मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा तर्फे महाराजांना मानाचा मुजरा
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी
नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा
आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी
धीर उदार गभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले
देव धर्म गोब्राम्हण, कारवाया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळीचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला, तुम्हा कारणे
कित्येक दृष्ट संहारिला, कित्येकासी धाक सुटला
कित्येकास आश्रय जाहला, शिवकल्याण राजा
खरच खूप सुंदर आणि
ReplyDeleteयथार्थ वर्णन आहे हे महाराजांच ...
पन महाराज तुम्ही आपल्या ब्लॉगच टाइटल विसरलात बहुदा..
थोरल्या आबा साहेबांना मानाचा मुजरा!!!
ReplyDeleteनमस्कार मी अभय शेजवळ मी नुकताच मराठीनेटभेटब्लॉगकट्टा बनविला आहे. तिथे आपला छानसा ब्लॉग जोडण्यात आला आहे, जर आपणाला आपला ब्लॉग तेथून हटवायचा असल्यास
ReplyDeleteसंपर्क या पर्याय वापरून आपण आपला ब्लॉग ब्लॉगकट्ट्यातून हटवू शकता.
धन्यवाद