Monday, June 20, 2011

जनाची नाही निदान मनाची तर लाज बाळगा

शुक्रवारी कल्याणच्या महापौरांनी आयत्या वेळी लाचखोर अभियंता सुनील जोशी ह्याला परत कामावर रुजू करण्याबाबत ठराव घेतला आणि विरोधकाना न जुमानता शिवसेना / बी जे पी च्या नगरसेवकांनी तो मंजूर करून घेतला. विरोधकांनी गोंधळ घालू नये म्हणून काम काज संपायच्या ५ मिनिट आधी हा प्रस्ताव आणण्यात आला व घाई घाई ने मंजूर करून घेतला व लगेच राष्ट्रगीत वाजवून महासभा संपवण्यात आली ... हा चक्क निर्लज्ज पणाचा कळस आहे .... सभागृहात हा प्रस्ताव मांडणारा नगरसेवक मोहन उगले हे शिवसैनिक आहेत आणि त्यांचा वार्ड बी जे पी लं गेला म्हणून त्यांनी बी जे पी च्या विरुद्ध अपक्ष निवडणूक लढवली आणि शिवसेनेने संपूर्ण रसद त्यांना पुरवली....... काल शिवसेना कार्य प्रमुखांनी हा प्रस्ताव मागे घेतला जाईल असं सांगितलं पण "बुंद से गइ वो हौद से थोडी आयेंगी" ...............................

वाचा म टा ची बातमी ........

'लाचखोर' जोशीला युतीचे अभय

लाचखोरीच्या प्रकरणातमहापालिकेच्या सेवेतून निलंबितझालेला एग्झिक्युटिव्ह इंजिनीअरसुनील जोशी याला कल्याण -डोंबिवलीतील शिवसेना - भाजपयुतीने ' अभय ' दिले असूनजोशीला पालिकेच्या सेवेत पुन्हारुजू करून घेण्याचा प्रस्तावकेडीएमसीच्या महासभेतशनिवारी प्रचंड गदारोळात मंजूरकरवून घेण्यात आला .

केडीएमसीचा एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर तत्कालीन नगररचनाकार सुनील जोशीयाला अँटी करप्शन ब्युरोने मार्च २००९ मध्ये लाच स्वीकारताना अटक केली होती .त्याला पालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले होते . नंतर पोलीस चौकशीतजोशीकडे तब्बल तीन कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली होती .

शनिवारच्या महासभेच्या विषयपत्रिकेवर सुनील जोशीला सेवेत रुजू करूनघेण्यासंदर्भात कोणताच प्रस्ताव नव्हता . परंतु अपक्ष नगरसेवक मोहन उगले यांनी 'जोशींना कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून पालिकेच्या सेवेत रुजू करून घ्यावे ', असाआयत्या वेळचा विषय ठेवला . हा विषय महापौर वैजयंती गुजर यांनी दाखल करूनघेताच सत्ताधारी सेना - भाजपच्या सदस्यांनी ' मंजूर ' म्हणत गोंधळ सुरू केला .काँग्रेस मनसेच्या नगरसेवकांनी प्रस्तावाला विरोध करण्याचा प्रयत्न केला . परंतुमहापौरांनी राष्ट्रगीत गायनाचा आदेश दिला प्रचंड गदारोळात जोशीला सेवेत रुजूकरून घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला .

आयत्या वेळचा विषय घेऊन त्यावर चर्चादेखील करता राष्ट्रगीताचा वापर करून हाप्रस्ताव मंजूर केल्याचा विरोधी पक्षनेत्या वैशाली दरेकर काँग्रेसचे गटनेते सचिन पोटेयांनी निषेध केला . हा ठराव विखंडीत करण्याच्या मागणीसाठी विरोधक सोमवारीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले .

याबाबत महापौर वैजयंती गुजर यांना विचारणा केली असता ठराव उचितकार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठवल्याचे सांगितले . दरम्यान , या ठरावाचीअंमजबजावणी करणार नाही , असे केडीएमसीचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांनीएका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले .
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय दत्त यांनी सेना - भाजपचा खरा चेहरा जनतेसमोरआल्याचा आरोप केला . शिवसेना भाजपने नऊ जून रोजी भ्रष्टाचाराविरोधातमुंबईत मोर्चा काढला होता . मात्र याच पक्षांनी भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालूनआपला खरा चेहरा जनतेसमोर आणल्याचे ते म्हणाले .

No comments:

Post a Comment