प्रताप आसबे चां म टा मधील एक सुंदर लेख
खरं म्हणजे ह्या राज्यकर्त्याना सगळी कड़े स्वताचं स्वार्थच दिसतो ... त्यानां लोकांच्या प्रश्नांचे काही सोयरसुतक नाही ....
म टा च्या सौजन्याने
- प्रताप आसबे
आघाडीच्या सरकारमध्ये मतभेद पाचवीलाच पुजलेले असतात। उभयपक्ष हमरीतुमरीवरही येतात. पण पुन्हा दोन्ही बाजू ताठरपणा सोडून कामाला लागतात. पण परवा जे झालंय त्यामुळे वेगळेच रंग दिसू लागले आहेत... ......
अशोक चव्हाण आता मुख्यमंत्रीपदावर चांगलेच रुळले आहेत। सुरुवातीला ते काहीसे धांदरट वाटत होते. नव्याने एकाद्या प्रश्नावर भूमिका घ्यायची म्हटल्यावर ते थोडेसे गडबडतात. राजकीय भूमिकेचे त्यांचे अंग थोडे कच्चे आहे. त्यामुळे मराठीच्या बाबतीत ते असेच गडबडले होते. असे एकदोनदा झाल्यानंतर ते धांदरट तर नाहीत ना, अशी शंका यायला लागली. पण काहीही म्हणा; राहुल गांधी यांचा दौरा आणि त्याहीपेक्षा शाहरुखच्या 'माय नेम इज खान'ने त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला हे मात्र खरे. राहुल गांधींचा दौरा पूर्णपणे दिल्लीतून आयोजित केला होता. त्यात एसपीजीचा मोठा हात होता. त्यांनी सेनेचा असा काही कात्रजचा घाट केला की विचारता सोय नाही. त्यात ती इतकी बिथरली की कारण नसताना खानच्या मागे लागली. पण अशोकरावांनी लावलेली टाईट फिल्डिंग पाहून ढाणे वाघ इतके भेदरले की त्यांनी नख्या खुपसून आपलेच कोथळे बाहेर काढले. सकाळ, संध्याकाळ डरकाळ्या फोडणारी सेना एका फटक्यात गळफटलेली पाहून अशोकरावांना प्रथमच मुख्यमंत्रीपदाचे भान आले. साहजिकच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आत्मविश्वासाने कारभार करू लागले.
तसा अशोकरावांचा फार कुणाशी दोस्ताना नाही। एकदोघांचा अपवाद वगळला तर फारसा कोणावर विश्वास नाही. थट्टा, मस्करी, विनोद यांचे वावडे. मोकळेपणाने खळखळून बोलणे तर लांबच. चेहरा टवटवीत, तरीही रुक्षच. मंत्री म्हणून ते एकांडे शिलेदार होते. विलासराव शंकररावांचे लाडके होते. पण यांचे त्यांचे कधीच जमले नाही. श्ाेष्ठींवर मात्र अगाध श्ाद्धा. या श्ाद्धेमुळे की काय, पण चव्हाणांना परंपरेने श्ाेष्ठींचा वरदहस्त कायमच लाभत आला आहे. मग तो इंदिराजी, राजीवजींचा असो की सोनिया, राहुलचा. शंकररावांचेही असेच होते. अशोकराव हे शंकररावांप्रमाणेच मुख्यमंत्री म्हणूनही एकांडे शिलेदार आहेत. एकदोघे त्यांच्या मागेपुढे असतात. पण त्यांचीही झेप कुंपणापर्यतच आहे. सांगायचा मुद्दा असा की वर सोनिया-राहुल आणि इथे अपवाद वगळले तर काँग्रेसमध्ये फारसे कुणी त्यांच्याबरोबर नाही. तो काही मोठा दोष नाही. मुख्यमंत्री सार्वभौम असतात. परंतु राज्यकारभार हा केवळ तांत्रिक, कायद्यानुसार आणि घटनेनुसार करता येत नाही. ती एक कला आहे. शास्त्रीय संगीतासारखी. ती ज्याला जमते तेच राज्यकारभाराचे वाद्य यशस्वीपणे वाजवू शकतात. ही कला नसेल तर एका पक्षाचे सरकार असतानाही अडचणी निर्माण होतात. समतोल ढळतो. राज्यात गेली १० वषेर् एकपक्षीय नव्हे तर आघाडीचे सरकार आहे. आघाडीच्या सरकारची संस्कृती आणखीनच वेगळी असते. मंत्री या नात्याने अशोकरावांनाही त्याचा अनुभव आहे. यात राष्ट्रवादी आणि एकेकाळी भाजप यांच्यासारखे दुय्यम पक्ष खूप त्रास देतात. त्यांच्याकडे छगन भुजबळ, अजित पवार आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे वजनदार नेते असतात. संसदीय डावपेचात ते तरबेज असतात. त्यांचे अहंगंड आणि हितसंबंध मोठे असतात. तुम्हाला अहंगंड आणि हितसंबंध नसतील तर त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नाही. पण इथे सगळ्यांचेच पाय मातीचे आहेत. महाराष्ट्रात गेली २० वषेर् केवळ हितसंबंधांचे राजकारण चालू आहे. बरोबर चूक हा प्रश्न नाही. ते वास्तव आहे. आपल्या हिताची फाईल असेल तर मंत्री थेट मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जातात. संबंधित खात्याच्या मंत्र्याकडेच नव्हे तर राज्यमंत्र्यांकडेही पायधूळ झाडायला कमी करत नाहीत. विलासराव तर लिफ्टमधून बाहेर पडता पडता सह्या करायचे. काय आहे ते त्यांना बरोब्बर कळायचे. शिवाय, त्याचे दुकान बंद झाले तर आपला मॉल कसा चालेल, असाही प्रश्न होता. पण अशोकरावांना ही दुकाने अजिबात पसंत नाहीत. एखादा दुसरा अपवाद सहन करून बाणेदारपणाने सांगतात की यापुढे तुम्ही फाईल आणायची नाही, ती प्रॉपर चॅनलनेच आली पाहिजे. पुढच्यावेळी फाईल आणली तर सही करणार नाही. यातून स्वपक्षीयांपासून अनेकजण दुखावले आहेत. पण अशोकरावांनी त्यांच्या रागलोभाची पर्वा केली नाही. भुजबळांसारख्यांनाही त्यांनी नाकी नऊ आणले. आपल्याला करायचे तेच केले.
