Monday, September 27, 2010

मुनगंटीवार काय हे, उचलली जीभ लावली टाळ्याला?

काल भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्या मेळाव्यात प्रदेशाधक्ष्य मुनगंटीवार ह्यांनी काय अकलेचे तारे तोडले ते वाचा .... ते म्हणतात राज साहेब ह्यांना कल्याण डोंबिवलीतील खड्डेच दिसतात काय? पावसामुळे सर्वच ठिकाणी खड्डे पडले आहेत .... अरे लाज वाटली पाहिजे असली वक्तव्य करायला ..... आम्ही कल्याणकर आणि डोंबिवलीकर जाणतो सध्याची रस्त्याची अवस्था ..... आता पाऊस थांबून पंधरा दिवस झाले पण रस्त्याच्या स्थितीत काही सुधारणा नाही .... तुमचे नगरसेवक / महापौर / उपमहापौर काय झोपले आहेत काय ??? आधी खडकपाडा / मुरबाड रोड येथे जाऊन रस्त्याची पहाणी केली असती तर त्यांनी असली वक्तव्य करणे टाळले असते .......

अजून पुढे ते म्हणतात ... मनसे ला वोट म्हणजे कॉंग्रेस ला वोट (ही युतीची जुनीच खोड आहे, त्यामुळे आम्ही ह्यांच्याकडे लक्ष देत नाही ) ... मग बदलापूर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर सध्या कोणाची युती / आघाडी आहे ??? जर प्रदेशाधाक्ष्याना माहित नसेल तर सांगतो ... भारतीय जनता पार्टी सध्या बदलापूर मध्ये ७ नगरसेवकाच्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या पाठीवर सत्तेवर आहे .... मग आम्ही म्हणू काय .... बी जे पी ला वोट म्हणजे .... राष्ट्रवादी ला वोट ........ युतीने आता कल्याण डोम्बिवली मधून आपला गाशा गुंडाळावा ........

आपला विनोद

खालील बातमी लोकसत्ता च्या सौजन्याने ........



मुनगंटीवार यांचा आरोप
डोंबिवली, २६ सप्टेंबर/प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शरद पवारांनी जन्माला घातले आहे. राज ठाकरे यांना केवळ कल्याण-डोंबिवलीतील खड्डे दिसतात का? राज्यात सर्वच ठिकाणी पावसामुळे खड्डे पडले आहेत ते त्यांना दिसत नाहीत, कारण मनसे म्हणजे शरद पवारांची टेस्ट टय़ूब बेबी आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना भाजपा युतीच्या मेळाव्यात केली. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे खा. मनोहर जोशी, भाजपाचे सरचिटणीस आ. विनोद तावडे, खा. आनंद परांजपे, ठाणे जिल्हा संपर्कमंत्री आ. एकनाथ शिंदे, आ. संजय केळकर, आ. रवींद्र चव्हाण, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे विभागाचे भाजपाचे अध्यक्ष सुरेश टावरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अपक्ष नगरसेविका मंगला सुळे यांनी भाजपात प्रवेश केला. युतीचे राजकारण समाजहिताचे असून, काँग्रेस आघाडीने पैशाच्या जोरावर सत्ता प्रस्थापित करण्याचे आरंभिले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्वाभिमान मुख्यमंत्र्यांच्या खिशात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची हुजरेगिरी करत विधान परिषद निवडणुकीत मनसेने कोणाच्या पारडय़ात मत टाकले आहे हे आपण पाहिलेच आहे. मनसेला मत म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीला मत हे गणित सर्वांनी लक्षात घ्यायला हवे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. येत्या निवडणुकीत युतीशी गद्दारी करणार नाही, अशी प्रतिज्ञा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आत्ताच करा, असे आवाहनही त्यांनी केले. डोंबिवली-कल्याण महापालिकेची निवडणूक म्हणजे आगामी विधानसभेची रंगीत तालीम आहे, असेही ते म्हणाले. शिवसेना नेते मनोहर जोशी यांचेही यावेळी भाषण झाले.

3 comments:

  1. मुंबईच्या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबरोबर या पावसाळ्यात मुंबई थबकली
    नाही याची नोंद घ्यावयास हवी होती.

    ReplyDelete
  2. मुनगंटीवार च्या मानगुटीवर बसायची वेळ आली आहे...:)

    ReplyDelete
  3. काल आय बी न वर मुनगंटीवारांची बोबडी वळली होती .... सर्व महाराष्ट्राने पहिले ...... कुठले संदर्भ कुठेही लावत होते .... आम्हाला बोलण्याआधी स्वताची आघाडी मोडा राष्ट्रवादी बरोबर बदलापूर मध्ये .... आणि हो Anonymous, मुंबई थबकली नाही मान्य आहे पण खाच खळग्या मध्ये बुडाली ... जरा एकदा कल्याण / डोम्बिवली मध्ये येऊन अवस्था बघा मग कळेल ... आणि कोणी चांगले काम केलं तर आम्ही क्रेडीट देऊच ....

    ReplyDelete