Tuesday, September 28, 2010

मनसेचे मिशन केडीएमसी!

सर्व कल्याण आणि डोम्बिवली करांना आवाहन आहे कि त्यांनी आपले वोट राज साहेबांच्याच (मनसे च्या) पारड्यात टाकावे ......

खालील बातमी महाराष्ट्र टाईम्स मधून घेतली आहे .....

म. टा. प्रतिनिधी

कोणत्याही परिस्थितीत कल्याण-डोंबिवलीची सत्ता मिळवायचीच, या जिद्दीने निवडणुकीच्या मैदानात उतरलेले मनसे प्रमुख राज ठाकरे जाहीर सभा घेऊन कल्याण-डोंबिवली पिंजून काढणार आहेत. ठाकरेंची तोफ कल्याण व डोंबिवलीत तब्बल ४ सभांमधून धडाडणार असल्याने मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. त्याच वेळी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या कार्यर्कत्यांच्या मुलाखतींना मंगळवारपासून प्रारंभ होत आहे.

मागील ५ वर्षांत कल्याण-डोंबिवलीकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व शिवसेना-भाजप युती अशा सर्वच प्रमुख पक्षांची राजवट अनुभवली. या दोन्ही राजवटींत कल्याण-डोंबिवलीची पुरती वाट लागली व एकाही पक्षाची कामगिरी सर्वसामान्यांना दिलासादायक ठरली नाही. या पार्श्वभूमीवर मनसेकडून मतदारांना बऱ्याच अपेक्षा आहेत.

विधानसभा निवडणुकीत मनसेला नाशिकपाठोपाठ सर्वाधिक यश कल्याण पट्ट्यात मिळाले. कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण मतदारसंघातून पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले. विधानसभेपाठोपाठ महापालिकेतील सत्ता काबीज करण्याची नामी संधी मनसेला यंदा चालून आली आहे. त्यामुळे निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला असून पक्षाच्या प्रचाराची धुरा स्वत: राज ठाकरे यांच्या खांद्यावर असेल.

निवडणुकीची रणनीती ठरवण्यासंदर्भात सोमवारी मुंबईतील राजगड कार्यालयात राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीतील निर्णयानुसार मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत मनसेची निवडणूक समिती इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. आमदार बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखालील या समितीमध्ये शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, मनोज चव्हाण, शालिनी ठाकरे, यांच्यासह स्थानिक आमदार प्रकाश भोईर व रमेश पाटील यांचा समावेश आहे. ही समिती मंगळवारपासून प्रभागनिहाय मुलाखती घेईल. समितीने निवडलेल्या इच्छुकांमधून पक्षाचा अधिकृत उमेदवार राज ठाकरे निवडणार आहेत. त्यासाठी ठाकरे ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान डोंबिवली-कल्याणमध्ये तळ ठोकतील असे समजते.

निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी मुख्य समितीसह केदार आंेबाळकर यांच्यासह विनय भोईटे, राजन गावंड आणि मनोहर चुगदरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत मनसेचे उमेदवार निश्चित झाल्यावर प्रचारावर लक्ष केंदित केले जाणार आहे. राज ठाकरे कल्याण व डोंबिवलीत पूर्व आणि पश्चिमेला प्रत्येकी १ अशा ४ सभा घेणार असल्याचे समजते. ठाकरे यांच्या सभांना कल्याण-डोंबिवलीत उसळणारी गदीर् पाहता या रणनीतीमुळे शिवसेना-भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

No comments:

Post a Comment