एक मजेशीर बातमी - कल्याण डोम्बिवली महानगर पालिकेला अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने सर्वोत्कृष्ठ रस्त्यांकारिता पारितोषिक मिळाले आहे.
मागेच आपल्या सन्माननीय महापौर वैजयंती घोलप ह्यांनी दिल्लीत जाऊन पुरस्कार घेतला ... कल्याण डोंबिवलीतील एक रस्ता धड शिल्लक राहिला नाही आणि महापौर मात्र उड्या मारत दिल्लीला गेल्या ... लाज कशी वाटत नाही ह्यांना .... निदान त्या संस्थेला कळवायचं तरी की आम्ही ह्या पुरस्काराकरिता पात्र नाही ..... कल्याण - डोम्बिवली करांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे .....
आपला विनोद
खालील बातमी म टा च्या सौजन्याने ......
पुरस्कार मिळालेल्याच्यानावलौकीकामुळे पुरस्काराचेमोठेपण वाढले पाहिजे . मात्रअखिल भारतीय स्थानिकस्वराज्य संस्थेने नगररत्नपुरस्कारांच्या नावे काहीमहापालिकांना राष्ट्रपती प्रतिभापाटील यांच्या हस्ते खिरापतवाटून आपल्या पुरस्कारांचीप्रतिष्ठा धुळीला मिळवली .कल्याण - डोंबिवलीमहापालिकेला उत्कृष्टरस्त्यांकरिता तर पुणेमहापालिकेला नियोजनबद्धविकासकामांचा पुरस्कार दिल्याने डोंबिवलीकर आणि पुणेकर पुरस्कार देणा्रयांच्याबुद्धीची कीव करीत आहेत . पुण्यातील नियोजित पाच भुयारी पादचारी मार्ग रद्दकरण्याची नामुष्की आली असताना त्यांना पुरस्कार देण्याची भामटेगिरी केली गेलीआहे . पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता भुयारी पादचारी मार्गाचीतातडीने गरज आहे . मात्र तरीही पुण्याचे नगररत्न ठरणे संशयास्पद आहे . कल्याण -डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत ३३५ कि . मी . लांबीचे रस्ते आहेत .जेएनयुआरएम योजनेखाली भुयारी गटारे , पाणीपुरवठा आणि पावसाळी गटारेयोजनेकरिता मोठी रक्कम या महापालिकेला मिळाली . विकास कामांकरिता रस्तेखणले जात असल्याने नागरिकांनी सहकार्य व सोशिकता दाखवली . मात्र कामे पूर्णझाल्यानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ते पूर्ववत करण्याची तत्परता प्रशासनानेदाखवली नाही . परिणामी कल्याण - डोंबिवलीमधील १७०कि . मी . लांबीचे रस्तेसध्या उखडलेल्या अवस्थेत आहेत . वस्तुत : जेएनयुआरएम योजनेत रस्ते पूर्ववतकरण्याकरिता पैसे दिले जातात . काही ठिकाणी डांबरीकरण केल्याची धूळफेककरण्यात आली . मात्र अवघ्या ३ ते ४ महिन्यात हे रस्ते पावसाने उखडले . गतवर्षीकल्याण - डोंबिवली महापालिकेची निवडणूक समोर दिसताच अत्यंत खराब अवस्थेतअसलेल्या रस्त्यांचे डोंबिवली आणि शिवसेनेशी नाते असलेल्या एका मातब्बरकंपनीकडून काम करून अब्रु वाचवण्याचा प्रयत्न केला गेला . अन्यथा यामहापालिकेतील रस्त्यांची कामे नव कंत्राटदार बनलेल्या स्थानिक गावगुंडांच्या हातीअसून उणे अथवा अधिक दराच्या निविदा दाखल करून थातूरमातूर कामे करण्याचीहडेलहप्पी केली जाते . लाचखोर सुनील जोशी हेच नगररचनाकार या नात्यानेसुशिक्षितांच्या या शहरातील रस्त्यांची गावगुंडांच्या साथीने वर्षानुवर्षे देखभाल करीतहोते . त्याच जोशींना पायघड्या घालून महापालिकेत पुन्हा आणण्याचा घाटघालणा्रया निलाज्रया लोकप्रतिनिधी व प्रशासनाला आपण लायक नसतानारस्त्याकरिता पुरस्कार स्वीकारताना वैशम्य वाटेल ही अपेक्षा करणेच गाढवपणाचेआहे .
No comments:
Post a Comment