Wednesday, December 7, 2011

मंगेशकरांसाठी कायद्याला बगल का?: राज ठाकरे

खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने .....



मुंबई: पेडर रोडवर फ्लायओव्हर झालाच पाहिजे, असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. पेडर रोड फ्लायओव्हर रद्द करण्याचा सरकाराच्या निर्णयाला मनसेने विरोध दर्शवला आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबाने पेडर रोडवरील फ्लायओव्हरला विरोध केल्याने हा पूल कित्येक वर्षे रखडला होता. त्यामुळे मंगेशकरांसाठी कायद्याला बगल का देता असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे.

पेडर रोडवरील फ्लायओव्हरसाठी नागरिकांशी चर्चा करता पण इतरत्र पूलांसाठी नागरिकांसोबत चर्चा का करत नाही असं राज म्हणाले.

सरकारने लता मंगेशकर यांच्या विरोधापुढे मान झुकवत पेडर रोडवरील पुलाचा प्रस्ताव मागे घेतला. त्याऐवजी हाजी अली जंक्शन आणि महालक्ष्मी इथल्या कॅडबरी जंक्शन इथे दोनफ्लायओव्हर बांधण्यात येणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी दिली होती.

या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. पेडर रोडचा फ्लायओव्हर न झाल्यास मुंबईत कोणताही फ्लायओव्हर होऊ देणार नाही, असा इशाराही मनसेने दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र पेडर रोड फ्लायओव्हरसंदर्भात कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचं सांगितलं आहे.

सरकारने हा विरोध लक्षात घेऊन नमती भूमिका घेतल्याने या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे.

No comments:

Post a Comment