मुख्यमंत्र्याकडे अल्लाउद्दिनच्या जादूच्या दिव्याप्रमाणे एमएमआरडीए आहे। तो एकच वेळेस मुंबई महापालिका, एमएसआरडीसी, पीडब्ल्युडी, हाऊसिंग अशा कुठेही तो कामी येतो. मुख्यमंत्र्यांनी ठरविले की मुंबई-ठाण्यासंबंधातील कोणतीही कामे ते या माध्यमातून करू शकतात. अशोकरावांनी हे पक्के ध्यानात घेऊन धडाधड कामे काढली. बीओटी हे एक नवीन हत्यार राज्यर्कत्यांच्या हाती आले आहे. एमएमआरडीए आणि बीओटी यांची जेव्हा सांगड होते तेव्हा तर इंदाचा ऐरावत वर्षाबाहेर डोलायला लागतो. अशावेळी संबंधित खाती आणि त्यांच्या मंत्र्यांना बोटे मोडण्याशिवाय गत्यंतर नसते. मग मंत्री कोणत्या का पक्षाचा असेना. कारण एका बाजूला आकडेमोड आणि दुसऱ्याबाजूला बोटेमोड अव्याहत चालू आहे. दुकाने बंद पडताहेत आणि मॉल तेजीत आहे.
पण परवा म्हणे अजित पवार यांनीही मुख्यमंत्र्यांवर तोफ डागली। विषय अनेक होते. एमएमआरडीएपासून सगळेच. विधान परिषदेच्या कोकणातील निवडणुकीत नारायण राणेंचा अपवाद वगळला तर झाडून सगळे काँग्रेसवाले राष्ट्रवादीच्या बंडखोर उमेदवाराच्या मागे उभे आहेत. त्यामुळेच अजितदादांचा पारा एकदम चढला असावा. मुख्यमंत्री एरवी सबुरीची भाषा करतात. पण यावेळी त्यांनीही दुप्पट आवाजात खडे बोल ऐकवले. आधी भुजबळ आणि आता अजितदादा या राष्ट्रवादीच्या दोघा बिनीच्या सरदारांना त्यांनी बघता बघता गारद केले. काँग्रेसची वाढती लोकप्रियता आणि पक्षश्ाेष्ठींचा खंबीर पाठिंबा या बळामुळेच त्यांना हे शक्य झाले, यात शंका नाही. आघाडीच्या सरकारमध्ये मतभेद पाचवीलाच पुजलेले असतात. उभयपक्ष हमरीतुमरीवरही येतात. पण पुन्हा दोन्ही बाजू ताठरपणा सोडून कामाला लागतात. सरकार चालवायचे असते. पक्ष चालवायचा असतो. लोकांची कामे करून स्पधेर्त पुढे राहायचे असते. हितसंबंध सांभाळायचे असतात. पण गेली काही महिने आणि विशेषत: परवा जे काही झाले त्यामुळे उभयतांत कमालीची कटुता निर्माण झाली आहे. दुसऱ्या फळीत मतभेद झाले तरी पहिल्या फळीचे नेते गाडा हाकत असतात. पण या प्रकारात तेही दुखावले आणि दुरावले आहेत. त्यामुळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोघेही हळूहळू ताठर भूमिकेत चालले आहेत. स्फोट कधी व्हायचा तेव्हा होवो; वात मात्र पेटली आहे, एवढे निश्वित.
Subscribe to:
Post Comments (Atom)
खुप मस्त लेख लिहला आहे आवडला
ReplyDelete