Wednesday, March 10, 2010

पाणी चोरणाऱ्यांना फोडून काढा

म टा च्या सौजन्याने

- म। टा. खास प्रतिनिधी

पिण्याच्या पाण्याचा प्रश्ान् भविष्यात आणखी गंभीर होईल। अशावेळी अनधिकृत झोपड्यांमध्ये पाइपलाइन फोडून पाणी चोरणाऱ्यांनाच फोडून काढा, असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी कार्यर्कत्यांना दिला. राज्यातील सगळ्या व्यवहारांचे मराठीकरण करण्याचे आपले कर्तव्य असून ते आपण पार पाडणारच याची ग्वाहीही त्यांनी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेचा चौथा वर्धापन दिन माटुंगा येथील यशवंतराव नाट्य मंदिरात झाला. ढोल ताशांचा कडकडाट आणि फटाक्यांची आतषबाजी करीत कार्यर्कत्यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले.

महिला आरक्षण योग्यच

महिलांच्या आरक्षणाला मनसेचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले। आरक्षणाला विरोध करणाऱ्या लालूप्रसाद यादव आणि मुलायमसिंह यांची यातून संस्कृती कळते, असा टोला त्यांनी लगावला. तुरूंगात जाताना लालूंनी राज्याची जबाबदारी पत्नी राबडीदेवीकडेच सोपवली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महिलांनो, आरक्षण जरूर घ्या, पण कारभार मात्र तुम्हीच करा, तुमच्या नवऱ्यांमार्फत कारभार करू नका, असे आवाहन त्यांनी केलेे.

आयाळ असलेला सिंह

आ। शिशिर शिंदे यांनी, राज यांना मनसेच्या झेंड्याचे उपरणे घातले. त्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, हे उपरणे घातल्यानंतर राज ठाकरे आयाळ असलेल्या सिंहासारखे दिसत आहेत, मात्र बाकीचे 'म्याव म्याव'सारखे दिसतात. राज ठाकरे यांंच्या भाषणांमुळे या वयातही रोमांच उभे राहतात असे शिंदे यांनी म्हटले होते. त्याचा नंतर भाषणात उल्लेख करताना राज म्हणाले की, रोमांच उभे राहायला वय लागत नाही. यावर सभागृहात एकच खसखस पिकली! यावेळी आ. राम कदम, मंगेश सांगळे, रमेश वांजळे, अविनाश अभ्यंकर आदी उपस्थित होते. धुळवडीच्या निमित्ताने कृपाशंकर सिंह आणि आणि शिशिर शिंदे एकत्र आल्याचे फोटो सर्वत्र झळकले होते. तोच धागा पकडत राज ठाकरे म्हणाले की, आपण या प्रकाराची माहिती घेतली असता तो एक केवळ योगायोग होता. मात्र भविष्यात पक्षाची शिस्त मोडण्याचे प्रकार घडल्यास संबंधितांना तात्काळ पक्षातून काढले जाईल. सभासद नोंदणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र बोगस नोंदणी आढळून आली तर संबंधितांना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असे राज यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment