त्यांना वागायचे तसे वागो, आम्ही आमच्या रमेश वांजळेंना श्रद्धांजली म्हणून आम्ही खडकवासल्यातून उमेदवार देणार नाही.

Friday, September 16, 2011

रस्ते बांधकामाच्या ५६० कोटी रुपयांच्या निविदा तात्काळ रद्द करा

मुंबई आणि उपनगरातील रस्ते बांधकामाचे ठेके चांगल्या कंपनी कडे दिले पाहिजेत .... हे स्थानिक ठेकेदार २५ - ३० % बिलो जाऊन जर निविदा भारत असतील तर ते चांगले रस्ते कसे बांधणार? समझा एखाद्या रस्त्याचे महानगरपालिकेचे एस्टीमेट जर १ करोड रुपयाचे असेल आणि ठेकेदार जर हा रस्ता ७५ लाखात करत असेल तर त्या रस्त्याचा दर्जा कसा असेल ह्याची कल्पना करा? आता वेळ आली आहे की सर्व रस्त्यांची कामा एल एंड टी / ग्यामन अश्या प्रथितयश कंपन्यान कडे द्यावे .......

आपला

विनोद शिरसाठ




राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई, १५ सप्टेंबर / विशेष प्रतिनिधी

altमहापालिकेने नियम धाब्यावर बसवत तसेच कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याऐवजी त्यांना मुंबईतील रस्त्यांची ५६० कोटी रुपयांची कंत्राटे बहाल करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन या निविदा तात्काळ रद्द करण्याची आणि मुंबईकरांना चांगले रस्ते देण्याची मागणी केली. राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेना अडचणीत आल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
पालिकेतील विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनीही निविदा रद्द करण्याची मागणी केल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांची निविदा मंजूर केली जाईल, असे शिवसेनेने जाहीर केले होते.
मुंबई शहरातील रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात पडणाऱ्या खडय़ांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हे दुष्टचक्र संपण्याची गरज असल्याचे सांगत, उत्तम दर्जाचे रस्ते बांधू शकणाऱ्या व्यावसायिकांना काम देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आमदार नितीन सरदेसाई, अतुल सरपोतदार आदी मनसेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
गेल्या वीस वर्षांत पालिका चांगले रस्ते का बांधू शकली नाही, निविदेतील पालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा पंचवीस टक्के कमी दराने निविदा भरणारे कंत्राटदार चांगले रस्ते कसे देणार? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. खराब रस्ते बांधण्यासाठी कोटय़ावधी रुपये खर्च करायचे, नंतर त्यावर पडणाऱ्या खड्डे बुजविण्यासाठी कोटय़ावधी रुपयांची उधळण करायची, हे दुष्टचक्र आता थांबवा, असे आवाहन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केले. सुमार कुवतीच्या तसेच भ्रष्ट कंत्राटदारांना दरवर्षी पाचशे-हजार कोटींचे कंत्राट देण्याऐवजी संपूर्ण व्यावसायिक व या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या कोणत्याही कंपनीला हे कंत्राट द्यावे, कोणाला कंत्राट द्यायचे याचा निर्णय तुम्ही घ्या, पंरतु मुंबईकरांना आता तरी किमान चांगले रस्ते द्या, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
दरम्यान या संदर्भात राज ठाकरे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतली असून ते पालिका आयुक्तांशी याबाबत बोलणार आहेत. यापूर्वी कल्याण-डोंबिवली पालिका निवडणुकीच्या वेळीही खड्डय़ांच्या प्रश्नामुळे शिवसेनेला झटका बसला होता. ज्या कंत्राटदारांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली त्यांनाच ५६० कोटी रुपयांचे कंत्राट कसे दिले? असा सवालही त्यांनी केला.

Thursday, September 15, 2011

जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुर्दशा - कल्याण / डोम्बिवली

खालील बातमी म टा च्या सौजन्याने ........




कल्याणातील केडीएमसीचेजलशुद्धीकरण केंद्र अतिशयकेविलवाण्या स्थितीत असूनत्याकडे कानाडोळा करूनमहापालिका प्रशासन लाखोनागरिकांच्या जीविताशी खेळकरत आहे . या केंद्रातील पाणीशद्धीकरणासाठी वापरलीजाणारी रेती चक्क गेल्या १० वर्षांत बदलण्यात आली नसून काही फिल्टर नादुरुस्तअसल्याची धक्कादायक माहितीही उघड झाली आहे . या पार्श्वभूमीवर जबाबदारअधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी होत आहे .

कल्याणातील बारावे जलशुद्धीकरण केंद्राची मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनीअलिकडेच अचानक पाहणी केली . त्यावेळी त्यांना या केंद्राची दयनीय स्थिती आढळूनआली होती . त्याबाबत त्यांनी पालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्याकडे तक्रारकेल्यावर एक्झिक्युटीव्ह इंजिनीअर रविंद्र पुराणिक यांच्या अध्यक्षतेखाली समितीनेमून या केंद्राच्या स्थितीबाबतचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते .
या समितीचा अहवाल मंगळवारी महासभेत दाखल करण्यात आल्यावर तेथीलभयानक स्थिती स्पष्ट झाली . जलशुध्दीकरण केंद्रात १८ फिल्टर असले तरी त्यापैकी फिल्टर बंद असल्याचे आढळले . तसेच या फिल्टरमधील रेती २००१पासून बदललेलीनाही . पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गात तर चक्क शेवाळ दिसून आल्याने या केंद्राच्याअस्वच्छतेबाबत कल्पना येते . फ्ॅलश मिक्सरपैकी नादुरुस्त होते . पाण्याचीगुणवत्ता तपासण्याच्या प्रयोगशाळेत पाणी गळती होते .

तसेच पाण्याच्या चाचणीचे नमुने कोकण भवन येथील प्रयोगशाळेत पाठवले जातात ,असा पालिकेचा दावा असला तरी प्रत्यक्षात तशी नोंद कोठेही आढळली नाही .याखेरीज या नोंदींची तपासणी पालिका अधिकाऱ्यांकडून केल्याचेही पुरावे दिसलेनसल्याचा ठपका पुराणिक समितीने ठेवला आहे . त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेकडेप्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला आहे .

या केंद्रात ८० कर्मचारी नेमणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात ५६ कर्मचारीच कामकरत असल्याचे समितीचे म्हणणे आहे . तेथील कर्मचाऱ्यांना ठराविक शैक्षणिक पात्रताअसणे गरजेचे असले तरी तेथील कर्मचाऱ्यांकडे तशी पात्रता आढळली नसल्याचेयावेळी उघड झाले . तेथील कर्मचाऱ्यांना ओळखपत्र , गणवेश , गमबूट , हेल्मेट हॅण्डग्लोज आदींपैकी काहीच कॉण्ट्रॅक्टर पुरवत नसल्याचाही ठपका अहवालात आहे .
अशा गंभीर प्रकारासाठी जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे , अशी मागणीनगरसेवक उल्हास भोईर यांनी महासभेत केली . सर्वच नगरसेवकांनी त्यावरुनप्रशासनावर तोंडसुख घेतल्यावर महापौर वैजयंती गुजर यांनी जबाबदारअधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा आदेश प्रशासनाला दिला . दरम्यान रस्त्यांची दुर्दशा, डोंबिवलीतील स्वीमिंग पुलचे वादग्रस्त कॉण्ट्रॅक्ट , प्रिंटर बंद असल्याने कोट्यवधीरुपयांची बिले पाठवणे त्यापाठोपाठ जलशुध्दीकरण केंद्राची दारुण स्थिती अशासर्वच प्रकरणात विभागप्रमुख एक्झिक्युटीव्ह इंजिनीअर प्रमोद कुलकर्णी आहेत . परंतुते आयुक्त सोनवणे यांच्या खास मर्जीतील अधिकारी असल्याने त्यांच्यावर आयुक्तकारवाई करत नाहीत , असा आरोप पालिका वर्तुळात होऊ लागला आहे .

मराठी मत्सराच्या 'क्रिएटिव्हिटी'वर राज यांचा हल्ला

टाटा डोकोमो ची जाहिरात बघितली तेव्हाच संताप आला ....... ह्या लोकांना मोलकरीण म्हणून नउ वारी साडी घातलेली महाराष्ट्रीयन बाईच दिसते का ??? आणि ह्या उप्पर तिला चोर म्हणून पण दाखवलं .... असल्या लोकांना पायतनाने तुडवले पाहिजे .....

आपला

विनोद शिरसाठ

खालील बातमी म टा च्या सौजन्याने ......


