Tuesday, December 20, 2011
आमदार प्रकाश भोईर ह्यांनी केली टोल रूपी जिझिया कराची विधानसभेत पोलखोल
आपल्याकडून वसूल होणारे हे पैसे सरकार दरबारी दाखवले जातात का हा मोठा गहन प्रश्न आहे? ९५ ते २००० साली बांधलेले उड्डाण पुलांचे पैसे अजून वसूल झाले नाही ह्यावर कोणी विश्वास ठेवेल का?? हे टोल सर्व सामान्य नागरिकांकरिता अन्याय कारक आहेत आणि त्याबद्दल मनसे चे आमदार श्री प्रकाश भोईर ह्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारून ह्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ......
Wednesday, December 7, 2011
दीदी-ताईंना पुढे करून पेडररोड रहिवाशांचा एजेंडा
डोंबिवली : लता दीदी आणि आशाताईंना पुढे करून पेडररोडचे रहिवाशी आपला एजेंडा राबवत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. लता दीदी आणि आशाताईंबदद्ल मला किती आदर आहे, हे मला कुणी शिकवण्याची गरज नसल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय.
शिवसेनेने लतादीदी आणि आशाताई महाराष्ट्राची मानचिन्हं आहेत, यांच्यावर चिखलफेक नको, असं प्रसिद्धी पत्रक काढलं होतं, त्यावर राज ठाकरे बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, मी काल पेडररोड फ्लायओव्हर च्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती, यामुळे कुणाला मध्ये पडायची गरज नव्हती.
पत्रकार परिषदेचा विषय हा काही लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांचा नव्हता, असं राज ठाकरे यांनी आज डोंबिवलीत स्पष्ट केलंय.
शिवसेनेचं पत्रक हास्यास्पद
पत्रकार परिषदेत शिवसेनेचे पत्रक दाखवत राज ठाकरे म्हणाले, शिवसेनेनं आज हे पत्रक काढलंय. चॅनेल्सवरून मला कळलं, हे हास्यास्पद पत्रक आहे, याला आगापिछा नाही. स्टेडियमच्या बाहेर बॉल गेल्यासारखं आहे.
मुंबईतील पेडररोडवरून दिवसभरातून १ लाखाच्यावर गाड्या जातात. दहा लाख लोक ये-जा करतात. मग का तो पेडररोडचा फ्लायओव्हर का थांबवला जातो, हा माझा प्रश्न असल्याचं राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
ही काय मानचिन्हाची लक्षणं?
पत्रक वाचवून दाखवतांना राज ठाकरे म्हणाले, सचिन तेंडुलकर जर महाराष्ट्राचं मानचिन्ह आहे. सचिन जेव्हा नव्या घरात रहायला गेला, तेव्हा त्याच्याकडे महापालिकेचं नाहरकत प्रमाणपत्र नव्हतं, म्हणून त्याला महापालिकेने ५ लाखाचा दंड ठोठावला, मग ही काय मानचिन्हाची लक्षणं आहेत का? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.
वाढीव एफएसआय मागणे अनधिकृत?
सचिनच्या घराचं उदाहरण देत राज ठाकरे म्हणाले, सचिनने तेंडुलकरने नगरविकास मंत्रालयाला पत्र लिहून वाढीव एफएसआयची मागणी केली, मग हे अधिकृत आहे की अनधिकृत? अनधिकृतरित्या सचिन तेंडुलकरला एफएसआय द्यावा असं माझं म्हणणं होतं का असं राज यांनी म्हटलंय.
सचिनने राज्य सरकारकडेही एफएसआयसाठी परवानगी मागितल्यावर राज्य सरकारने सांगितले की, ही परवानगी तुम्हाला महापालिका देऊ शकते, असं उत्तर सचिनला मिळाल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
ही काय तेंडुलकर व्हर्सेस मंगेशकर मॅच आहे का?
ही काय तेंडुलकर व्हर्सेस मंगेशकर मॅच आहे का? असा सवाल करत पत्रकात, काही कशाचा थांगपत्ता नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
सचिनवर अनेकदा सामनातून चिखलफेक झालीय, सचिन खिशात हात घालत नाही, बॅटाविकतो, मग ही टीका हा काही महाराष्ट्राचा मान होता का? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.
पेडररोडचा फ्लाय ओव्हर व्हावा किंवा ना व्हावा? उद्धव ठाकरेंना सवाल
पेडररोडचा फ्लाय ओव्हर व्हावा किंवा ना व्हावा? असा सवाल उद्धव ठाकरेंना आहे. पेडर रोडचा फ्लाय ओव्हर व्हावा की होऊ नये, हे पत्रकात का नाही छापलं. भलतं सलतं काही तरी का छापावं, अशी टीका राज ठाकरेंनी केलीय.
