Thursday, August 26, 2010

इंजिनामागेच डबे धावतातः राज ठाकरे

म टा च्या सौजन्याने



मटा प्रतिनिधी । मुंबई

मराठी चित्रपटांच्या तिकिटांचे दर कमी करण्यावरून शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष आमन-सामने आले आहेत. मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चित्रपट पाहण्याएवढे मराठी प्रेक्षक गर्भश्रीमंत नाहीत. त्यांच्या घरासमोर पैशांचे झाड नाही, असेही उद्धव म्हणाले. मात्र संध्याकाळी याच मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगळे मत व्यक्त केले. मराठी चित्रपट पाहणे न परवडायला मराठी माणूस दरिद्री नाही. याच मराठी माणसाला हिंदी चित्रपट पाहणे परवडत असेल तर मराठी चित्रपटांची तिकिटे कशी परवडत नाहीत? अर्थात मराठी चित्रपटांचे दर कमी झाले तर आपल्याला आनंदच आहे. मराठी चित्रपटांवरून रंगलेल्या राजकीय स्पधेर्शी आपला काहीही संबंध नाही. मात्र हा मुद्दा सर्वप्रथम कोणी उचलला ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. शेवटी 'इंजिन' हे पुढेच धावेत आणि त्याच्या मागोमाग डबे धावतात.

Monday, August 23, 2010

मनसेनी मोडली रिक्षांची मुजोरी

खालील वृत्त म टा च्या सौजन्याने .....


म. टा. प्रतिनिधी

भाडे नाकारून प्रवाशांना वेठीला धरणाऱ्या रिक्षाचालकांची दंडेली मोडून काढण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर २४ तास उलटत नाहीत तोच ठाण्यात मनसैनिकांनी मुजोर रिक्षाचालकांना धडा शिकवला. मनसैनिकांनी ठाण्यात रस्त्यावर उतरत वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांना चांगलाच चोप दिला.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मागील आठवड्यात मुंबईत वाहतूक शाखेचे सहआयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन प्रवाशांना नाडणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी केली होती. मुंबईप्रमाणेच ठाण्यातही रिक्षाचालकांची दादागिरी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेेचे ठाणे उपशहरप्रमुख राजेश मोरे व सरचिटणीस सुरेश कोलते यांच्या नेतृत्वाखाली मनसैनिकांनी शुक्रवारी संध्याकाळी अचानक रिक्षाचालकांविरोधात आंदोलन पुकारले.

मनसैनिकांनी आंदोलन केले, त्यावेळी स्टेशन परिसरातील रिक्षा स्टॅण्डवर शेकडो प्रवासी रांगेत तिष्ठत असताना काही रिक्षाचालक रिक्षा मध्येच उभी करून भटकत होते. तर काही रिक्षाचालक नेहमीप्रमाणे भाडे नाकारताना आढळून आले. अशा रिक्षाचालकांना मनसैनिकांनी चोप दिला. त्यानंतर गावदेवी, तलावपाळी, जांभळी नाका परिसरातही मनसैनिकांनी आंदोलन केले. यापुढेही रिक्षाचालकांची मुजोरी कायम राहिल्यास अचानक आंदोलन करण्याचा इशारा राजेश मोरे यांनी दिला आहे.

वपुर्झा .....

सध्या वपुर्झा परत एकदा वाचतोय, त्यामधील आवडलेलं एक वाक्य

कबुतराला गरुडाचे पंख लावून आकाशात उंच भरारी घेता येईलही पण आकाशाला गवसणी घालण्याचे वेड हे रक्तातच असावे लागते ... आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .........

व पु काळे (वपुर्झा, पान १०० )

Thursday, August 19, 2010

कायदा मोडणा-यांना मोडतो - राज

म टा च्या सौजन्याने


* मुजोर टॅक्सी-रिक्षाचालकांना राज यांचा इशारा

म. टा. खास प्रतिनिधी

टॅक्सी-रिक्षावाले भाडे नाकारून कायदा मोडतात. आम्ही कायदा मोडत नाही. आम्ही कायदा मोडणा-यांना मोडतो. त्यामुळे रिक्षा टॅक्सीवाल्यांनी शिस्तीत कायदा पाळायला शिका, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी दिला.

मुंबईसह महाराष्ट्रातल्या प्रमुख मोठ्या शहरातील टॅक्सी-रिक्षाचालकांच्या अरेरावीच्या विरोधात मनसचे अध्यक्ष राज ठाकरे व आमदार बाळा नांदगावकर यांनी वाहतूक शाखेचे सहपोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. मुंबईतील खड्डे, कायदा मोडण्याची प्रवृत्ती, वाहतुकीतील बेशिस्तपणा अशा अनेक मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मुंबईत भाडे नाकारण्याचे प्रकार सर्रास घडतात. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे टॅक्सी-रिक्षा स्टँडवर वाहतूक शाखेच्या संबंधित अधिकाऱ्याचे नाव व मोबाइल क्रमांकांचे फलक लावावेत. त्यामुळ भाडे नाकारले तर प्रवासी थेट संबंधित अधिकाऱ्याला फोन करून तक्रार करतील. फणसकर यांनी ही सूचना मान्य केल्याचे राज म्हणाले.
..................

