Monday, September 20, 2010

नेत्यांची 'संस्कृती', लोकांचा 'संघर्ष'

खालील लेख हा महाराष्ट्र टाईम्स मधून घेतला आहे ..........

प्रश्न सोडवायचे नाही पण कामाची प्रसिद्धी घेण्या करिता धावायचे हीच नेत्यांची प्रवृत्ती, अजून काय?



20 Sep 2010, 0056 hrs IST
संदीप शिंदे


टोल नाक्यावरील आंदोलनात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा जो संघर्ष रविवारी उडाला तो ठाण्यातील नेत्यांच्या प्रतिमेला साजेसाच होता. सवंग प्रसिद्धी आणि एकमेकांवर कुरघोडीचे भूत येथील नेत्यांच्या मानगुटीवर स्वार असल्याची प्रचीती पुन्हा एकदा आली. ठाण्यातील जवळपास सर्वच नेत्यांमध्ये सवंग प्रसिद्धीची 'संस्कृती' घट्ट रुजू लागलेली आहे. प्रसिध्दीच्या या झोतामुळे सर्वसामान्यांच्या जीवन मरणाशी निगडित असलेले असंख्य प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, याचा विसर इथल्या नेत्यांना पडलाय. लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत एखादे पत्रक काढले आणि आंदोलने केली म्हणजे आपले काम संपले, अशीच भावना शहरातील बहुसंख्य नेत्यांमध्ये रुजली आहे. शहराच्या प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी कोणतेही ठोस प्रयत्न करत नसल्याने सर्वसामान्यांना छोट्या छोट्या प्रश्नांसाठी 'संघर्ष' करावा लागतोय, हे या शहराचे दुदेर्व आहे.

महिन्याभरापूवीर् मुंबई विद्यापीठाच्या उपकेंदाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर गडकरी रंगायतन येथे झालेल्या एका कार्यक्रमात या उपकेंदाचे श्रेय लाटण्याची स्पर्धा आ. एकनाथ शिंदे, राजन विचारे, जितेंद आव्हाड, संजय केळकर आदी राजकीय नेत्यांमध्ये रंगली होती. ठाण्यात उपकेंद असावे ही मागणी सर्वप्रथम १९९९ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर भूमिपूजनासाठी अकरा वषेर् लोटली. एवढ्या छोट्या कामासाठी तब्बल अकरा वर्षांची प्रतीक्षा हा इथल्या राजकीय नेतृत्वाला आपला पराभव वाटत नाही. मध्यंतरी कळव्यातील झीरो लोडशेडिंगचा मुद्दा असाच गाजला. १ जुलैपासून कळव्यात लोडशेडिंग होणार नाही, असे एमईआरसीने जाहीर केल्यानंतर आ. जितेंद आव्हाड यांनी 'कळवा लोडशेडिंग मुक्त झाला', असे होडिर्ंग झळकवले. मात्र, दोन महिने लोटले तरी ही घोषणा प्रत्यक्षात आलेली नाही. एमएमआरडीए ठाण्यात मोनो आणि मेट्रो रेल्वे सुरू करणार, अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर लगेचच एका प्रतिष्ठानने आ. प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश अशा आशयाचे होडिर्ंग घोडबंदर रोडवर झळकवले होते. त्यामागे कुणाची 'प्रेरणा' होती हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ठाण्यातील प्रस्तावित शॅलो वॉटर पार्क असो किंवा शाई धरण असो... प्रत्येकाचे श्रेय लाटण्याची स्पर्धाच इथे पहायला मिळते,