यांना परिक्षेला बसवायला हवं होतं?
माझ्या परिक्षा संपलेल्या आहेत, पत्रक दाखवत राज ठाकरे म्हणाले, यांनाही मी परिक्षेला बसवलं असतं तर बरं झालं असतं. चूक झाली माझी असा त्रागाही राज ठाकरेंनी दाखवला.
फ्लाय ओव्हरसाठी जनसुनावणी नको?
पेडररोड फ्लायओव्हरच्या जनसुनावणीला राज ठाकरेंनी विरोध केलाय. पेडररोडच्या फ्लायओव्हरसाठी जनसुनावणी होते, मग मुंबईतल्या इतर फ्लायओव्हरसाठीही होईल. ठाणे, नाशिक, नागपूर आणि मग फ्लाय ओव्हरची कामं रखडतील आणि राज्याच्या विकासाला खिळं बसेल, म्हणून राज्य सरकारला विनंती आहे की, कृपया पेडररोडच्या फ्लायओव्हरसाठी जनसुनावणी घेऊ नका.
कुणी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोकांना सरकारने झुकतं मार देऊन भेदभाव करू नये, मुंबईकरांना नव्हे तर बाहेरून येणाऱ्यांनाही हा पेडररोडवरचा फ्लायओव्हर महत्वाचा आहे.
मंगेशकरांसाठी कायद्याला बगल का?: राज ठाकरे
गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबाने पेडर रोडवरील फ्लायओव्हरला विरोध केल्याने हा पूल कित्येक वर्षे रखडला होता. त्यामुळे मंगेशकरांसाठी कायद्याला बगल का देता असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे.
पेडर रोडवरील फ्लायओव्हरसाठी नागरिकांशी चर्चा करता पण इतरत्र पूलांसाठी नागरिकांसोबत चर्चा का करत नाही असं राज म्हणाले.
सरकारने लता मंगेशकर यांच्या विरोधापुढे मान झुकवत पेडर रोडवरील पुलाचा प्रस्ताव मागे घेतला. त्याऐवजी हाजी अली जंक्शन आणि महालक्ष्मी इथल्या कॅडबरी जंक्शन इथे दोनफ्लायओव्हर बांधण्यात येणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी दिली होती.
या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. पेडर रोडचा फ्लायओव्हर न झाल्यास मुंबईत कोणताही फ्लायओव्हर होऊ देणार नाही, असा इशाराही मनसेने दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र पेडर रोड फ्लायओव्हरसंदर्भात कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचं सांगितलं आहे.
सरकारने हा विरोध लक्षात घेऊन नमती भूमिका घेतल्याने या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे.
Thursday, November 24, 2011
राजकीय ‘परीक्षानीती’ची प्रचारतंत्रात सरशी!
महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी लेखी परीक्षा घेण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचे सर्व थरातून स्वागत होत असून सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष मनसेच्या परीक्षेकडे लागल्याने निवडणूक प्रचारतंत्राच्या पहिल्या परीक्षेत राज ठाकरे उत्तीर्ण झाले आहेत. मनसे उमेदवारांना परीक्षेसाठी देण्यात आलेल्या संदर्भ पुस्तकात महाराष्ट्र, महापालिका, पालिकेची कर्तव्ये, कामकाजाची पद्धत, आयुक्तांचे अधिकार, नगरसेवकांचे अधिकार यासह नागरी कामांसदर्भात उपयुक्त माहिती असल्याने ते संग्राह्य़ ठरणार आहे. मनसेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांना पालिका कार्यपद्धतीची माहिती असावी या उद्देश्याने येत्या चार डिसेंबर रोजी पन्नास गुणांची ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
यासाठी तयार केलेल्या संदर्भ पुस्तिकेत महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राज्यातील जिल्हे, तालुके व खेडय़ांची माहिती, लोकसंख्या, मुंबई महापालिकेची माहिती यात पालिका कोणत्या कायद्यानुसार काम करते,महापालिकेचे प्रभाग, पालिकेतील वैधानिक समित्या, विशेष समित्या, पालिकेची अत्यावश्यक कर्तव्ये व स्वेच्छाधीन कर्तव्ये, वैधानिक समित्यांचे कामकाज, विविध समित्यांची रचना व कामे, महापौर,नगरसेवक व आयुक्ताचे अधिकार, पाणी पुरवठा, स्वच्छता, घनकचरा, अग्निशमन दल, आरोग्य, उद्याने व मैदाने, बाजार खाते आदी पालिकेच्या विविध विभागांची थोडक्यात माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. मुंबईचा पाणीपुरवठा व त्यासाठी पालिकेकडून आकारण्यात येणारे दर, मुंबईमध्ये दररोज निर्माण होणारा कचरा व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका नेमके काय करते, विविध योजनांची माहिती, आरोग्य व्यवस्था व रुग्णालयांची माहिती, पाणी टंचाई असल्यास, नळदुरुस्ती आदी कामांसाठी कशाप्रकारे व कोणाला पत्र लिहायचे याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मदतीने मुंबईत कोणत्या योजना चालू आहेत तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा उहापोह करण्यात आला आहे.
