Thursday, January 21, 2010

सरकारचे मराठी पाऊल पडले मागे

अशोकराव, जर तुम्हाला एखादा निर्णय घेउन त्याला अमलात आणता येत नाही तर मग तुम्ही निर्णय तरी कशा करता घेतात । उगाचच पब्लिसिटी साठी अशे निर्णय घ्यायचे आणि नंतर शेपुट आत घालायचे, हीच का तुमची ओळख? लाज वाटते आम्हाला तुमच्या सारख्या कच खाऊ नेत्यांची.....


मटा ऑनलाइन वृत्त ।
मुंबई मुंबईत नव्या टॅक्सी परवान्यासाठी किमान १५ वर्षाच्या वास्तव्याची अट घालणार आणि मराठी भा
षा लिहिता ,वाचता आणि बोलता येणे सक्तीचे करणार ; असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या २४ तासात घुमजाव केले आहे। मराठी सोबतच हिंदी किंवा गुजराती यापैकी किमान एक भाषा येणे पुरेशी असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज (गुरुवारी) सांगितले.

मुंबईमध्ये टॅक्सीच्या रद्द झालेल्या परवान्यांचे नुतनीकरणकरण्यासाठी तसेच नव्या टॅक्सी परवान्यासाठी किमान १५ वर्षाच्या राज्यातील वास्तव्यासोबतच मराठी भाषा लिहिता , वाचता आणि बोलता येणे आवश्यक असल्याचे सरकारने जाहीर केले होते। मात्र या आदेशाला टॅक्सी चालक संघटनांचा विरोध होता. काही उत्तर भारतीय टॅक्सी चालकांकडून आम्हाला मराठी समजते आणि तोडके-मोडके बोलता येते मग हीलिहिण्याची अट कशाला ?, असा प्रश्न उपस्थित केला होता.

मुंबईमध्ये टॅक्सीच्या रद्द झालेल्या परवान्यांचे नुतनीकरणकरण्यासाठी तसेच नव्या टॅक्सी परवान्यासाठी किमान १५ वर्षाच्या राज्यातील वास्तव्यासोबतच मराठी भाषा लिहिता , वाचता आणि बोलता येणे आवश्यक असल्याचे सरकारने जाहीर केले होते। मात्र या आदेशाला टॅक्सी चालक संघटनांचा विरोध होता. काही उत्तर भारतीय टॅक्सी चालकांकडून आम्हाला मराठी समजते आणि तोडके-मोडके बोलता येते मग हीलिहिण्याची अट कशाला ?, असा प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घुमजावमागे उत्तर भारतीय राजकारण्यांची लॉबी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे। दरम्यान , मुख्यमंत्र्यांनी अद्याप निर्णयात केलेल्या बदलाबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.

Wednesday, January 20, 2010

जनतेच्या अपेक्षांचे दडपण येते - राज

म टा च्या सौजन्याने ......


20 Jan 2010, 0149 hrs ईस्ट
- म। टा. प्रतिनिधी
'मी जिथे जातो तिथे लोकांचा गराडा माझ्याभोवती जमतो। शिट्या वाजतात. टाळ्यांचा कडकडाट होतो. माझ्या सह्या घेण्यासाठी लोकांची झुंबड उडते. लाखो लोक माझ्याकडे अपेक्षेने बघत असतात. हे सारे बघितल्यानंतर जनतेच्या आपल्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत, हे जाणवते. त्यांच्याच अपेक्षांचे प्रचंड दडपण माझ्यावर येते. दुसऱ्या क्षणाला माझी खरोखरच तेवढी लायकी आहे का, असा प्रश्न मनात निर्माण होतो...' हे शब्द आहेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे!

