Tuesday, December 20, 2011
आमदार प्रकाश भोईर ह्यांनी केली टोल रूपी जिझिया कराची विधानसभेत पोलखोल
आपल्याकडून वसूल होणारे हे पैसे सरकार दरबारी दाखवले जातात का हा मोठा गहन प्रश्न आहे? ९५ ते २००० साली बांधलेले उड्डाण पुलांचे पैसे अजून वसूल झाले नाही ह्यावर कोणी विश्वास ठेवेल का?? हे टोल सर्व सामान्य नागरिकांकरिता अन्याय कारक आहेत आणि त्याबद्दल मनसे चे आमदार श्री प्रकाश भोईर ह्यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न विचारून ह्या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन ......
Wednesday, December 7, 2011
दीदी-ताईंना पुढे करून पेडररोड रहिवाशांचा एजेंडा
डोंबिवली : लता दीदी आणि आशाताईंना पुढे करून पेडररोडचे रहिवाशी आपला एजेंडा राबवत असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. लता दीदी आणि आशाताईंबदद्ल मला किती आदर आहे, हे मला कुणी शिकवण्याची गरज नसल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलंय.
शिवसेनेने लतादीदी आणि आशाताई महाराष्ट्राची मानचिन्हं आहेत, यांच्यावर चिखलफेक नको, असं प्रसिद्धी पत्रक काढलं होतं, त्यावर राज ठाकरे बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, मी काल पेडररोड फ्लायओव्हर च्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती, यामुळे कुणाला मध्ये पडायची गरज नव्हती.
पत्रकार परिषदेचा विषय हा काही लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांचा नव्हता, असं राज ठाकरे यांनी आज डोंबिवलीत स्पष्ट केलंय.
शिवसेनेचं पत्रक हास्यास्पद
पत्रकार परिषदेत शिवसेनेचे पत्रक दाखवत राज ठाकरे म्हणाले, शिवसेनेनं आज हे पत्रक काढलंय. चॅनेल्सवरून मला कळलं, हे हास्यास्पद पत्रक आहे, याला आगापिछा नाही. स्टेडियमच्या बाहेर बॉल गेल्यासारखं आहे.
मुंबईतील पेडररोडवरून दिवसभरातून १ लाखाच्यावर गाड्या जातात. दहा लाख लोक ये-जा करतात. मग का तो पेडररोडचा फ्लायओव्हर का थांबवला जातो, हा माझा प्रश्न असल्याचं राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
ही काय मानचिन्हाची लक्षणं?
पत्रक वाचवून दाखवतांना राज ठाकरे म्हणाले, सचिन तेंडुलकर जर महाराष्ट्राचं मानचिन्ह आहे. सचिन जेव्हा नव्या घरात रहायला गेला, तेव्हा त्याच्याकडे महापालिकेचं नाहरकत प्रमाणपत्र नव्हतं, म्हणून त्याला महापालिकेने ५ लाखाचा दंड ठोठावला, मग ही काय मानचिन्हाची लक्षणं आहेत का? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.
वाढीव एफएसआय मागणे अनधिकृत?
सचिनच्या घराचं उदाहरण देत राज ठाकरे म्हणाले, सचिनने तेंडुलकरने नगरविकास मंत्रालयाला पत्र लिहून वाढीव एफएसआयची मागणी केली, मग हे अधिकृत आहे की अनधिकृत? अनधिकृतरित्या सचिन तेंडुलकरला एफएसआय द्यावा असं माझं म्हणणं होतं का असं राज यांनी म्हटलंय.
सचिनने राज्य सरकारकडेही एफएसआयसाठी परवानगी मागितल्यावर राज्य सरकारने सांगितले की, ही परवानगी तुम्हाला महापालिका देऊ शकते, असं उत्तर सचिनला मिळाल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
ही काय तेंडुलकर व्हर्सेस मंगेशकर मॅच आहे का?
ही काय तेंडुलकर व्हर्सेस मंगेशकर मॅच आहे का? असा सवाल करत पत्रकात, काही कशाचा थांगपत्ता नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय.
सचिनवर अनेकदा सामनातून चिखलफेक झालीय, सचिन खिशात हात घालत नाही, बॅटाविकतो, मग ही टीका हा काही महाराष्ट्राचा मान होता का? असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.
पेडररोडचा फ्लाय ओव्हर व्हावा किंवा ना व्हावा? उद्धव ठाकरेंना सवाल
पेडररोडचा फ्लाय ओव्हर व्हावा किंवा ना व्हावा? असा सवाल उद्धव ठाकरेंना आहे. पेडर रोडचा फ्लाय ओव्हर व्हावा की होऊ नये, हे पत्रकात का नाही छापलं. भलतं सलतं काही तरी का छापावं, अशी टीका राज ठाकरेंनी केलीय.
यांना परिक्षेला बसवायला हवं होतं?
माझ्या परिक्षा संपलेल्या आहेत, पत्रक दाखवत राज ठाकरे म्हणाले, यांनाही मी परिक्षेला बसवलं असतं तर बरं झालं असतं. चूक झाली माझी असा त्रागाही राज ठाकरेंनी दाखवला.
फ्लाय ओव्हरसाठी जनसुनावणी नको?
पेडररोड फ्लायओव्हरच्या जनसुनावणीला राज ठाकरेंनी विरोध केलाय. पेडररोडच्या फ्लायओव्हरसाठी जनसुनावणी होते, मग मुंबईतल्या इतर फ्लायओव्हरसाठीही होईल. ठाणे, नाशिक, नागपूर आणि मग फ्लाय ओव्हरची कामं रखडतील आणि राज्याच्या विकासाला खिळं बसेल, म्हणून राज्य सरकारला विनंती आहे की, कृपया पेडररोडच्या फ्लायओव्हरसाठी जनसुनावणी घेऊ नका.
कुणी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोकांना सरकारने झुकतं मार देऊन भेदभाव करू नये, मुंबईकरांना नव्हे तर बाहेरून येणाऱ्यांनाही हा पेडररोडवरचा फ्लायओव्हर महत्वाचा आहे.
मंगेशकरांसाठी कायद्याला बगल का?: राज ठाकरे
गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि त्यांच्या कुटुंबाने पेडर रोडवरील फ्लायओव्हरला विरोध केल्याने हा पूल कित्येक वर्षे रखडला होता. त्यामुळे मंगेशकरांसाठी कायद्याला बगल का देता असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केला आहे.
पेडर रोडवरील फ्लायओव्हरसाठी नागरिकांशी चर्चा करता पण इतरत्र पूलांसाठी नागरिकांसोबत चर्चा का करत नाही असं राज म्हणाले.
सरकारने लता मंगेशकर यांच्या विरोधापुढे मान झुकवत पेडर रोडवरील पुलाचा प्रस्ताव मागे घेतला. त्याऐवजी हाजी अली जंक्शन आणि महालक्ष्मी इथल्या कॅडबरी जंक्शन इथे दोनफ्लायओव्हर बांधण्यात येणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी दिली होती.
या संदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. पेडर रोडचा फ्लायओव्हर न झाल्यास मुंबईत कोणताही फ्लायओव्हर होऊ देणार नाही, असा इशाराही मनसेने दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी मात्र पेडर रोड फ्लायओव्हरसंदर्भात कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याचं सांगितलं आहे.
सरकारने हा विरोध लक्षात घेऊन नमती भूमिका घेतल्याने या मुद्द्यावर मनसे आक्रमक झाली आहे.