मनसेच्या या पुस्तिकेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधींनी आपल्या विभागातील प्रश्नांसदर्भात संवाद कसा साधायचा व तो साधताना कोण कोणत्या घटकांचा विचार करायचा याचे विस्तृत विवेचन. थोडक्यात एखाद्या समस्येची चिकिस्ता करण्यापासून त्यामागची प्रशासनाची भूमिका, नागरिकांना येणाऱ्या अडचणी व समस्येचे समाधान करताना विचारात घ्यायच्या गोष्टी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनी नेमके कसे वागावे याचेही मार्गदर्शन करण्यात आले आहे. आदर्श नगरसेवक बनण्यासाठी पालिका कायदा १८८८ समजून घ्या, विभागात अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहत असतील तर तात्काळ त्याची तक्रार संबधित अधिकाऱ्यांकडे करा, पालिकेशी संबंधित तसेच अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे पत्ते व दूरध्वनी जवळ बाळगण्याचा आग्रह या पुस्तिकेत करण्यात आला आहे.
मनसेच्या स्थापनेपासून परप्रांतीचे लोंढे रोखण्याची भूमिका राज ठाकरे यांनी सातत्याने मांडली असून मुंबईत येणारे लोंढे रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याची विशेष माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ७४ व्या घटनादुरुस्तीसह पालिकेच्या प्रत्येक प्रभागातील नागरी कामांची माहितीही देण्यात आली असून ही पुस्तिका सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपयुक्त ठरणारी आहे.
सगेसोयरे अस्वस्थ
मनसेच्या उमेदवारीसाठी नात्यागोत्यांचे राजकारण चालणार नाही, असे राज ठाकरे यांनी पक्षस्थापनेच्या वेळीच जाहीर केल्याने, आगामी महापालिका निवडणुकासाठी नातेवाईकांची मोर्चेबांधणी करणाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आमदार शिशिर शिंदे यांची पत्नी निवडणूक लढविणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाल्याने, स्वत शिशिर शिंदे यांनी त्याचा इन्कार केला आहे. आपली पत्नी निवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले.
Tuesday, November 22, 2011
पवारसाहेबांच्या कृपने मिळालेलं मंत्रिपद सांभाळा : राज ठाकरे
मुंबई : राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील वाकयुद्ध सुरूच आहे. "अजित पवार यांना शरद पवारसाहेबांच्या कृपेने मंत्रिपद मिळालंय, नामदारकी मिळालीय, त्यांनी ती नीट सांभाळावी, नको त्या भानगडी कशासाठी?", असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.
"पवार साहेबांचे शिक्षक बोललेच आहेत ना, पवार साहेब निवृत्त झाले तर राष्ट्रवादी कुणी सांभाळणार नाही". "दुसऱ्याकडे बोटं दाखवण्यापेक्षा याचा जास्त विचार करावा", अशा शब्दात राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केलीय.
ठाकरे-पवार क्रिकेट वॉर
टेस्ट क्रिकेटर सदू शिंदे हे माझे आजोबा होते, असं उत्तर अजित पवारांनी राज ठाकरेंना दिलं होतं. यावर उत्तर देतांना राज ठाकरे म्हणाले, मला वाटतं कुणाचेही वडिल आपले आजोबा कसे मानावेत? सदू शिंदे शरद पवारांचे ते सासरे.
हे अजित पवारांचे आजोबा कसे झाले? हे अजूनपर्यंत मला कळलं नाही. हे कुठची नाती बघतात? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
माझ्या चुलत-चुलत भावाची आई, तिची जी सख्खी बहिण होती, त्यांचे मिस्टर हे व्ही.शांताराम होते. मग मी काय 'प्रभात'वर हक्क सांगू का? असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय.
