Friday, March 4, 2011

शिवसेनेचा मुस्लीम महासंघ ..... आता बोला?

अतिशय हास्यास्पद प्रकार आहे हा. असो, आम्ही काय बोलणार? अश्या गोष्टी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन करायच्या नसतात ..... त्या तुमच्या तत्वात असल्या पाहिजेत.


खालील लेख म टा च्या सौजन्याने .....


दरवर्षी मुस्लीम मोहल्ल्यातला प्रचार फिरकापरस्त (धर्मांध) या शब्दाभोवती फिरतो. 'तीर कमान हमारे सिनेको छलनी करने आया है...', अशी आरोळी मुंबई-ठाण्यातल्या मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये ठोकून शिवसेनेच्या विरोधात प्रचार चालतो. मात्र, आजवर चार हात लांब राहिलेल्या मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने चक्क मुस्लिम महासंघाची स्थापना केली आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या आहेत. मुंब्य्रात महापालिकेचे जवळपास १६ प्रभाग असून ठाणे शहरातील काही प्रभागांमध्येही मुस्लिमांचे वर्चस्व आहे. तिथल्या मतदारांना चुचकारण्यासाठी शिवसेनेने मुस्लिम महासंघाची स्थापना केल्याची चर्चा आहे.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा महासंघ ठाण्यात स्थापन झाला असून मुंब्य्रातील अन्वरकुमार कच्ची (३४) यांना या महासंघाचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले आहे. महासंधाची स्थापना झाल्यानंतर शेकडो मुस्लिमांनी सदस्यत्व स्वीकारण्यास सुरुवात केली असून टेंभी नाका येथे झालेल्या एका छोटेखानी सोहळ्यात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशप्रेमी मुस्लिमांचा नेहमीच आदर केला असून शिवसेनेचा राग हा पाकधाजिर्ण्या मुस्लिमांवर आहे. साबिर शेख यांच्यासारख्या कट्टर शिवसैनिकाला बाळासाहेबांनी कॅबिनेट मंत्री केले होते. परंतु, स्वत:ला सेक्युलर म्हणविणाऱ्या पक्षांनी मुस्लिम बांधवांमध्ये नेहमीच शिवसेनेबाबत गैरसमज पसरविले. तेच गैरसमज दूर करून देशप्रेमी मुस्लिमांना ठाणे शहराच्या विकासात सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न असून लवकरच मुंब्रा, हाजूरी, वागळे इस्टेट या भागात मुस्लिम बांधवांचे मेळावे घेणार आहोत', असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

' तथाकथित सेक्युलर पक्षांनी वर्षानुवषेर् मुस्लिमांची मते आपल्या पारड्यात पाडून घेतली. मात्र, त्यामोबदल्यात आमच्या समाजाला काहीही मिळाले नाही. या पक्षांनी आम्हाला नेहमीच दावणीला बांधून ठेवले. आमच्यातील असुरक्षिततेच्या भावनेचा त्यांनी गैरफायदाच घेतला', असा आरोप अन्वर कुमार यांनी केला आहे. काँग्रेस आघाडीच्या स्थानिक नेत्यांच्या दुर्लक्षामुळे मुंब्य्राची दुर्दशा झाली आहे.

आमच्या मुलांना आजही दजेर्दार शिक्षण मिळू शकत नाही. मोहल्ल्यांमध्ये मुलभूत सुविधांही दिल्या जात नाहीत. या पक्षांकडून आमचा भ्रमनिरास झाला असून ठाणे शहराप्रमाणे शिवसेना मुंब्य्राचाही विकास करेल, या आशेपोटी आम्ही शिवसेनेत दाखल झाल्याचे अन्वरकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

3 comments:

  1. sir your great and you are wrote right thing and i am with you

    ReplyDelete
  2. शिवसेनेचे मुस्लीम लांगुलचालन मतांसाठी ह्या विचाराशी मी पूर्ण सहमत आहे. पण "गोष्टी तत्वात असल्या पाहिजेत" असे आपण म्हणता त्याचा अर्थ काय? कोणाचे आणि कसले तत्व? जे मुसलमान राजसाहेबांपुढे गोंडा घोळत आहेत त्यातल्या कितींनी आपली मातृभाषा उर्दू नसून मराठी आहे असे जनगणनेत सांगितले याचा तपास केलात तर झोप उडेल. अडीच लाख उत्पन्न असणारा मुसलमान विद्यार्थी गरीब व त्याला दीड लाखाची शिष्यवृत्ती सच्चर आयोगाप्रमाणे मिळते पण पंधरा हजाराहून जास्त वर्षाला उत्पन्न असेल तर तो हिंदू विद्यार्थी श्रीमंत व त्याला काहीच मिळत नाही याचा निषेध भाजप व शिवसेनादेखील करीत नाहीत मग राजसाहेबांना काय दोष द्यायचा? पण हिंदुतर विद्यार्थी ७५ टक्के असल्यास ५० लाख देणगी सरकार देते व यामुळे शेकडो कोटी रुपये उर्दू आणि इंग्रजी शाळांनी लुटून नेले असताना बालमोहन विद्यामंदिर व साने गुरुजी सारख्या एकूण एक मराठी शाळा भिकेला लागतात हा तरी मराठीचा मुद्दा आहे की नाही याचे प्रथम उत्तर द्या. जे शेण खातात त्यांने सारीच जनता मनातून हसते. फरक इतकाच की काही गायीचे शेण खातात आणि काही म्हशीचे. शेण तो शेणच. कशाला शिवसेनेला हसता?

    संजीव पुनाळेकर (वकील) - ९९६७८२२८८५

    punalekar@hotmail.com

    ReplyDelete