Wednesday, June 2, 2010

'अप्सरा' अभिनेत्रींवर मुख्यमंत्र्यांची कृपा

वा अशोकराव, तुमच्या कडून हीच अपेक्षा होती .......

खालील लेख म टा च्या सौजन्याने .........

विनोद

वर्षानुवर्षे रसिकांचे मनोरंजन करून आयुष्याच्या संध्याकाळी हलाखीचे जीवन जगणारी अनेक वयोवृद्ध कलाकारमंडळी ' कुणी घर देता का घर... ' असा टाहो सरकारदरबारी फोडत असतात... परंतु त्यांचे गा-हाणे ' सरकार 'च्या कानीच पडत नाही... याउलट अवघ्या काही चित्रपटात कामे करून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या दोघा 'अप्सरां ' वर मात्र मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची खाशी मर्जी बसलेली दिसते. म्हणूनच की काय, या दोघींकडे आधीच घरे असताना पुन्हा ' म्हाडा ' चे आलिशान फ्लॅट देऊन मुख्यमंत्र्यांनी आपली मेहेरनजर त्यांच्यावर फिरवली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून १६ कलावंतांना म्हाडाची घरे देण्याचा निर्णय नुकताच अशोक चव्हाण यांनी घेतला. मात्र हा निर्णय घेताना मराठी सिनेसृष्टीतील दोघा अभिनेत्रींवर त्यांनी केलेली कृपा हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. नटरंग सिनेमातून फेमस झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि रेशम टिपणीस यांना यापूर्वीच म्हाडाची घरे देण्यात आली असताना, पुन्हा त्यांच्यावरच कृपादृष्टी दाखवण्याचे कारण काय, असा सवाल केला जात आहे.

दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कुटुंबियांना आधी मुख्यमंत्री कोट्यातून वर्सोवा येथील ९५३ चौ. फूटाचा २ बीएचके फ्लॅट देण्यात येणार होता. मात्र फुले कुटुंबियांना फ्लॅट नको. आमच्याऐवजी अभिनेत्री स्मिता शेवाळे हिला तो द्यावा, अशी विनंती फुले यांच्या कन्या गार्गी फुले-थत्ते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी तो फ्लॅट देण्यासाठी ' नटरंग ' ची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिची निवड केली. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी झालेल्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये कलावंत कोट्यातून सोनाली कुलकर्णीला सहकार नगर, चेंबूर येथील म्हाडाचे घर वितरीत करण्यात आले आहे. आधीच मुंबईत घर असल्यास म्हाडाचे घर देता येत नाही, असा नियम आहे. परंतु म्हाडाचेच घर घेतले असताना, सोनाली कुलकर्णीला पुन्हा वर्सोव्याचा म्हाडाचा फ्लॅट देण्याचा निर्णय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आहे. म्हाडाच्या दरानुसार या फ्लॅटची किंमत ४२ लाख रूपये असली तरी बाजारभावानुसार ती सव्वा कोटी रूपयांच्या घरात पोहोचते.

नृत्यासाठी प्रसिद्ध असलेली आणखी एक अभिनेत्री रेशम टिपणीस-सेठ हिच्यावरही मुख्यमंत्र्यांनी असाच कृपादृष्टीचा वर्षा व केला आहे. २००४ साली रेशम सेठ या नावाने तिला यापूर्वीच बिंबीसार नगर, गोरेगाव येथील २३ / सी इमारतीमध्ये ७०६ क्रमांकाचा फ्लॅट देण्यात आला होता. परंतु आता नवरा संजीव सेठ याच्याशी आपला घटस्फोट झाला आहे. घटस्फोट देताना झालेल्या तडजोडीनुसार, ते घर संजीवला देण्यात आले आहे. सध्या मुंबईत माझ्याकडे राहते घर नाही, असा युक्तिवाद रेशम टिपणीस हिने केला आहे. नियमानुसार, म्हाडाचे घर घेताना, यापूर्वी आपण म्हाडाच्या योजनेचा कधीही फायदा घेतलेला नाही, असे शपथपत्र द्यावे लागते. शिवाय किमान पाच वर्षे मिळालेले घर इतरांच्या नावे हस्तांतरीत करता येत नाही वा विकताही येत नाही.








No comments:

Post a Comment