नवनिर्माण करीअर अकादमीच्यावतीने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। डॉ। संदीप केळकर, ठाण्यातले दक्ष नागरिक प्रदीप इंदुलकर, जिज्ञासा ट्रस्टचे सुरेंद दिघे, वेटलिफ्टर संदीप आवारी आणि पत्रकार श्रीकांत बोजेवार यांना नवनिर्माण गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पत्रकार राजू परुळेकर, संदीप आचार्य आणि कवी अशोक नायगावकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राज यांनी आपले मन मोकळे केले.

'लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला भरपूर काम करायचे आहे। त्यासाठी माझे पाय जमिनीवरच राहिले पाहिजे. दहा वषेर् फिरूनही पक्षाच्या प्रसाराचे जेवढे काम करता आले नसते तेवढे काम काही महिन्यांत प्रसिद्धीमाध्यमांमुळे झाले. त्यामुळे कोणतेही पाऊल टाकताना विचार करून टाकावे लागते. कुठलेही आंदोलन करताना ते फार काळ रेंगाळत ठेवायचे नसते. 'ओव्हर एक्स्पोजर' मोठे घातक असते. १३ आमदार निवडून आल्यानंतर मी शिवतिर्थावर विजयी मेळावा घेऊ शकलो असतो. परंतु, तसे केले असते तर कार्यर्कत्यांमध्ये उन्माद निर्माण झाला असता. उद्धट झाले असते. त्यामुळे काही काळ शांत बसणेच इष्ट असते. कायद्याचे कुणालाही भर राहिले नसल्यामुळे आंदोलने करताना कायदा हातात घ्यावा लागतो. परंतु, त्यातून अनेक कार्यर्कत्यांवर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे कायदा हातात तरी किती वेळा घ्यायचा? मला कार्यर्कत्यांचाही विचार करावा लागतो', असेही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 'लोकांच्या मनात जो राग आहे. तोच माझ्या मनातही आहे. परंतु, थोडी सबुरी ठेवा. आजवर जे पाहिले नाही ते यापुढे पहाल, असे सांगत आपली भावी वाटचाल अधिक आक्रमक असेल', असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

रिक्षावाल्यांशी मराठीतच बोला
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सीचे परवाने मिळवायचे असतील तर मराठी भाषा बोलता आली पाहिजे, हा नियम आहे। त्यामुळे या रिक्षा आणि टॅक्सीचालकांशी मराठीतच बोला, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. दक्षिणेतल्या लोकांनी आपल्या भाषेची जशी भिंत उभी करून ठेवली आहे, तशीच भिंत महाराष्ट्रातही उभी राहिली पाहिजे. तसे झाले तरच इथली संस्कृती आणि भाषा टिकेल', असे राज यांनी सांगितले.

Tuesday, January 19, 2010

पाण्याशी 'खेळ' नको!

मित्रानो, आजच सकाळी म टा मधे प्रताप आसबेचां एक चांगला लेख वाचला तो तुमच्या सोबत शेयर करीत आहे। मुंबई तील पाणी टंचाई किती भीषण आहे ह्याची कल्पना ह्या लेखातून येते आणि हे सर्व भ्रष्ट राज कारनी आपापला फायदा करण्याकरिता आपल्या शहराचा बट्या बोळ करत आहेत। ह्यानां आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे । मुंबई महानगर पालिकेच्या निवडनुका जवळ येउन ठेपल्या आहेत आणि सुज्ञ जनता ह्या सत्ताधार्याना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही । तुर्तास एवढेच ......


19 Jan 2010, 0049 hrs IST
प्रताप आसबे

मुंबईतील पाण्याचा प्रश्ान् वाटतो तितका सोपा नाही। परंतु या समस्येचे गांभीर्य समजून घेण्याचीच कुणाची तयारी नाही, हे दुदैर्व आहे... ..........

