ज्या पद्धतीने मोटर मनने मुंबई करांना वेठीस धरले आहे ते बघून तर कोणीही मुंबई कर संतप्त होणारच ..... काल सकाळी त्यांनी लोकल चालू दिल्या आणि घरी जाताना बंद केल्या .... ह्यांना कल्पना आहे का कि लोकांना त्याचा किती त्रास होतो? .... आता काही नाही जर ह्यांनी आंदोलन बंद नाही केले तर धरून मारा .... अजून काय, किती वेळ लोकांच्या सहन शीलतेचा अंत बघणार हे लोकं ????
खालील बातमी सकाळ च्या सौजन्याने ......
विनोद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई- मोटरमनने पुकारलेला संप अत्यंत चुकीचा असून, त्यांनी संध्याकाळपर्यंत संप मागे घेतला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोटरमनच्या विरोधात आंदोलनास उभा राहील. असा सज्जड इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) दिला. मोटरमनच्या मागण्या कितीही रास्त असल्या, तरी आंदोलनाची ही पद्धत चुकीची आहे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
या विषयावर बोलण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मोटरमन यांच्या संपाव्यतिरिक्त कोणत्याही अन्य विषयावर बोलणे त्यांनी या वेळी टाळले.
ठाकरे म्हणाले, मोटरमनच्या मागण्यांविषयी आम्हालाही सहानुभुती आहे. पण, आपल्या मागण्या मांडण्यासाठी प्रवाशांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत मोटरमननी आपला संप मागे घ्यावा. अन्यथा मोटरमनच्या विरुद्ध मनसे आंदोलनाला उभा राहील. सरकारनेदेखील कठोर पावले उचलून रेल्वे सेवा सुरळित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे. ताब्यात घेतलेल्या १७० मोटरमनना संध्याकाळपर्यंत कामावर हजर राहण्यासाठी सोडून दिले पाहिजे.
मोटरमननी एक महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाला नोटीस दिली होती. मात्र, त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही, याबाबत विचारता ठाकरे यांनी सरकारला त्यांच्या जबाबदारीची आठवण करून दिली. सरकारने वेळीच लक्ष घातले असते, तर आजची परिस्थिती उद्भवली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले. मात्र, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनीदेखील याचा विचार केला पाहिजे. त्यांच्यावर सरकारने चाप लावला पाहिजे, जेणेकरून अशाप्रकारची अडवणूक थांबेल, असे ते म्हणाले.
लोकल स्ट्राइक - योग्य? की अयोग्य?
ReplyDeleteमुंबईची लाइफ लाइन म्हणा किंवा मुंबईच्या लोकांचा पांगुळगाडा म्हणा, जर लोकल बंद झाली तर मुंबईकर पुर्णपणे हॅंडीकॅप होतो. काल संध्याकाळनंतर कोलमडलेल्या वाहतुक व्यवस्थेवरुन हे लक्षात आलंय. मुंबईची बहुतेक सगळी ऑफिसेस टाउन एरिया मधेच आहेत. काल जेंव्हा स्ट्राइक झाला तेंव्हा शिवसेनेने या मोटरमन लोकांना सपोर्ट दिला होता. पण आज राज ठाकरेंनी जेंव्हा मनसे रस्त्यावर उतरेल असे स्टेटमेंट दिले, तेंव्हा मात्र शिवसेनेने पण आपला पाठींबा काढुन घेतला. पण सुरुवातीला या आंदोलनाला का बरं पाठींबा दिला ह्याचं स्पष्टीकरण हे शिवसेनेला द्यावेच लागेल. सामान्य जनतेला वेठीला धरण्याच्या या अशा संपाला शिवसेनेला का पाठींबा द्यावासा वाटला? आणि मनसेने रस्त्यावर उतरायचे म्हंटल्यावर का बरं पाठिंबा विथड्रॉ करावासा वाटला?
कुठल्याही केस मधे राज ठाकरेच्या आधी आपण काही तरी करतोय हे दाखवण्याचा अट़्टाहास आहे हा. मग असे चुकिचे निर्णय घेतले जातात आणि हसू होतं जनतेमधे. जर तुमचा पक्ष सामान्यांच्या वेदना, प्रॉब्लेम्स समजू शकत नसेल सामान्य जनता नक्किच तुमच्या पासुन तॊडल्या जाईल. भाजपा ने पण ह्या मोटरमनला सपोर्ट आहे असे प्रसिध्द केले होते.
पुन्हा एकदा आपला विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे आपलेच दात आपल्याच घशात घालुन घेण्याची वेळ आलेली आहे शिवसेनेवर.
त्यांच्या मागण्या काहीही असो, पण त्या मागण्यांसाठी लाखो सामन्य जनतेला वेठीस धरणे योग्य होणार नाही. मुंबई साठी एसेन्शिअल सर्व्हिस म्हणुन घोषीत करायला हवी लोकल सेवा, म्हणजे पुन्हा असे प्रकार थांबतील.
