Monday, August 1, 2011

संतप्त आयुक्त-आक्रमक मनसे 'जाबसुनावणी'

खालील लेख म टा च्या सौजन्याने ........



मुंबईतील खड्डे बुजवण्याच्या मुद्द्यावरून कायदा हातात घेऊ नका, तुम्ही मनसेवाले अशीच दादागिरी करता, अशा शब्दांत महापालिका आयुक्त सुबोधकुमार यांनी शनिवारी मनसेच्या कार्यर्कत्यांना सुनावले. त्यावर आमच्या आंदोलनाची हीच स्टाईल आहे. केसेस अंगावर घेण्याची तयारी आहे. दादागिरी करायच्यावेळेस दादागिरीही करू, असे मनसेच्या कार्यर्कत्यांनी उत्तर देताच आयुक्त अधिकच संतप्त झाले. या घटनेनंतर आता पालिकेत मनसे विरुद्ध आयुक्त असा संघर्ष दिसणार आहे.

मुंबईतील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शुक्रवारी सभागृहाच्या बैठकीत आयुक्त सुबोधकुमार यांनी कायदा हातात घ्याल तर केसेस टाकू, असा इशारा मनसेला दिला होता. त्यावर आयुक्तांना जाब विचारण्यासाठी मनसेचे तीस ते पस्तीस कार्यकतेर् दुपारी पालिका मुख्यालयात थडकले. विभाग अध्यक्ष अरविंद गावडे व संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यर्कत्यांनी आयुक्तांची भेट घेतली. आतापर्यंत किती कंत्राटदारांवर कारवाई केली, असा प्रश्न कार्यर्कत्यांनी करताच संतप्त झालेल्या आयुक्तांनी, मी तुम्हाला उत्तर देण्यास बांधिल नाही, असे सुनावले.

त्यावर, तुम्ही जनतेचे नोकर आहात, तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल, असा टोला लगावताच आयुक्त लालबुंद झाले. आयुक्तांचाही आवाज चढला होता. वातावरण तंग होताच सुरक्षारक्षकांनी आयुक्तांच्या दालनात धाव घेतली. आयुक्तांचे सहाय्यक असलेले सुधीर नाईकही हा प्रकार पाहून अवाक झाले. तुम्ही मनसेवाले अशीच दादागिरी करता, तुमच्या नेत्यांशी मी बोलतो, कायदा हातात घेऊन नका तुमच्यावर केसेस दाखल होतील, अशी धमकी आयुक्तांनी दिली.

त्यावर कार्यर्कत्यांनी 'गो अहेड' असे सांगितले. मनसेची हीच स्टाईल आहे, आता आम्ही विनंती करायला आलो आहे, वेळ पडली तर दादागिरीही करू, कायदा राखण्याचे काम पोलिसांचे आहे, तुम्ही कंत्राटदारांवर कारवाई करा, वेळ पडली तर केस अंगावर घेण्याची तयारी असल्याचे मनसेच्या कार्यर्कत्यांनी सांगितले. खड्ड्याची अवस्था बघायची असले तर दादरच्या केशवसूत पुलावर येऊन बघा, असे आव्हान अखेर मनसेने दिले.

No comments:

Post a Comment