म टा च्या सौजन्याने
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
डोळ्याची पारणे फिटतात म्हणजे काय याचा प्रत्यय सचिनची बुधवारी खेळलेली खेळी आहे। वन डे क्रिकेटमध्ये २०० धावा करणारा तो या पृथ्वीतलावरील पहिला व्यक्ती होण्याचा मान मिळविल्याने मला खूप आनंद झाला आहे, त्यामुळे त्याला कडकडून मिठी मारावीशी वाटते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सचिनच्या द्विशतकी खेळीनंतर व्यक्त केली.
क्रिकेटचा देव आणि जुना मित्र असलेल्या सचिन तेंडुलकरबरोबर राज ठाकरे यांनी वांद्रेच्या एमआयजी क्लबवर अनेकदा क्रिकेट खेळले आहे। सचिनचे कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. स्वतःचे रेकॉर्ड करून ते मोडून पुन्हा नविन रेकॉर्ड फक्त सचिनच करू शकतो. भावी पिढीला हे रेकॉर्ड मोडणे कठीण आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एमआयजी क्लबवर सचिनबरोबर क्रिकेट खेळताना तो आपल्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घ्यायचा, पण त्यांने घेतलेला हा समाचार खूप हवा हवासा आणि प्रेक्षणीय वाटायचा. त्याचं ते टाइमिंग, शॉर्ट सिलेक्शन इतक देखणं असायचं की आपल्याला सर्व काही विसरायला व्हायचं, असं राज ठाकरे यांनी यापूर्वी मटा ऑनलाइनला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं होतं.
No comments:
Post a Comment