Wednesday, March 10, 2010

मनसेचा महिला आरक्षणाला पाठिंबा

म टा च्या सौजन्याने

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महिला आरक्षण विधेयकाला पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी घोषणा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केली। या विधेयकाला विरोध करणा-या लालूप्रसाद, मुलायमांची संस्कृती त्यांच्या भूमिकेतून कळते, असा सणसणीत टोलाही त्यांनी हाणला.

कालच्या महिला दिनापासून महिला आरक्षण विधेयक पुन्हा वादळी चर्चेत सापडलंय। काँग्रेस, भाजप आणि डाव्यांचा पाठिंबा असतानाही केवळ सपा, राजद खासदारांच्या गोंधळामुळे काल हे विधेयक मंजूर होऊ शकलं नाही. त्यांच्या या भूमिकेवर राज यांनी टीका केली.

काय मूर्ख माणसं आहेत ही...महिलांना विरोध करतात...यांची घरं तरी चालतील का त्यांच्याशिवाय...या विरोधातून लालू-मुलायमची संस्कृती कळते...पण हा जेलमध्ये गेला तेव्हा बायकोलाच मुख्यमंत्रीपदी बसवली होती ना....तेव्हा दुसरं कुणी दिसलं नाही ना...असा हल्ला त्यांनी चढवला।

त्याचवेळी महिलांनाही राज यांनी एक विनंती केली। उद्या हे आरक्षण लागू झालं, तुम्ही नगरसेविका, आमदार म्हणून निवडून आलात, तर तो सगळा कारभार तुम्हीच केला पाहिजे, तुमच्या नव-याने नाही. जनतेने तुमच्याकडे ती जबाबदारी सोपवली आहे, ती तुम्हीच पार पाडली पाहिजे, असं त्यांनी नमूद केलं.

No comments:

Post a Comment