यंदाचा पावसाळा संपल्या-पासून मुंबई महापालिकेची घालमेल सुरू आहे। मुंबई, ठाणे आणि नाशिकच्या परिसरात यंदा कमी पाऊस झाल्याने दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबई शहराला पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाणी कसे पुरवायचे, असा प्रश्न पडला आहे. या शहराला दररोज किमान ३६४८ दशलक्ष लिटर पाणी लागते. राज्य सरकारच्या भातसा, अप्पर वैतरणा या धरणातून रोज २६६४ दशलक्ष लिटर, तर महापालिकेच्या मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी या तलावातून ९८४ दशलक्ष लिटर पाणी पुरविले जाते. पाऊस कमी झाल्याने या धरण आणि तलावांमध्ये मागच्या तुलनेत सुमारे दोन लाख १० हजार दशलक्ष लिटर पाणी कमी आहे, असे म्हणतात. त्यामुळे १५ जुलैपर्यंत कशी कळ काढायची, असा प्रश्न आहे.

पाण्याच्या तुटवड्यामुळे महापालिकेने सुरुवातीपासूनच रोजच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात केली आहे। या कपातीनंतरही पावसाळ्याच्या आधीच २५ ते ३० दिवस पाणी संपण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारणत: १५ मेपासून पाणीपुरवठाच करता येणार नाही इतका तुटवडा आहे. सलग महिनाभर या शहराला पाणीच देता येणार नाही, अशी स्थिती दिसू लागली तेव्हा महापालिकेचे धाबे पुरते दणाणले. बैठकामागून बैठका सुरू झाल्या. त्यातून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठ्यालाच सुटी द्यायची 'शक्कल' महापालिकेने काढली. हा काही उपाय नाही; पण काही ना काही केेले पाहिजे, म्हणून आठवड्यातून एक दिवस सुटीचा उपाय काढला होता.

मुंबई हे जागतिक कीतीर्चे शहर। तिथे आठवड्यातून एकदा पाणी नाही, ही नामुष्कीची बाब. त्यामुळे जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुंबईला दररोज साधारणत: १२९ दशलक्ष लिटर जास्तीचे पाणी देण्याचा निर्णय त्यांनी आपल्या अधिकारात घेतला. या दिलाशामुळे आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठ्याला सुटी देण्याचा महापालिकेचा विचार बारगळला.

आता अजित पवार तरी कोठून पाणी देणार, असा प्रश्नच आहे। त्यांनी भातसा-अप्पर वैतरणा या धरणांच्या राखीव साठ्यातून पाणी द्यायचा मार्ग काढला. पवार यांनी काही प्रमाणात जोखीम घेतली; कारण १५ जुलैनंतर पाऊस पडला नाही तर नंतरचे सलग ९५ दिवस पाणीपुरवठा करता यावा, यासाठी पाण्याचा साठा राखून ठेवला जातो. त्यातील ४५ दिवसांचा साठा शिल्लक ठेवून साधारणत: ५० दिवसांचा साठा मुंबईला देण्यात आला आहे. दुदैर्वाने उद्या पाऊसच पडला नाही, तर ४५ दिवसांचा साठा भातसा -अप्पर वैतरणात असेल. त्यामुळे सुरुवातीच्या ४५ दिवसांनंतरही पाऊस पडला नाही तर आणीबाणीची स्थिती निर्माण होईल. तेव्हा लोक व राजकारणी अजित पवार यांच्या नावाने खडे फोडायला मागेपुढे पाहणार नाहीत. आज या प्रश्नावर मिठाची गुळणी धरलीय, ते महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनावाले सगळ्यात पुढे असतील, यात शंका नाही. मात्र अजित पवार यांनी काही प्रमाणात धोका पत्करलेला असल्याने मुंबई महापालिकेचा जीव भांड्यात पडला आहे.