' जाहिराती वा चित्रपटांमध्ये मराठीजनांना कमी लेखणे वा त्यांचे पात्र जाणीवपूर्वक नोकराचे दाखविणे हे आता इंग्रजाळलेल्या क्रिएटिव्ह मंडळींनी थांबवावे. हा महाराष्ट्राचाच अपमानच असून असा प्रकार करणाऱ्यांची क्रिएटिव्हिटी बाहेर काढायला माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तयार आहे', असा सज्जड इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

जाहिरात कंपन्यांमधील क्रिएटिव्ह मंडळींना उद्देशून राज ठाकरे यांनी एक पत्र लिहिले असून त्यात हा इशारा दिला आहे. टाटा डोकोमो कंपनीने त्यांच्या जाहिरातीमध्ये मराठी मोलकरीण मोबाइल फोन चोरतानाचे दृश्य दाखविले आहे. टाटा कंपनीला याविषयी विचारले असता, त्यांना याची काहीच कल्पना नव्हती. त्यांनी ताबडतोब जाहिरीत मागे घेतल्याचेही आम्हाला कळविले आहे. त्यामुळे माझा आक्षेप त्यांच्याविषयी नसून जाहिरात बनविणाऱ्या आणि इंग्रजाळलेल्या, मराठी माणसाचा द्वेष करणाऱ्या वर्गाला आहे. मी स्वत: जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून व्यंगचित्रकला शिकलो आहे.

जाहिराती या उत्पादन विकण्यासाठी असतात. स्थानिक जनतेच्या भावना दुखावून त्यांना अपमानित करण्यासाठी नसतात, असे राज यांनी या पत्रात म्हटले आहे. आंदोलनाची शस्त्रे आम्ही म्यान केलेली नाहीत आणि करणारही नाही. यापुढे लेखी वा तोंडी भाषा बोलली जाणार नाही. मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या जाहिराती वा चित्रपट बनविणाऱ्यांशी माझे कार्यकर्ते क्रिएटिव्ह पद्धतीने व्यवहार करतील, असा इशाराही पत्राच्या शेवटी राज ठाकरे यांनी दिला आहे.

................................

विनोद आणि मत्सर यातील अंतर कळते

मराठी सोडून प्रामुख्याने हिंदी व इतर भाषांमधील चॅनेलवर ज्या मालिका दाखवतात किंवा चित्रपट निघतात त्यात मराठी माणसाचे अवमुल्यांकन करून त्याचे पात्र दाखविले जाते. विनोद आम्हालाही समजतो आणि जमतो. अनेक चित्रपटांत मराठी माणसाचे कॅरेक्टर विनोदाने दाखवले आहे. त्यावर आम्ही कधी आक्षेप घेतला नाही. मात्र विनोद आणि मत्सर यातले अंतर आम्हाला समजत नाही, असे समजून आपण महाराष्ट्रात राहू नका. हे यापुढे चालणार नाही.

Thursday, September 8, 2011

कल्याण - डोंबिवलीत अशुद्ध पाणी पुरवठा

मनसे चे आमदार श्री प्रकाश भोईर व प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक श्री उल्हास भोईर ह्यांनी काल कल्याण येथील जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी केली आणि त्यात त्यानां बऱ्याच अनियमित गोष्टी आढळून आल्या .... आम्ही पण साहेबांबरोबर होतो ... तिथला भोंगळ कारभार बघून संताप आला. कोणाचा कोणाला पत्ता नाही ... ज्याला ठेका दिलाय तो ठेकेदार तर तिथे फिरकतच नाही ....... कुठलीही गोष्ट सुस्थितीत नाही ....

ह्या असल्या लाचखाऊ आणि सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.

आपला

विनोद शिरसाठ

खालील बातमी प्रहार च्या सौजन्याने ......


Wednesday, September 7, 2011

सीटीपार्कच्या जागेवर आयटीपार्क?

कल्याण मध्ये आय टी पार्क असणं ही काळाची गरज आहे ..................... कल्याण , डोम्बिवली , अंबरनाथ व बदलापूर येथून सर्वात जास्त आय टी चे लोकं मुंबई अथवा नवी मुंबई इथे जातात त्यांना जर कल्याण मधेच संधी उपलब्ध झाली तर कल्याण / डोम्बिवली शहराचे रूप पालटेल ह्यात काही शंका नाही .... ह्या ब्लॉग द्वारे आम्ही कल्याण डोम्बिवली करांना आवाहन करतो की त्यांनी आमदार प्रकाश भोईर ह्यांच्या ह्या मागणीला पाठींबा द्यावा.

