Wednesday, July 28, 2010

कुठे गेला तुमचा मराठी बाणा ??

आजच्या म टा मध्ये "शाहरुख - शिवसेना दिलमजाई" ची बातमी वाचली, ज्यामध्ये सामना मध्ये शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख श्री उद्धव ह्यांना वाढदिवसानिमित्त शाहरुख खान च्या रेड चिली ह्या संस्थेने शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना मध्ये पानभर जाहिरात देऊन अभिष्टचिंतन केले आहे ........

माझ्या मते सामना ने हि जाहिरात स्वीकारायला नको होती, ज्यावेळेस शिवसेना नेतृत्वाने खानच्या विरुद्ध आंदोलन करण्याचा आदेश दिला होतं तेव्हा असंख्य सैनिकांनी पोलिसांच्या लाठ्या काठ्यांची परवा न करता आंदोलन केले होते. हि जाहिरात बघून त्यांना काय वाटले असेल ..... म्हणजे रस्त्यावर कार्यकर्त्यांनी उतरायचे आणि नेत्यांनी त्यांच्या कडून अभिष्ट चिंतनाचे हार तुरे घ्याचे .... हा निव्वळ भंपकपणा आहे ......आणि शिवसेना नेतृत्वाने कार्यकर्त्यांचा विचार करायला हवा होता, असं माझं स्पष्ट मत आहे. काय तुमचं काय मत आहे??

खालील बातमी म टा च्या सौजन्याने


शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या पुरवणीत अभिनेता शाहरूख याच्या 'रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रा. लि.' या कंपनीची शुभेच्छा देणारी जाहिरात प्रसिद्ध झाल्याने शिवसेना आणि शाहरूख यांच्यातील वितुष्ट संपल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. 'माय नेम इज खान' या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन ठाकरे यांनी दिले तेव्हा काँग्रेस सरकार व पोलीस यांच्या सहकार्याने शाहरूख खानने त्याला आव्हान दिले होते. त्यामुळे ही जाहिरात दिवसभर राजकीय वर्तुळात चचेर्चा विषय ठरली.

शाहरूख खानची गांधी कुटुंबाशी असलेली दोस्ती सर्वश्रुत आहे. त्यामुळेच 'माय नेम इज खान' या चित्रपटावर बंदी घालण्याची घोषणा शिवसेनेने केली तेव्हा गांधी कुटुंबाची व पर्यायाने राज्यातील सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली होती. राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांनी पोलीस संरक्षणात हा चित्रपट पाहून शिवसेनेची बंदी मोडून काढली होती. या पार्श्वभूमीवर शाहरूखने उद्धव यांना शुभेच्छा देण्यातून दिलजमाईचे संकेत मिळतात.

प्रारंभी 'रेड चिलीज' ही कंपनी शाहरूख खान व जुही चावला यांनी स्थापन केली होती. कालांतराने जुही त्यातून बाहेर पडली. सध्या शाहरूख व गौरी खान दाम्पत्याकडे कंपनीची मालकी आहे. त्यामुळे आपण ही जाहिरात दिली नाही, असे म्हणण्याची पळवाट शाहरूखला उपलब्ध नसल्याचे काँग्रेसच्या एका मंत्र्याने निदर्शनास आणले.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीच्या मुद्द्यावर बॉलिवुडचा शहेनशहा अमिताभ बच्चन यांनाच आवाज दिला. लागलीच शिवसेनाप्रमुख अमिताभच्या मागे ठामपणे उभे राहिले. मग शिवसेनेने बॉलिवुडचा बादशहा शाहरूख याला खुन्नस दिली. अमिताभ आणि शाहरूख हे बॉलिवुडमधील दोन गटांचे म्होरके मानले जातात. बॉलिवुडमधील राजकीय समीकरणांचा विचार केला तरीही शिवसेनेचा बच्चन यांच्याशी असलेला दोस्ताना लक्षात घेऊनही शाहरूखला शिवसेनेशी पंगा घ्यायचा नाही हेच संकेत त्याने जाहिरातीद्वारे दिल्याचे बोलले जात आहे.


4 comments:

  1. पेपर चालविताना जाहीराती स्विकाराव्या लागतात म्हणुन घ्यावी लागली असेल. त्यात फार मोंठे गैर आहे असे वाटत नाही परंतु............... ज्याचे त्याने ठरवावयाचे

    ReplyDelete
  2. मान्य, पण सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे आणि त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर केला पाहिजे ... इथे कार्यकर्ते लाठ्या खातात आणि नेते ज्यांच्या विरुद्ध हे सर्व केले त्यांच्या गळ्यात गळे घालतात हे कार्यकर्त्यांचं खच्चीकरण आहे ....

    ReplyDelete
  3. खर आहे पण सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी ह्याच मार्गाने जातात. कोणिही अपवाद नाही.

    ReplyDelete
  4. आपल्या पक्षाच्या स्वार्थाकरता तडजोड आम्हाला मान्य आहे .... जेव्हा राज साहेबांनी कॉंग्रेस ला वोटिंग करायची ठरवली तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबाच दिला कारण त्याद्वारे आमचे चार आमदार विधानसभेत परत जाणार होते .... ह्या प्रकरणात शिवसेनेला काहीच फायदा नाही म्हणून राग येतो .... कोणीही धुतल्या तांदळाचे नाही पण राजकारणात आपल्या पक्षाचे हित साधने गैर नाही .. शेवटी राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नाही आणि मित्र नाही पण कोणाला शत्रू आणि कोणाला मित्र ठरवायचे हे चतुर राजकारणी त्या त्या वेळेस बरोबर ठरवतो

    ReplyDelete