'टोल'करी खड्ड्यांची जबाबदारीही घ्यावी

भाडे नाकारून टॅक्सी-रिक्षावाले कायदा मोडतात. आम्ही कायदा मोडत नाही कायदा मोडणाऱ्यांना मोडतो. मग आम्ही कायदा मोडतो म्हणून बोलू नका, असे राज म्हणाले. चेंबूर, मानखुर्द, वडाळा येथे मालवाहू ट्रक-ट्रेलर वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करतात. लेनची शिस्त पाळत नाहीत. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. शहरात येताना टोल वसूल करणाऱ्यांनी फक्त टोल वसूल करू नये, तर रस्त्यांवरील खड्ड्यांचीही जबाबदारी घ्यावी. बोगस टॅक्सी-रिक्षांवर कारवाईची मागणी केल्याचे ते म्हणाले.

भीती वाटेल असा दंड हवा

एकाच परमिटवर चार-पाच टॅक्सी व रिक्षा रस्त्यावर धावत आहेत. त्यांच्याकडे पक्के वाहन परवाने नाहीत. त्यांचे परमिट व फोटो टॅक्सी-रिक्षावर लावा. सिग्नलचे नियम पाळले जात नाहीत. कायद्याचा धाक वाहनचालकांना राहिलेला नाही. वाहनचालकांना भीती वाटेल, अशी दंडाची रक्कम व कारवाई करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या शिष्टमंडळात आमदार नितीन सरदेसाई, अतुल सरपोतदार, बंटी म्हशीलकर, मनोज हाटे यांचा समावेश होता.

Wednesday, August 18, 2010

रिक्षा-टॅक्सीचालकांची मुजोरी मोडा!

म टा च्या सौजन्याने


मुंबईतल्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांची मग्रुरी मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता मैदानात उतरलेत. मनमानी करत, भाडी नाकारणा-या रिक्षा-टॅक्सीचालकांची तक्रार करण्यासाठी अधिकारी नियुक्त करा आणि त्यांचे संपर्क क्रमांक प्रत्येक स्टँडवर लावा, अशी सूचना त्यांनी आज वाहतूक सहआयुक्तांची भेट घेऊन केली.

मुंबईतल्या अनेक रिक्षा-टॅक्सीवाल्यांकडे लायसन्स नसतं. अशा चालकांचा फोटो, पत्ता आणि मोबाइल नंबर टॅक्सीच्या मागे लावणं बंधनकारक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

नही चलेगा , असं उत्तर अत्यंत आगाऊपणे देऊन रिक्षा-टॅक्सीवाले भाडं नाकारतात. जवळचं अंतर असेल तर त्यांची मुजोरी संतापजनक असते. त्यांच्या या मनमानीच्या निषेधार्थ मुंबईत नुकतंच मीटर जॅम आंदोलन झालं आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, रिक्षा-टॅक्सीचालकांच्या विरोधातील जनमानसाच्या भावना लक्षात घेऊन या आंदोलनात राज ठाकरे यांनी उडी घेतली. वाहतूक सहआयुक्त विवेक फणसळकर यांना भेटून त्यांनी वेगवेगळ्या सूचना केल्या.

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रिक्षा-टॅक्सीचालक बिनधास्तपणे वाहनं चालवत असतात. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतो, अपघाताचीही भीती असते. अशा चालकांवर जरब बसेल अशी कठोर कारवाई व्हायला हवी, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली. भाडे नाकारण्याचे प्रकार तर सर्रास होतात. त्याला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेनं तक्रार निवारण कक्ष सुरू करावा, तिथला संपर्क क्रमांक सर्व रिक्षा-टॅक्सी स्टँडवर आणि प्रमुख रस्त्यांवर लावावा, तिथे प्रवाशांच्या तक्रारी नोंदवून घेता येतील आणि दोषी चालकांवर कारवाई करता येईल, याकडे राज यांनी लक्ष वेधलं.

येत्या काही दिवसांत या सूचनांवर अमलबजावणी करण्याचं आश्वासन यावेळी फणसळकर यांनी दिलं आहे.

Tuesday, August 17, 2010

'खळ्ळ खटाक'चा 'पिक्चर' अधिवेशनात

म टा च्या सौजन्याने


मल्टिप्लेक्समध्ये 'प्राइम टाइम'ला मराठी चित्रपटच दाखविले पाहिजे याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी पुनरुच्चार केला. मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबत काढण्यात आलेल्या सरकारी जीआरची अमलबजावणी व्हावी, यासाठी मनसे हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करेल, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

मराठी चित्रपट निर्मात्यांसोबत एमआयजी क्लब येथे आयोजित केलेल्या बैठकीनंतर राज ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. मराठी चित्रपट प्राइम टाइमला न दाखविणाऱ्या मल्टिप्लेक्सची मनसे कार्यर्कत्यांनी केलेल्या तोडफोडीचा दाखला देत मराठी चित्रपट दाखविले नाहीत तर काय होते हे आम्ही गेल्याच आठवड्यात दाखवून दिले आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मराठी चित्रपट सीरियल्ससारखे असतील तर ते कोण पाहणार? मराठी चित्रपट निर्मार्त्यांन नव्या संकल्पना, विषय हाताळावेत आणि मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे खेचून आणावे, असे आवाहन त्यांनी यावेळी मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांना केलेे.