आपला

विनोद शिरसाठ


खालील बातमी म टा च्या सौजन्याने ......


कल्याणच्या गौरीपाडा येथीलजागेवर तब्बल १०० कोटी रुपयेखर्चाच्या प्रस्तावित सीटीपार्कप्रकल्पाच्या जागेवर आयटीपार्कउभारावे , अशी मागणी मनसेचेआमदार प्रकाश भोईर यांनी केलीआहे . सीटीपार्कची निम्मी जागाताब्यात नाही त्यासाठीचाकोट्यवधींचा निधी पालिकाउभारू शकत नाही . त्यामुळे हीजागा आयटीपार्कसाठी द्यावी ,अशी मागणी त्यांनी केली आहे .याबाबतचा निर्णय सोमवारी पालिकेत होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे .

कल्याण परिसर एकेकाळी राज्याच्या औद्योगिक नकाशावर ठळकपणे उमटला होता .पण जागेला आलेले सोन्याचे भाव इतर राज्यांनी पोषक औद्योगिक धोरणस्वीकारल्याने निर्माण झालेली स्पर्धा यामुळे या भागातील उद्योजकांनी कंपन्या बंदकेल्या . त्यामुळे कल्याण पट्ट्यातील सुमारे २० कंपन्या १९९० ते २००० या दशकातबंद होऊन किमान २५ हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली .

नोकऱ्या उपलब्ध नसल्याने या भागातील तरुणांना मुंबई किंवा पुणे गाठण्याशिवायअन्य पर्याय नाही . दररोज ये - जा करण्यात किमान ते तासांचा अवधी जातअसल्याने त्याचा परिणाम कार्यक्षमतेवरही होतो . या परिसरात पुन्हा रोजगाराच्यासंधी निर्माण करायच्या असतील तर उद्योग स्थापन होणे आवश्यक आहे . हे ओळखूनकल्याण पश्चिमेचे आमदार प्रकाश भोईर यांनी बड्या कार्पोरेट कंपन्यांना त्यासाठीआवतण दिले .

या भागात उपलब्ध असलेले कुशल तंत्रज्ञ तसेच जागेचे तुलनेने कमी भाव , पाण्याचीमुबलकता आदी कारणामुळे कल्याण पट्ट्यात उद्योग सुरू करणे शक्य असल्याचे भोईरयांचे म्हणणे आहे . विशेष म्हणजे त्यांच्या आवाहनाला बड्या कार्पोरेट कंपन्यांनीप्रतिसाद दिला असून आयटी पार्कसारखा प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे .त्यावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च उचलण्याची त्यांची तयारी आहे .
पालिकेने या उद्योगांसाठी जागा दिली तर रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवरनिर्माण होतीलच ; शिवाय येथील अर्थव्यवस्थेलाच चालना मिळणार आहे . त्यामुळेपालिकेने गौरीपाडा परिसरातील सीटीपार्क प्रकल्पाची ताब्यात असलेली १६ एकरजागा आयटीपार्कसाठी द्यावी , अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त रामनाथ सोनवणेयांच्याकडे केली आहे . सीटीपार्क हा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठेचाकेलेला प्रकल्प असला तरी गेल्या महिन्यात पालिका प्रशासन त्या प्रकल्पाची एकइंचही जागा ताब्यात घेऊ शकलेली नाही . तसेच प्रकल्पावर १०० कोटी रुपयांचा खर्चपालिकेला पुढील दशकभरात तरी झेपणारा नाही . त्यामुळे ही जागा आयटीपार्कसाठीद्यावी , असा त्यांचा आग्रह आहे .

दरम्यान , याबाबत महापौर वैजयंती गुजर आयुक्त सोनवणे यांची संयुक्त भेटसोमवारी घेणार असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले . या बैठकीत नगररचनाविभागाचे अधिकारीही उपस्थित असतील . सीटीपार्कची जागा आयटीपार्कसाठीदेण्याची तयारी पालिका दाखवते की नाही , याबाबत या बैठकीतच निर्णय होईल .