Monday, April 19, 2010

महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

परवा स्टार माझा वर परळी वैजनाथ वरून पुण्याला जाणाऱ्या जोडप्याला लुटणारी व गाडीत असलेल्या महिलेवर बलात्काराची बातमी पाहिली आणि तळपायाची आग मस्तकात गेली. काय चाललाय काय महाराष्ट्रात आणि विशेषता पुण्यात, गुन्हेगार मोकाट सुटले आहेत आणि त्यांना पोलिसांचे काहीही भयं राहिले नाही असच एकंदरीत चित्र आहे.

आमचे आर आर आबा तर ह्याला सोडणार नाही त्याला सोडणार नाही अश्या फुशारक्या मारत राहतात पण त्यांचा आणि पोलिस यंत्रणेचा ह्या असल्या गुंडावर वचकच नाही राहिला कारण हेच गुंड ह्या राजकारण्यांना निवडणुकीत मदत करतात आणि मग पूर्ण प्रशासनाला वेठीस धरतात.

पुण्याचे आयुक्त तर अजून वरचढ, त्यांच्या म्हणण्या प्रमाणे अश्या घटना घडत असतात आणि त्या घडतात म्हणून कायदा व्यवस्था धोक्यात आहे अस काही समजण्याची गरज नाही. जर हाच प्रसंग त्यांच्या वर किवा त्यांच्या जवळपास च्या नातेवाईकावर आला तर ते हेच बोलतील का?

परळी वैजनाथ ची घटना हि महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे आणि सरकारने त्यावर त्वरित कारवाई करावी व गुन्हेगारांना शिक्षा होईल ह्याची काळजी घ्यावी म्हणजे झालं.

विनोद


2 comments:

  1. या लोकांना लाज म्हणजे काय हेच समजत नाही. दररोज वाचनात येणाऱ्या अशा बातम्यांनी मेंदू जड होतो!! या अशा समाजाचे आपण घटक आहोत , ही जाणीव मेंदूला पोखरून काढते.

    आपल्याला फक्त वांझोटा संतापच करण्याचा अधिकार दिलाय , तेवढा आपण न चुकता करीत रहायचं झालं!!

    ReplyDelete
  2. खर आहे महिन्द्र जी, नुसतं ब्लॉग वर लिहून खरं तर काही उपयोग नाही, ह्या धेंडा ना धरून मारायला पाहिजे पण आपला नाईलाज आहे. काय करणार? आजच गाडीत क्रिकेट चे स्टंप टाकून ठेवले आहेत, कोणी कधी असा भेटला तर डोकं फोडल्या शिवाय राहणार नाही हे मात्र नक्की.

    ReplyDelete