Wednesday, March 17, 2010

महेश भट्ट आगाऊ कार्ट - राज ठाकरे

म टा च्या सौजन्याने

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मनसेच्या कार्यकर्त्यांवर खंडणीचाआरोप करणारे सिनेनिर्माते महेशभट्ट यांची आगाऊ कार्ट अशाशब्दांत मनसेचे अध्यक्ष राजठाकरे यांनी आज संभावना केली । ‘ मी महाराष्ट्राचा , महाराष्ट्रमाझा ’ या पाक्षिकाच्या प्रकाशनसोहळ्यात ते बोलत होते . महेशभट्ट यांच्या तक्रारीवरूनच खंडणीप्रकरणी मनसेच्या ११कार्यकर्त्यांना अटक करण्यातआली होती .

राज ठाकरे यावेळी भाषणात म्हणाले की , वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये सुरूअसलेल्या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये परदेशी कलावंतांचा सहभाग आहे , तसेच याकलाकारांकडे वर्क परमिटही नाही , असे मनसेच्या कार्यकर्त्यांना समजले । हीच बाबलक्षात आणून देण्यासाठी कार्यकर्ते तेथे गेले होते , पण चित्रपट निर्माते महेश भट्ट यांनीत्यांच्यावर खंडणी मागितल्याचा खोटा आरोप केला . जर कोणीही परदेशातून विनापरवानगी आपल्या देशात येत राहतील तर २६ / ११ सारखे हल्ले भारतात होतचराहतील . सरकारने याकडे गंभीरपणे लक्ष द्यावे . जर सरकार याकडे लक्ष देणारनाहीत तर आमची आंदोलने अशाच पद्धतीने सुरू राहतील , असे त्यांनी बजावले .

गेल्या दोन वर्षात मनसेच्या दणक्याने मराठीला एक विशिष्ट जागा मिळवून दिली ,असाच प्रयत्न या पाक्षिकातही करण्यात आला आहे . महाराष्ट्र , मराठी माणूस आणिमराठी अस्मिता यांना पूर्णपणे वाहिलेले हे पाक्षिक आहे , असे संपादक शिरीष पारकरयांनी सांगितले . पाक्षिकांचे प्रकाशन राज ठाकरेंसह विष्णू झेंडे आणि श्रीमती शर्मायांनीही केले . मराठीबाबत अन्य समाजात बरेच गैरसमज आहे , हेच गैरसमज दूरकरण्याचा प्रयत्न पाक्षिकात केला आहे . पाक्षिकात अनेक विचारवंतांचे लेख आहेत ,असे पारकर म्हणाले .

6 comments:

  1. १)परदेशी लोकांना भारतात येण्यासाठी व्हिसा घ्यावा लागतो. जे कोणी इथे त्या स्टूडीओ मधे लोकं होते ते सगळे व्हॅलीड व्हिसा घेउन आलेले परदेशी पर्यटक होते.
    २) या परदेशी पर्यटकांकडे वर्क व्हिसा नाही असं राज म्हणतात, जे भारतिय विद्यार्थी, गृहीणी, अमेरिकेत जाउन रहातात, ते पण विना परमीट खालच्या दर्जाची कामे करतातच, म्हणजे ते सगळ टेररिस्ट झाले का?
    ३) याच भाषणात राज ठाकरे असंही म्हणाले की ११ लोकं खंडणी मागायला लागतात कां? मला विचारायचंय किती लोकं पाठवावे लागतात खंडणी मागायला हे पण सांगितलं असत तर जास्त बरं झालं असतं.उगिच काहीतरी निरर्थक बोलण आहे हे असं झालं!!

    ReplyDelete
  2. हे जे वर लिहिलं ते जरी खरं असलं, तरीही त्याच बरोबर राज चं मराठी प्रेमाबद्दल काहीच शंका घेतली जाउ शकत नाही.
    राज च्या ज्या कॉमेंट्स असतात त्या ’मासेस’ साठीच जास्त असतात म्हणून त्या पटत नाहीत.
    शिवसेनेचे हिंदु प्रेम अजुन शिल्लक आहे. कालच हा (http://img80.yfrog.com/i/2j6.jpg/)फोटो पाहिला, आणि एक गोष्ट मनात आली की जर पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम दंगल झाली तर राज कुणाकडून असेल?? केवळ हा एकच मुद्दा आहे म्हणुन अजुनही शिवसेना थोडी जास्त जवळची वाटते.
    गैरसमज नसावा.

