Friday, June 11, 2010

आम्ही आमचा पक्ष चालवायचा कि त्यांचा?

कालच विधान परिषदेची निवडणूक झाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस च्या पारड्यात आपली मते टाकली म्हणून शिवसेनेचे मुखपत्र सामना ने (म्हणजे संजय राऊतांनी) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जेव्हा अंबरनाथ नगरपरिषदेत मनसे ने शिवसेनेला साथ दिली तेव्हा पत्रकारांनी उद्धव साहेबाना दिलमजाई होणार कि नाही हा प्रश्न विचारला होता त्यावेळेस उद्धव साहेब म्हणाले कि "मला ह्या गाळात उतरायचे नाही". जर तुमचे कार्याध्यक्ष अश्या प्रकारचे विधान करत असतील तर मनसे शिवसेनेला साथ देईल अशी अपेक्षा तरी का करता?

एक मत प्रवाह असाही होता कि मनसे ने तटस्थ राहायला पाहिजे होते, पण तटस्थ राहून काय उपयोग त्यानी पक्षाला काहीही फायदा झाला नसता व कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी चे आमदार तर निवडून गेलेच असते. त्यापेक्षा ह्या मत दानामुळे जर पक्षाला फायदा होत असेल तर मतदान करणे गरजेच होतं. आम्ही आमचा पक्ष चालवायचा कि त्यांचा? तेव्हा शिवसेनेने मनसे ला गृहीत धरू नये हेच उत्तम.

आपला

विनोद


5 comments:

  1. Eknum barobar vidhaan ahe...kadachit hya matdanamule pudhchya yenarya adchanni var mat karta yeil...jase 4 Aamdaranche nilamban radd karne,Raj varche 78 gunhe hyaanaa maffi dene...

    ReplyDelete
  2. ya vyavahaarat paishachi devan ghevan jhalyacha aarop news channels ne kelela aahe. to jhalach nahi ase maananayacha kahi aadhar nahi (shevati politics cha mukhya mudda toch)
    asha veles tatastha raahun ha result milavane pakhsa-pratimesathi changale rahile asate ase maajhe mat aahe.

    nilambanachi kaarvai nyayalayat debate karun maage karavata aali nasati kaay?

    ReplyDelete
  3. जय / किरण
    तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
    न्यायालयात जाऊन निलंबना विरुद्ध काही करता येईल का ह्या बद्दल शंका आहे. मनसे च्या आमदारांच्या निलंबना बद्दल खरं म्हणजे विरोधी पक्षांनी आवाज उठवला पाहिजे पण विरोधी पक्षाचे धोरण इतके संशयास्पद किवा दुटप्पी आहे कि विचारता सोय नाही. शिवसेनेने नेहमीच मनसे च्या आमदारांना कोंडीत पकडायचा प्रयत्न केला आहे, तुम्हाला माहित असेल कि शिवसेना मनसे ला विरोधी पक्षात सामिलच करून घेत नाही म्हणून तर मनसे नि स्वताचा गट स्थापन केला आहे. म्हणजे स्वताहून आम्हाला लांब ठेवायच आणि मदत नाही केली तर नाकाराश्रू काढायचे, हे कोणतं राजकारण आहे?

    ReplyDelete
  4. Raj Sahebanna VadDivsachya Hardik aani manapasun(MANASE) Shubhecha...........

    ReplyDelete
  5. धन्यवाद जय
    आज सकाळ पासून आम्ही कृष्ण कुंज वरच होतो. कार्यकर्त्यांची भरपूर गर्दी होती ......
    आपला विनोद

    ReplyDelete