एखाद्या नवीन योजनेचे बिगुल वाजले की ती योजना माझ्याच प्रयत्नाने कशी सुरू झाली आहे, हे सांगण्यासाठी नेत्यांची चढाओढ लागते. मात्र, रखडलेली कामे मागीर् लावण्यासाठी कुणीही ठोस प्रयत्न करत नाही. एखादी समस्या खूप चिघळली की त्याबाबतचे एक निवेदन मुख्यमंत्र्यांना किंवा संंबधित अधिकाऱ्यांना पाठवायचे किंवा छोटेमोठे आंदोलन करून मोकळे व्हायचे, असाच पवित्रा येथील बहुसंख्य नेते घेतात. आपण लोकप्रतिनिधी आहोत. इथल्या लोकांच्या भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे, याची जाणीव या नेत्यांना आहे का, हा देखील संशोधनाचा विषय ठरू शकतो. नागरिकरणामुळे निर्माण होणारे अनेक प्रश्न आज ठाण्यात आ वासून उभे आहेत आणि लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांची सोडवणूक करून, शहराच्या विकासाला ठाम दिशा देऊन लोकांचे दुवा घेण्याची सुवर्णसंधी नेत्यांना आहे. त्यामुळे प्रसिद्धीसाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची जेवढी धडपड हे नेते करतात, तेवढीच धडपड शहराच्या विकासासाठी त्यांनी दाखवावी अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्या सुमारे चार लाख प्रवाशांची अपुऱ्या पुलांमुळे रोज घुसमट होते. घोडबंदरच्या सव्हिर्स रोड अभावी अनेकांचे जीव जात आहेत. कोपरी आणि विटाव्याच्या पुलांमुळे हजारो ठाणेकरांचे हाल होतात. रस्ते खड्ड्यात गेले आहेत. रस्त्यारस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेत. पाकिर्ंग प्लाझा नसल्याने प्रत्येक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. टीएमटीची अंत्ययात्रा काढून नेत्यांनी प्रसिद्धी लाटली. मात्र, या टीएमटीला नवसंजीवनी देण्यासाठी ठोस प्रयत्न होत नाहीत. एकात्मिक नाले विकास योजना, बेसिक सव्हिर्सेस फॉर अर्बन पुअर (बीएसयूपी), मलनि:सारण योजनांसाठी केंद सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आला. त्यालाही भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याने या कामांच्या दर्जा खालावला आहे. ही कामे योग्य पध्दतीने व्हावीत, यासाठी कुठलाही नेता कधीही भांडताना दिसत नाही. ठाणे शहरातील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये वारंवार सिद्ध केली आहे. मात्र, या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दजेर्दार शाळा आणि कॉलेज शहरात उभारण्याची गरज एकाही नेत्याला वाटत नाही.

एकट्या ठाणे शहरात विधानसभेचे चार आणि विधान परिषदेचे दोन असे सहा आमदार आहेत. त्यापैकी वसंत डावखरे हे गेल्या अनेक वर्षांपासून विधान परिषद उपासभपती या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दबदबा आहे. जितेंद आव्हाड तर थेट शरद पवारांचे 'ब्लू आईड बॉय' म्हणून ओळखले जातात. प्रताप सरनाईक यांची सर्वपक्षीय आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांशी जवळचे संबंध आहेत. स्वत:चे प्रस्थ निर्माण करणाऱ्या या नेत्यांना शहराच्या विकासाला मात्र ठोस 'व्हिजन' देता आलेली नाही.

शहराच्या विकासाचे नियोजन करण्यात लोकप्रतिनिधींची महत्त्वाची जबाबदारी असते. त्यामुळे नेत्यांनी आपला दृष्टीकोन आता तरी बदलायला हवा. लोकप्रतिनिधी खमका असेल तर त्या परिसराचा सर्वांगीण विकास होतो, हे पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी दाखवून दिले आहे. त्या नेत्यांचा आदर्श ठाण्यातील नेत्यांनीही ठेवायला हवा. त्यासाठी मुळात विकासाची 'व्हिजन' आणि तळमळ आपल्याला आहे, हे नेत्यांना दाखवून द्यावं लागेल. लाखो रुपयांची उधळण करणाऱ्या हंड्या उभारून नेते सॉलिड हिट झाले. शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देत ते 'सुपर हिट' व्हावेत, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. विघ्नर्हत्याने तेवढी सुबुध्दी या नेत्यांना द्यावी, एवढीच प्रामाणिक प्रार्थना.

No comments:

Post a Comment