Friday, April 23, 2010

आयपीएलची पाळेमुळे खणाः राज

म टा च्या सौजन्यानेमटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

आयपीएलमध्ये जो काही भ्रष्टाचार झाला आहे. ते खणण्याचे काम सुरू झाले आहे. असे खणत असताना जर मध्ये कुठे पाइपलाइन आली तर ते काम थांबवू नका, या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत केली.

मनसेच्या वतीने खाद्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्याच्या उद्घाटनाच्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. आयपीएलमध्ये भ्रष्टाचार होतो आहे म्हणून आयपीएल बंद करणे किंवा क्रिकेट बंद करणे हा उपाय होणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बड्या माशांनाही जाळ्यात अडविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

राज्य सरकारने आयपीएलला करमणूक कर रद्द का केला असा सवाल उपस्थित करत राज म्हणाले, असा कर रद्द करायला हे कोणी सांगितले. ते काय ललित मोदींनी सांगितले नाही. यात पवार यांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. हा प्रकार उघडकीस आला नाही तोपर्यंत शरद पवार याच ललित मोदीचे गोडवे गात होते. परंतु आता या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असे ते म्हणतात. याचा काय अर्थ होतो. ललित मोदी या व्यक्तीवर अमेरिकेत अमंली पदार्थांच्या तस्करीचा गुन्हा दाखल आहे. अशा व्यक्तीबद्दल पवारांना माहित नाही. अशाच पार्श्वभूमीची माणसं यांच्या भोवती कसे जमतात असा सवालही त्यांनी यावेळी केला. प्रफुल पटेल आणि पवार यांच्या राजीनाम्याने काही होणार नाही. केंद्र सरकारने स्वच्छता करायची असेल तर ती मुळापासून करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मला राहून राहून एक प्रश्न पडतो आहे. पवार साहेब म्हणतात की आयपीएलशी माझा काही संबंध नाही. मग राज्य सरकारने आयपीएलवरील करमणूक कर कोणाच्या आदेशावरून रद्द केला. याचे मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्र्यांनी राज्याच्या जनतेला द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

प्रकाश झोतात सामने, राज्यात लोडशेडिंग
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात आयपीएलचे सामने झाले. त्यातील बहुतांशी हे प्रकाश झोतात झाले. महाराष्ट्रातील अनेक भागात आज लोडशेडिंग होत असताना महाराष्ट्राच्या सरकारने असे सामने खेळवून त्यांना करमणूक कर का लावला नाही, असा प्रश्न निर्माण होतो आहे.

थरूर अफेअर्स मिनिस्टर
थरून हा माणूस एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर नव्हता तर तो अफेअर्स मिनिस्टर होता. रोज उठून नवा वाद, त्यामुळे तो गेला ते बरं झालं. अति हुशार विक्षिप्त माणसं असतात ना त्यातील हा प्रकार आहे.

लता दिदी राजकीय शिबिरात गाणार नाही
लता दिदी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे, पण या कोणत्याही पक्षाच्या शिबिरात गाणार नसून त्या १ मे म्हणजे महाराष्ट्रदिनाच्या कार्यक्रमात गाणार आहेत. त्या माझ्या कार्यक्रमातच आल्या होत्या.

कशातही महाराजांचा झटका
कोणालाही महाराजांच्या नावाचा झटका आला तर ते महाराजांबद्दलचे प्रेम होत नाही. त्या झटक्याला आम्ही विरोध केला तर मग आम्ही महाराजांना विरोध करतोय असे ते म्हणतात. माझा पक्ष महाराजांना विऱोध करे असे स्वप्नातही शक्य आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

शिवाजी पार्कच्या कामात लोकांना विश्वासात घ्यावे
शिवाजी पार्क येथे होणा-या कामाबद्दल तेथील नागरिकांना विश्वासात घेवून काम करणे गरजेचे आहे.

मनसेतून त्यांनी खुशाल बाहेर जावे
मनसेमधून कोणी बाहेर पडणार असल्याची मला आताच माहिती मिळाली. त्यांना जर जायचं तर त्यांनी खुशाल जावं, असे राजन राजे यांचे नाव न घेता त्यांनी सांगितले.

7 comments:

 1. विनोद,

  महाराष्ट्र पर्यटन विभागाची साईट इंग्रजी आणि जपानीमधे मग मराठी ने काय पाप केलं

  http://www.maharashtratourism.gov.in/

  आपण व आपला पक्ष या संदर्भात करू शकाल...अशी अपेक्षा आहे...या भावनेतूनच ही गोष्ट आपल्या निदर्शनात आणत आहे.

  गूगल बझ वर आज यावर भरपूर चर्चा झाली आहे!!

  महेंद्र्जी नी या विषयी आपल्या पक्षाच्या साईट वरुन मेल केली आहे.

  ReplyDelete
 2. धन्यवाद मन मौजी जी,

  मी माझ्या परीने ह्या गोष्टीचा पाठ पुरावा करेन. गुगल बझ मध्ये मला सामील व्हायचं असेल तर काय करावे लागेल?

  विनोद

  ReplyDelete
 3. मी एखाद्या सराईत राजकारण्या प्रमाणे उत्तर नाही ना दिले?

  ReplyDelete
 4. आपल जी मेल अकाउंट असेल तर त्या मध्ये बझ आहे.....तिथे जाउन आपण फक्त हव्या त्या असलेल्या मित्रांना फॉलो करायच....बस्स झाल मग सुरू करायचा बझ बज़ाट!!! :)

  ReplyDelete
 5. मला उत्तर पण आलं मनसे कडुन. बरीच प्रगती आहे असे म्हणावे लागेल. शिवसेनेकडुन काहीच उत्तर नाही. इव्हन पत्राची पोहोच पावती पण नाही.. असो.. करस्पॉंडन्स खाली देतोय.
  Suchana-Manase.org
  प्रति मला

  तपशील दाखवा एप्रिल २३ (6 दिवसांपूर्वी)

  नमस्कार
  आपले शासकीय जवळजवळ सर्व संकेतस्थळे इंग्रजीतून आहेत. याची कल्पना आहे. तसेच त्याची लिस्टपण आमच्याकडे आहे. विधानसभेत यावर आमदारांनी प्रश्र्‍न देखील मांडले. हळुहळु एकएक गोष्टी करुयात.
  जय महाराष्ट्र!
  संकेतस्थळ प्रतिसाद कक्ष

  Quoting kbmahendra@gmail.com:

  Subject:कृपया आपला अभिप्राय
  जरूर नोंदवावा.
  Information:एका बझ वर झालेलं
  डिस्कशन इथे देतोय.

  महाराष्ट्र पर्यटन
  विभागाची साईट इंग्रजी आणि
  जपानीमधे? मराठी ने काय पाप
  केलं बा?
  http://www.maharashtratourism.gov.in/
  http://www.maharashtratourism.net/ - हे घ्या
  अजून एक संस्थळ. तिकडेही
  फक्त इंग्रजी

  http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/HTML/DO/DefaultDO.aspx?strpage=ForeignTariffchart.हटमल

  http://www.maharashtra.gov.in/ - सरकारचं
  संस्थळ, आधी इंग्रजीत
  उघडतं, मराठी पर्यायी...
  ---------------------------------------------------------------
  Name:mahendra
  E-mail:kbmahendra@gmail.com

  Date of Submission:2010-04-23 14:16:48

  ReplyDelete
 6. धन्यवाद महेंद्र जी
  बघू काय काय करतात ते ......
  विनोद

  ReplyDelete