मुंबईसाठी जास्तीचे पाणी देण्याचा निर्णय घेताना अजित पवार यांनी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठ्याला सुटी द्यायची नाही, मुंबईतील पाणीपुरवठ्याचे ऑडिट केेले पाहिजे, अशा अटी महापालिकेला घातल्या आहेत। यातील दुसऱ्या अटीचे पालन महापालिका कितपत करेल याची शंकाच आहे. मुंबईच्या वॉर्डावॉर्डात किती लोकसंख्या आहे, कोणत्या वॉर्डाला किती पाणी देतो, लोकसंख्येच्या घनतेचे आणि पाणीपुरवठ्याचे काही प्रमाण आहे का, दरमाणशी पुरवठा जास्त आहे की कमी आहे, कुणाला पाणी किती मिळते, याचा तपशील महापालिकेकडे नाही. काही ठिकाणी पाण्याच्या मोजमापासाठी मीटर बसविली; पण त्यातील ५० टक्के निकामी आहेत. मुंबई महापालिका रोज ३६४८ दशलक्ष लिटर पाणी पुरवते. त्यातील सुमारे २८ टक्के म्हणजे १०२१ दशलक्ष लिटर पाण्याचा हिशेबच नाही.

दुदैर्वाने मुंबई महापालिकेला, तेथील सत्ताधाऱ्यांना या गलथान-पणाची पर्वा नाही। मुंबईकरांनाही व्यवस्थित पाणी मिळते म्हणून पाण्याची किंमत नाही. ठाणे, नाशिक या आदिवासी भागातून पाणी आणले जाते. या शहरासाठी साधारत: ५३ टीएमसी पाणी विविध धरणांत अडविण्यात आले आहे. त्यातील बहुतेक सगळे पाणी शहराकडे वळवून किरकोळ असा वाटा शेतीला दिला जातो, याची थोडीतरी जाण पाहिजे. साधारणत: एक टीएमसी पाण्यात १५४५ हेक्टर जमिनीत भाताचे पीक घेता येते. हे सगळे पाणी शेतीला वापरले असते तर किमान ८१ हजार हेक्टर जमीन भाताच्या पिकासाठी पाण्याखाली आली असती. पण पाणी शहराकडे वळविल्याने आदिवासी ग्रामीण भागातील प्रगतीच्या वाटाच बंद झालेल्या आहेत. याची कसलीही जाण न ठेवता आमच्यासारखे मुंबईकर वाट्टेल तसे पाणी वापरतात.

मुंबई महापालिका १९८५ पासून शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात आहे। पाण्याच्या टंचाईला गैरव्यवस्थापन हे प्रमुख कारण असून त्या गैरव्यवस्थापनाला प्रामुख्याने तेच जबाबदार आहेत. महापालिकेने थोडीबहुत विकासाची कामे केली की त्याची इतकी टामटूम केली जाते की विचारायला नको. रस्तोरस्ती झेंडे काय. बॅनर काय. पुलेक्स काय. जणू चंदावर गेल्याचा देखावा केला जातो. पण तेच नेते पाणी प्रश्नावर अवाक्षर काढायला तयार नाहीत. मुंबईत रोजच्या रोज अनधिकृत बांधकामे होत आहेत. रोज नवनव्या झोपड्या उभ्या राहात आहेत. काही महाभाग यांना प्रोत्साहन देऊन गबर झाले आहेत. साफसफाई आणि कचऱ्याच्या नावाखालीही कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होतो, असे म्हणतात. ज्यांच्या हातात शहराची सूत्रे आहेत, त्यांचे सगळे लक्ष टेंडरवर खिळलेले असते. महापालिकेने मंजूर केलेल्या काही मोजक्या टेंडरची जरी चौकशी झाली तरी भ्रष्टाचाराचे प्रमाण किती भयावह आहे, याची कल्पना येईल. महापालिकेत प्रामुख्याने मराठी कर्मचारी आहेत. ती ताब्यातही मराठी लोकांच्याच आहे. मराठीसह कोणीही जावो, त्याला नागवल्याशिवाय कोणी सोडत नाही. पावलापावलावर भ्रष्टाचार आहे. याची कधीतरी झाडाझडती व्हायला पाहिजे. नाहीतर महापालिकेच्या कारभारात कधीच सुधारणा होणार नाही. पाण्याच्या टंचाईची झळ लागली असती तर साचलेल्या विहिरीतून गाळ उचमळून यावा तसे हे प्रश्न पुढे आले असते.