दारासिंह ही यांचे आजोबा असतील?
कदाचित मला माहित नाही, दारासिंहपण यांचे आजोबा असतील. कारण हे कोणत्यातरी कुस्ती संघटनेचे पण अध्यक्ष आहेत म्हणे, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केलीय.
राज ठाकरे पुढे बोलतांना म्हणाले, 'प्रश्न शेतीचा आहे, अजित पवार शेतकरी आहेत ना, या गोष्टींची सुरूवात त्यांनीच करायची, आम्ही विचारलंय का यांना?, हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत. तुम्ही कधी करणार म्हणून..'
Thursday, November 17, 2011
आयत्या बिळावर नागोबा ....
कल्याणमधील ठाणकरपाडा येथील माता रमाबाई आंबेडकर उद्यानाची पाहणी करण्यासाठी काही क्षण आलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोरच आज संध्याकाळी उद्यानाच्या विकासाचे श्रेय घेण्यावरून मनसे सैनिक आणि शिवसैनिक समोरासमोर भिडले. दोन्ही गटांत झालेल्या बाचाबाची आणि धक्काबुक्कीत एका शिवसैनिकाने मनसेच्या नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांना अर्वाच्य शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याने वातावरण तप्त झाले.
आधारवाडी येथील सीमेंट रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकून उद्धव ठाकरे शिवसेनापुरस्कृत अपक्ष नगरसेवक मोहन उगले यांच्या ठाणकरपाडा प्रभागातील रमाबाई आंबेडकर उद्यानाची पाहणी करण्यासाठी आले; परंतु या उद्यानासाठी मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी लाखो रुपयांचा निधी उभारला आहे. त्यांची कामे येथे सुरू आहेत. या उद्यानात ठाकरे येणार म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष काका मांडले, सरचिटणीस इरफान शेख, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसैनिक मोठय़ा संख्येने उद्यानाच्या प्रवेशद्वारावर जमले होते.
गेल्या आठवडय़ात मोहन उगले यांनी उद्यानातील ध्यानधारणा केंद्राचे उद्घाटन केले होते. त्यामुळे शिवसैनिक आणि मनसे सैनिकांमध्ये धुसफूस सुरू होती. उद्यानाच्या ठिकाणी वातावरण तंग बनले होते. पोलीस बंदोबस्त येथे होता.
उद्धव ठाकरे येण्यापूर्वी आमदार एकनाथ शिंदे, महापौर वैजयंती गुजर, खासदार आनंद परांजपे, राजेंद्र देवळेकर हे उद्यानात प्रवेश करीत असताना शिवसैनिक मोठय़ा संख्येने घोषणाबाजी करीत उद्यानात घुसले. त्यापाठोपाठ मनसे कार्यकर्तेही घुसले. घोषणाबाजी सुरू झाली. उद्धव ठाकरे उद्यानाची पाहणी करीत असतानाच शिवसैनिक आणि मनसे सैनिक समोरासमोर भिडले. बाचाबाची, धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीत एका शिवसैनिकाने मनसे नगरसेविका डोईफोडे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. वातावरण अधिक चिघळू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी तेथून काढता पाय घेतला.
मनसेचे मंदार हळबे, इरफान शेख यांनी सांगितले, आमच्या नगरसेविकेला शिवसैनिकाने धक्काबुक्की करून तिला शिवीगाळ केली आहे. त्या शिवसैनिकाच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सुनील जोशींचे प्रकरण घडले त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी उगले हे अपक्ष नगरसेवक आहेत असे जाहीर केले होते. मग आज एका अपक्ष नगरसेवकाच्या मागे फरफटत उद्धव हे उद्यानाचे काम पूर्ण झाले नसताना का फरफटत आले, असा प्रश्न हळबे यांनी केला.
Friday, November 4, 2011
पेट्रोल दरवाढ : ममतांकडून पाठिंबा काढण्याचा इशारा
अमेरिकेत पेट्रोल साठी एका लिटर ला ४५ रुपये पडतात मग भारतात पेट्रोल एवढं महाग का ?? हा मोठा गहन प्रश्न आहे .........
तृणमूल काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत सदस्यांनी यूपीए सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पण पंतप्रधान परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असंही म्हटलं की, आता युपीएमधून बाहेर पडल्यावर सरकार कोसळेल आणि आपल्याला तसं करायचं नाहीए म्हणून आपण पंतप्रधान कधी परतणार आहेत याची वाट पाहात असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.