खरं आहे महेंद्र जी, लोकल सेवा हि इसेन्शियल सर्विस म्हणून घोषित करायला पाहिजे ....... आता त्यांनी एस्मा कायदा लागू केला आहे पण हे म्हणजे "बैल गेला आणि झोपा केला"
ReplyDeleteलोकलच्या संपामुळे होणाऱ्या त्रासाची जाणीव मनसेला झाली हे स्तुत्यच आहे. आशा आहे की लोकांना वेठीस धरणारी आंदोलने मनसे पण करणार नाही. नाहीतर आपला तो बाळ्या आणी दूसऱ्याचा तो बंड्या अशातली गत!
ReplyDeleteमला नाही वाटत कि मनसे नि कधी लोकांना वेठीस धरणारी आंदोलने केली असतील .... मनसे च्या आंदोलना मध्ये लोकांचा उस्फुर्त सहभाग होता म्हणूनच ती यशस्वी झाली. उदाहरणार्थ मराठी पाट्या, जया बच्चन, रेल्वे परीक्षा इत्यादी .....
ReplyDeleteif MNS can take things in hands for other issues, why did MNS choose not to act in support of these people "before" the strike.
ReplyDeleteis it because the motormen are not all Marathi?
if MNS can take people for granted, its fine, but if people take people for granted, they have problem? grow up MNS!
किरण, तुम्हाला काय म्हणायचे आहे ते काही कळाल नाही. तुम्ही म्हणताय "if people take people for granted then they have a problem" .... कोणी कोणाला गृहीत धरलय? आम्ही तर लोकांना मुळीच गृहीत धरत नाही .... किंबुहना राज साहेबांचा हा तर निवडणुकीतील मुद्दाच होता कि सत्ताधारी आणि विरोधी पक्ष लोकांना गृहीत धरतात .... हि जनता काय त्यांच्या गोठयातील गाय नाही कि तुम्ही काहीही करा पण ती तुम्हाला मतदान करतील .... राहिला प्रश्न मोटोरमेन च्या संपाचा ... त्या बद्दल तर राज साहेब म्हणालेच ना कि त्यांच्या मागण्या योग्य असतील पण सर्व जनतेला वेठीस धरने चुकीचे आहे ...
ReplyDeleteclarification- "if people (motermen) take people (commuters) for granted then they (mns) have a problem"
ReplyDelete>>किंबुहना राज साहेबांचा हा तर निवडणुकीतील मुद्दाच होता कि सत्ताधारी आणि विरोधी पक्ष लोकांना गृहीत धरतात
MNS is no different.
I had high expectations from MNS when it was formed. But unfortunately the honeymoon is over. Today most of their politics revolves around Rada and shivsena.
MNS has supported Rada culture and I am surprised how MNS is condemning peaceful strike by these people who fought for their stomoch and not for political gains. They work in real stessful and adverse conditions like most public servents (police, postmen). They planned in advance and till then no party was coming ahead. Now after the strike affected people, everyone is trying to cash on it.
Fighting for marathi and fighting with non-marathi is different in my opinion. During MNS protests, MNS did not attack marathis. But the protests do affect lives of marathi on a larger view.
MNS way of fight is half-baked solution. What has thrived here (immigrants) has taken years. it cannot be iradicated by a stop-gap measure ment of hitting people or sending more energy against other parties (http://mi-maharashtracha-maharashtra-maza.blogspot.com/2010/05/blog-post_05.html).
Note-I do not support any political party so do not assume or count me in anti-MNS group. This is purely a political view and not anti-person or anti-Raj or anti-you. Hope you understand this.
I dont think my views are welcome on this site so consider this as my last comment here.
Kiran
ReplyDeleteLet me clarify that your suggestions / comments are appreciated on my blog and I don't think in my earlier reply gave a slightest hint that those comments were not appreciated hence you can always comment on views expressed.
Vinod
आभार!
ReplyDeleteतुमचा ब्लॉग वाचतो अधून-मधून. राजकारण (शब्दश:) हा अभ्यासापेक्षा जिव्हाळ्याचा विषय आहे. जिव्हाळ्याचा असा कारण राजकारणात काहीही झालं की त्याचे परिणाम आमच्यासारख्या, राजकारणात मतदानापलिकडे काहीही न करणार्यांवर होतो आणि कधीतरी लिहिल्याशिवाय राहवत नाही :)
धन्यवाद किरण,
ReplyDeleteखरं म्हणजे आता वेळ आली आहे की सुशिक्षित तरुण पिढीने राजकारणात उतरावे ..... ज्या वेळेस मी प्रचार निमित्त फिरतो त्यावेळेस लक्षात येते कि कुठल्या प्रकारच्या लोकांच्या हातात आपण आपल्या शहराचे नशीब हवाली करतो ... (त्यात आमचा पक्ष देखील आहे) .... पण आपण किती वेळ लोकांसाठी खर्च करतो? नगण्य .... साध रस्त्यात काही प्रॉब्लेम झाला तर आपण दुर्लक्ष करून निघून जातो .... तेव्हा मी ठरवल की आधी सुरवात स्वता पासून करायची .... निदान काही समाजपयोगी गोष्टी तर कराव्या ... मग आपोआप रस्ता सापडेल ...