पण आता पाण्याची टंचाईच जाणवणार नाही, याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे मुंबईतील उच्चभ्रू लोकांना पाण्याचे महत्त्व कळेल, याची शक्यता नाही. मुंबई महापालिकेतील गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचारही सुशेगात चालत राहील, यातही शंका नाही. कळावे, जय महाराष्ट्र !

Thursday, January 14, 2010

तिळगुळ घ्या, गोड बोला..

सकाळ च्या सौजन्याने .....
मकर संक्रांति ची वेब साईट ह्या पत्त्यावर मिलु शकेल http://www.esakal.in/makarsankranti/makarsankrati.aspx


सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 14, 2010 AT 08:57 AM (IST)

मकर संक्रांतीच्या निमित्तानं सर्वजण एकमेकांचं तोंड गोड करतात. त्याप्रमाण ई- सकाळनंही समस्त वाचकांचं तोंड गोड करायचं ठरवलंय. कसं? अहो प्रश्‍न काय विचारताय? तुम्हाला ते थेट अनुभवायलाच मिळणार आहे. या संक्रांतीच्या निमितानं ई- सकाळ मकर संक्रांत ही मायक्रो साइट घेऊन आलीय. या साइटमधून संक्रांतीविषयक विविध लेख देऊ करत आहोत. केवळ लेखांवर येऊन आम्ही थांबलेलो नाही. तर, व्हिडिओंचाही त्यात समावेश आहे. पतंग, आणि काटेरी हलवा बनविण्याचे धडे या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला घेता येणार आहे.

Tuesday, January 12, 2010

रोजगारप्राप्तीसाठी "मनसे'ची पाठशाळा

सकाळ ह्या वृत्तपत्राच्या सौजन्याने .....

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, January 12, 2010 AT 12:15 AM (IST)

मृणालिनी नानिवडेकर मुंबई -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परिसरात निर्माण होणारे रोजगार परप्रांतीयांच्या हाती न जाता मराठी माणसाच्या ताब्यातच ठेवण्याची शिकवणी सुरू केली आहे। मात्र, ही शिकवण "मनसे स्टाइल' दणके-राड्यांची नसून नोकरी-रोजगार मिळविण्यासाठी आवश्‍यक कौशल्ये अंगी बाणवण्याबद्दलची आहे.

राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्‍यांत "मनसे'ने रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाची स्थापना केली आहे। अलीकडेच नाशिकजवळ या विभागातील पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते। शिवसेनेत असताना राज ठाकरे शिवउद्योग सेना, बेरोजगारांचा विधानसभेवरील मोर्चा अशा तरुणांच्या जिव्हाळ्याच्या विषयांना हात घालतच प्रकाशात आले होते.

मराठी तरुणांच्या हाताला काम हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असून, त्यासाठी आता "मनसे'चा रोजगार-स्वयंरोजगार विभाग काम करेल, असे पक्षाचे प्रवक्‍ते शिरीष पारकर यांनी स्पष्ट केले। निवडणुकीची दगदग संपल्यानंतर आता या कामाला नियोजनबद्ध प्रारंभ झाला असून, ताज्या शिबिरात भविष्यातील योजनांविषयी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात उभ्या राहणाऱ्या प्रत्येक उद्योगात उपलब्ध रोजगारातील 80 टक्‍के नोकऱ्या स्थानिकांना दिल्या पाहिजेत, असा शासनाचा कायदा असून, शासनाचे ते परिपत्रक लागू करणे उद्योजकांना बंधनकारक करण्याचे मार्ग कोणते, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. राज्याच्या विविध भागांत उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांची यादी "मनसे'कडे असून, ती त्या-त्या विभागातील प्रमुखांना देण्यात आली आहे. भूमिपुत्रांना रोजगार देण्यासाठी सक्‍तीचा बडगा उभारतानाच मराठी माणसाने नव्या स्वरूपातले रोजगार व नोकऱ्या मिळविण्याच्या कौशल्यांचा अभ्यासक्रमही "मनसे'ने तयार केला आहे. रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रमुख सुनील बसाखेत्रे हे स्वत: कामगार कायद्यातले तज्ज्ञ असून, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सल्लागार म्हणून त्यांचा लौकिक आहे. मराठी मुले सेवाक्षेत्रातील नव्या संधी मिळवायला बिचकतात हे लक्षात घेत "मनसे'च्या माध्यमातून लवकरच ठिकठिकाणी व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी संभाषण, संगणकीय कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन याविषयीची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरात होतकरू तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल.

