म. टा. खास प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मनसेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या खाद्यमहोत्सवात ३० एप्रिलला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा आढावा घेणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे अशा महान विभूतींचा गौरवही होणार आहे.
मनसेने अंधेरी स्पोटर्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित केलेल्या खाद्यमहोत्वाची २९ एप्रिलला सांगता होत असून ३० एप्रिल रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाचा आढावा घेणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करून महाराष्ट्राचे आणि भारताचे नाव जगभरात उंचावणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे.
गौरवमूतीर्ंमध्ये रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, साहित्यिक शं. ना. नवरे, अभिनेते अशोक सराफ, ज्येष्ठ गायिका किशोरी अमोणकर, सुमन कल्याणपूर, ज्येष्ठ पत्रकार निळकंठ खाडिलकर, केसरी टूर्सचे केसरी पाटील, एन्टरटेन्मेन्ट उद्योगातील अग्रणी संजय गायकवाड आदींचा समावेश आहे.
................
................
आतषबाजी मनसेच्यावतीने ३० एप्रिल रोजी रात्री बारा वाजता मुंबईसह पुणे, नाशिक या शहरांमध्ये आतषबाजी करून सुवर्णमहोत्त्सवी वर्षाचे स्वागत करण्यात येणार आहे. हा सुवर्णमहोत्सव दिवाळीप्रमाणे साजरा करावा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावतीने करण्यात आले आहे. |
या नावांची निवड कशी केली गेली असावी याचा अंदाज बांधतोय. पण एक गोष्ट समजली नाही, ती म्हणजे या मधे अशोक सराफचे नांव का? तसेच रवी शास्त्री हा तर बंगलोरचा? सचिन तर नेहेमीचाच आहे. केसरी च्या पाटलां पेक्षा चौधरी यात्रा कंपनीचे मालक चौधरी हे सामान्यांना परवडतील अशा टुर्स काढतात, त्यांचे नांव जास्त योग्य वाटते.
ReplyDeleteनिळकंठ खाडिलकर यांचे नांव तर अगदी योग्य वाटते, पण हे संजय गायकवाड कोण???????????
महेंद्र जी
ReplyDeleteयु फ ओ मुवीस चे सी इ ओ आहेत संजय गायकवाड
http://business.in.com/article/changing-lanes/beam-me-up-scotty/832/1
वरील लिंक वर त्यांच्या कंपनी बद्दल बातमी आहे ... गुगल वर शोधून पाठवली आहे .....
विनोद