    ReplyDelete
  3. महेन्द्रजी, किती दिवस आपण धर्माचं राजकारण करणार आहोत। राज साहेबानी सांगितला आहे की जर महाराष्ट्राला प्रगति पथावर न्यायचा असेल तर सर्व धर्मियाना आणि सर्व जाती तिल लोकाना एकत्र घेउन जावं लागेल आणि आम्हाला ते मान्य आहे । महाराष्ट्रासाठी सध्या विकास महत्वाचा आहे , दंगल नाही । देव करो आणि महाराष्ट्रावर असा प्रसंग परत न येवो । शिव सेनेचं हिन्दू प्रेम शिल्लक आहे म्हणून ती जवळची वाट-ते, हे काही पटत नाही , असो तो तुमचा वयक्तिक प्रश्ना आहे ।

    ReplyDelete
  4. राजठाकरेंच्याच वेब साईटवर एक लेख आहे. जानेवारी २९ , २००७ चा. ( ही लिंक आहे -http://mnsena.blogspot.com/2007/01/blog-post_342.html) यामधे तुम्हाला खालच्या भागात हा पॅरीग्राफ दिसेल, त्या मधे म्हंट्लं आहे की
    ----"काही धर्मांधांमुळे आपण ' त्यां ' च्यातील चांगली माणसे नाकारायची का , अब्दुल कलाम आणि इरफान पठाण नाकारायचे का , असा सवाल त्यांनी केला. मात्र , कोणत्याही समाजापुढे लांगूलचालन करणार नाही , निवडणुका आल्या म्हणून ' टोप्या ' घालणार नाही , असेही त्यांनी निक्षून सांगितले. मोहंमद पैगंबरांचे चित्रच नाही , तर व्यंगचित्र कसे काढले , असा सवाल करून राज यांनी या प्रश्ानवर आपण मुस्लिमांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही धर्माचा अपमान करणे चुकीचेच आहे , असे सांगून राज म्हणाले की , एम. एफ. हुसेन यांनी हिंदू देवतांची आणि भारतमातेची नग्नचित्रे काढली , त्याच्या निषेधार्थही मुस्लिमांनी एवढाच तीव्र निषेध करायला हवा."

    ह्या बॅग्राउंडवर तो फोटो पाहिला तेंव्हा थोडं विचित्र वाटलं. दुसरं म्हणजे एकाही मुस्लिम इंटेल्क्चुअल ने त्या हुसेनच्या चित्रांचा विरोध केला नव्हता.इव्हन राज ने पण हुसेनचा धिककार करण्याचे टाळले होते.. असो..
    उत्तराकरीता आभार. तुमचा ब्लॉग नियमीत वाचत असतो . छान कव्हरेज आहे. पुन्हा एकदा आभार.

    ReplyDelete
  5. Vinod kumar jee,

    Mhanje tumhala Bhashecha Rajkaran chalata ani Dharmacha nahi?Ani yach varun aapan he pan bolu shakato kee Kiti divas aapan Dharmacha,Bhashecha rajkaran karnar aahot?Bharatala Pragati pathavar nena jast jaruri nahi ka?

    ReplyDelete
  6. समीर तुमचा मुद्दा योग्य आहे पण आम्ही भाषेचं राजकारण करतो असं म्हणन्या पेक्षा आम्ही मराठी माणसा साठी राजकारण करतो हे म्हणने जास्त योग्य ठरेल। भारत प्रगति पथावर जायला हवा ह्या बाबतीत दुमत नाही पण सुरवात तर राज्या पासून करावी लागेल ना? महेंद्र जी नि पाठवलेला फोटो हा सार्वजनिक फोटो नाही तर वयक्तिक काढलेला आहे आणि माझ्या माहिती प्रमाने राज साहेब "टोपी" घालणारं राजकारण करणार नाहीत हे नक्की। तुमच्या प्रतिक्रियां बद्दल धन्यवाद ।

    ReplyDelete