मुंबईत रिटेल सेवांना आवश्‍यक असणारे तज्ज्ञ मनुष्यबळ तयार करण्यासाठी आवश्‍यक मार्गदर्शन पक्षाने यापूर्वीच सुरू केले असून, चार तासांच्या या शिकवणी वर्गाला हजर राहणाऱ्या तरुणांना नोकऱ्याही मिळाल्या आहेत. आता हा कार्यक्रम राज्याच्या सर्व भागांत मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात रोजगार-स्वयंरोजगार विभागाचा संघटक नेमण्यात आला आहे. ठाणे आणि पुणे येथे 15-20 जणांचा चमू सक्रिय आहे. पुणे येथील 80 टक्‍के नियुक्‍त्या पूर्ण झाल्या आहेत. नाशिक या "मनसे'च्या बालेकिल्ल्यातही विभागाचे काम सुरू झाले आहे. अमरावती, अकोला, नगर, जळगाव येथेही काम सुरू झाले असून, युवकांची मते मिळवायची असतील तर त्यांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याच्या नोकरीधंद्याबाबतच काहीतरी ठोस करणे राज ठाकरे यांना आवश्‍यक वाटत असल्याचे सांगण्यात येते.

राज ठाकरे ठरले 'युथ आयकॉन'

बातमी सकाळ च्या सौजन्याने ....

'ई सकाळ' आणि '५४३२१ एसएमएस सेवा' यांनी घेतलेल्या 'सांगा तुमच्या मनातील युथ आयकॉन' उपक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सर्वाधिक ५६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे। त्याखालोखाल २६/११ च्या मुंबई हल्ल्यावेळी शौर्य बजावणारे पोलीस अधिकारी विश्‍वास नांगरे-पाटील यांचे नाव 'युथ आयकॉन' म्हणून ऑनलाईन वाचकांनी आणि तरूणाईने 'एसएमएस'द्वारे सुचविले आहे. आज (१२ जानेवारी) युवा दिन. त्यानिमित्त आपल्या मनातील युथ आयकॉन कळविण्याचे आवाहन गेल्या आठवड्यात 'ई सकाळ'ने वाचकांना केले होते.'

ई सकाळ'वरील आवाहनाला जगभरातून वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला। कोणतेही विशिष्ट नाव समोर न ठेवता ऑनलाईन वाचकांना त्यांच्या दृष्टिने कोण 'युथ आयकॉन' वाटतो, हे सांगण्यास सुचविले होते. त्यातून या आवाहनावर जगभरातून सुमारे दीड हजार प्रतिक्रिया वाचकांनी 'ई सकाळ'वर पोस्ट केल्या. या प्रतिक्रियांमधून वाचकांनी सर्वाधिक संख्येने निवडलेल्या नावांवर '५४३२१ एसएमएस' सेवेमार्फत मतचाचणी घेण्यात आली. या दोन्ही प्रक्रियांमधून तरूणाईने त्यांच्या मनातील 'युथ आयकॉन'वर शिक्कामोर्तब केले. ठाकरे, नांगरे पाटील यांच्यासह क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर, अभिनेता अमीर खान, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, कॉंग्रेसचे युवा नेते राहूल गांधी, समाजसेवक प्रकाश आमटे, 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी अशी एकूण दहा नावे 'युथ आयकॉन' म्हणून वाचकांनी सुचविली होती.

विश्वास नांगरे पाटील दुसऱया स्थानावर
राज ठाकरे यांनी एकूण ऑनलाईन आणि एसएमएसवर ५४ टक्के लोकांची पसंती मिळवित युथ आयकॉन असल्याचे सिद्ध केले। महाराष्ट्रात मराठी तरुणांसाठी व मराठी भाषा टिकावी यासाठी आंदोलन करणाऱ्या राज यांनी जगभरातील मराठी माणसाला आकृष्ट केले असल्याचे यातून पुढे आले आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावेळी शौर्य बजावणारे पोलीस अधिकारी नांगरे पाटील यांचेही नाव या यादीत सचिन तेंडूलकरच्या आधी, दुसऱ्या क्रमांकावर आहे.

संपूर्णपणे वाचकांचा प्रतिसाद
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये यामध्ये कोणतीही यादी निश्‍चित नसताना, सुमारे तीन हजार वाचकांनी स्वतः यादी बनविली। युथ आयकॉन म्हणून आपण कोणाचा आदर्श समोर ठेवतो, हे कळविले. त्यामधून समान नावे पुढे आली आणि त्या नावांचा क्रमही एसएमएसद्वारे ठरविण्यात आला. त्यामुळेच यादीमध्ये एकाचवेळी 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांचे नाव आहे, तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांचेही नाव आले आहे. आदर्श वाटणाऱ्या, भावलेल्या व्यक्तींची नावे वाचकांनी 'ई सकाळ'वर मांडली होती. राजकारण, क्रीडा क्षेत्रापासून मनोरंजन, संगीत, विज्ञान आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींची नावे यामध्ये होती. 'ई सकाळ'वर 'युथ आयकॉन'साठी आलेल्या नावांमधून दहा नावांची निवड करण्यात आली। त्यावर 'एसएमएस'द्वारे मते मागविण्यात आली.
युथ आयकॉन्स् आणि टक्केवारी
राज ठाकरे (५६।१५ टक्के) ठाकरे घराण्याचा वारसा असलेले राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। राज ठाकरेंनी आजपर्यंत मराठी भाषेसाठी अनेक आंदोलने करीत महाराष्ट्रातील तरूणाईच्या मनात स्थान मिळविले आहे।
विश्वास नांगरे पाटील - (१०।६२ टक्के)एका सामान्य कुटुंबातील तरूणाची पोलिस अधिकारी पदापर्यंतची वाटचाल नांगरे पाटील यांच्या रुपाने मराठी युवा मनासमोर आहे। पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण, मुंबई हल्ल्यावेळी त्यांनी केलेली कामगिरी तरूणाईच्या मनावर विशेष ठसली आहे. सचिन तेंडुलकर - (९.५७ टक्के)वयाच्या सोळाव्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट अवकाशावर चमकू लागलेला हा सुपरस्टार. सचिनने आज अनेक विक्रम प्रस्थापित करीत आपणच क्रिकेटचा बादशाह असल्याचे सिद्ध केले आहे. सचिनच्या याच कामगिरीमुळे तो आजही करोडो भारतीयांच्या गळ्यातील ताईत आहे.अमीर खान - (५.७८ टक्के)आपल्या अभिनयाने जगाला वेड लावणारा अभिनेता अमिर खान आज वयाच्या ४४ व्या वर्षीही तरुणाईमध्ये प्रसिद्ध आहे. 'यादों की बारात' ते 'थ्री इडियट्‌स' पर्यंतचा अमिरचा प्रवास उल्लेखनीय आहे.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - (४.६२ टक्के )भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन म्हणून ओळख असणारे अब्दुल कलाम यांनी व्हिजन '२०२०' मधून भारताला नवी दिशा दाखविली आहे. 'विंग्ज ऑफ फायर' हे त्यांचे पुस्तक सर्वाधिक लोकप्रिय आहे. राहुल गांधी - (३.८९ टक्के )कॉंग्रेसचे युवा खासदार राहुल गांधी वयाच्या चाळीशीत तरुणांचे रोल मॉडेल म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. भारताचे भविष्यातील पंतप्रधान म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे.डॉ. प्रकाश आमटे - (३.२६ टक्के)आशियातील नोबेल मानल्या गेलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रकाश आमटे यांचे सामाजिक कार्यातील योगदान मोठे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 'हेमलकसा' या प्रकल्पात कुष्टरोग्यांसाठी ते उल्लेखनीय काम करीत आहेत.नारायण मूर्ति - (२.२० टक्के)पद्‌मविभूषण पुरस्कार विजेते नारायण मूर्ति यांचा इन्फोसिस टेक्‍नॉलॉजिस या कंपनीच्या स्थापनेत मोलाचा वाटा आहे. भारतातील आयटी क्षेत्रात या कंपनीच्या स्थापनेमुळ एक प्रकारची क्रांतीच आली.उद्धव ठाकरे - (२.१० टक्के)शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम करत असलेल्या उद्धव ठाकरे यांनी कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवसेना पक्षाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यात यांची मोलाची भूमिका आहे.नितीन गडकरी - (१.७८ टक्के)भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय अध्यक्ष हा नितीन गडकरी यांचा प्रवास उल्लेखनीय आहे. भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव आता राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आहे.

Monday, January 11, 2010

ओरियन्टल इन्शुरन्सचा निर्लज्जपणा

मित्रानो, स्टार माझा वर कालच एक बातमी बघितली आणि ती तुमच्या सोबत शेयर करीत आहे। ह्या ओरिएंटल इन्शुरसं कंपनी चा आपण निषेध केला पाहिजे, पण कसा? मी त्यांचा कस्टमर केयर चा ईमेल ID शोधुन काढला आहे आणि तो आहे csd@orientalinsurance.org.in . मी त्यानां आजच ईमेल पाठवत आहे, जमल्यास तुम्ही देखिल करा
ही बातमी स्टार माझा वर ह्या पत्त्यावर देखिल मिलु शकेल http://www.starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=9076













रेल्वे ट्रॅकवर चोराचा पाठलाग करताना शहीद झालेल्या रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलला इन्शुरन्स कंपनीनं विम्याची रक्कम देण्यास नकार दिलाय. प्रवाशाचा मोबाईल चोरून पळणाऱ्या एका चोराचा पाठलाग करताना लक्ष्मण अहिवने यांना रेल्वेची धडक बसल्यानं ते मरण पावले होते.
बांद्रा आणि माहीम स्टेशनवरच्या रेल्वे ट्रॅकदरम्यान हा प्रकार घडला होता. कर्तव्य बजावताना मृत्यू आलेला असतानाही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीनं मात्र त्यांच्या कुटुंबियांना जीवन विम्याची 2.5 लाख रक्कम नाकारली आहे.
रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान बेकायदेशीरपणे पहारा देत असताना हा मृत्यू झाल्यानं विमा नाकारत असल्याचं कंपनीनं आपल्या पत्रात म्हटलंय. लक्ष्मण यांच्या विधवा पत्नी अलका यांना चरितार्थ चालवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.
अवघ्या सहा हजार रुपयांच्या पेन्शनमध्ये त्यांना दोन मुलींच्या आणि एका मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवावा लागतोय. त्यामुळं त्यांच्यासाठी ही रक्कम मिळणं गरजेचं बनलंय.दरम्यान जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ओरिएंटलशी पत्रव्यवहार करुन अहिवणे कुटुंबियांना न्याय देण्याची विनंती केली आहे.