अनोखे पत्र

मराठी नाटक आणि चित्रपटांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मराठी बोलणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपण व्यक्तिश: पत्र लिहून चित्रपटगृहात जाऊन नाटक आणि सिनेमे पाहण्याबाबत आवाहन करणार असल्याचा मनोदय राज यांनी यावेळी व्यक्त केला.

डोंबिवली शिधावाटप कार्यालयात 'अंधारच'

म टा च्या सौजन्याने


डोंबिवली पूवेर्तील शिधावाटप कार्यालयाचे उद्घाटन झाल्याला वर्ष उलटले, तरी अद्याप हे कार्यालय नागरिकांसाठी खुले करण्यात आलेले नाही. या कार्यालयासाठीचे वीजमीटर महापालिकेने घ्यायचे की शिधावाटप विभागाने, असा वाद आहे. क्षुल्लक कारणामुळे शिधावाटपासारखे महत्वाचे कार्यालय सुरू होत नसल्याने मनसैनिकांनी या कार्यालयाचे सोमवारी वर्षश्राध्द घातले.

डोंबिवली पूवेर्कडील लाखो रहिवाशांना शिधावाटप कार्यालय नव्हते. त्यामुळे केडीएमसीने पूवेर्ला छत्रपती शिवाजी महाराज भाजीमंडईत शिधावाटप कार्यालयासाठी जागा दिली. तत्कालीन आमदार हरिश्चंद पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून १० लाख रुपये कार्यालयासाठी दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी मागील वषीर् १६ ऑगस्ट रोजी या कार्यालयाचे वाजतगाजत उद्घाटन झाले.

उद्घाटनानंतर या कार्यालयातून प्रत्यक्ष सेवा मिळण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. पण एक वर्ष उलटल्यावरही कार्यालयाचे दरवाजे उघडलेले नाही. ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याने पालिकेने वीजेचे मीटर घ्यावे, आम्ही बिल भरू असे शिधावाटप कार्यालयातील अधिकाऱ्यांचे, तर भाडेकरू असले तरी मीटर शिधावाटप विभागानेच घ्यावे असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

त्यामुळे मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यालयाचे वर्षश्राध्द घालून आपला संताप व्यक्त केला. श्राध्दाच्या वेळी होणारे सर्व विधी या कार्यालयात सकाळी करण्यात आले. आंदोलनाचा हा नवा प्रकार पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गदीर् उसळली होती. एवढा प्रकार झाल्यावर तरी हा प्रश्न मागीर् लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र महापालिकेने मीटर घेतल्यास आम्ही २४ तासांत कार्यालय सुरू करू असे शिधावाटप कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कदम यांना सांगितले. आंदोलनाच्या धसक्याने महापालिकेने मात्र मीटरच्या रकमेचा तातडीने भरणा केला. या कार्यालयासाठी आवश्यक असलेली पाण्याची जोडणीही येत्या २ दिवसांत दिली जाईल, अशी माहिती डोंबिवलीचे प्रभारी उपायुक्त सुभाष भुजबळ यांनी दिली.

टोलनाक्यावर मनसेचा हल्लाबोल

म टा च्या सौजन्याने

जर रस्ता दुरुस्त करत नसतील तर टोल कशाला भरायचा ?????

विनोद



खड्डयात गेलेल्या मुंब्रा बायपास रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालकांचे अतोनात हाल होत असून त्याच्या निषेधार्थ मनसेने सोमवारी येथील टोलनाक्यावर हल्लाबोल केला. टोल वसुली करणाऱ्या केबिनवर तुफान दगडफेक करून त्या केबिन कार्यर्कत्यांनी उलथवून टाकल्या. आंदोलन सुरू असेपर्यंत टोलवसुली बंद झाली होती.

खड्डयात गेलेल्या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती केली नाही, तर या रस्त्यावरील टोल वसुली बंद करू, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी दिला असला, तरी मुंब्रा बायपासचे काम पाहणाऱ्या अटलांटा कंपनीने या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. रस्त्याची दुरूस्ती कासवाच्या गतीने सुरू आहे. या खड्ड्यात गेेलेल्या रस्त्यावरील प्रवासासाठी टोल भरावा लागत असल्याने वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही मुंब्रा बायपासची दुरूस्ती होत नव्हती आणि टोल वसुली सुरू होती. त्यामुळे मनसेच्या कार्यर्कत्यांनी शहर अध्यक्ष हरी माळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. रस्ता दुरूस्त होत नाही, तोपर्यंत टोल वसुली करू दिली जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका कार्यर्कत्यांनी घेतली. सुरवातीला कर्मचाऱ्यांशी बाचाबाची झाल्यानंतर मनसेच्या कार्यर्कत्यांनी दगडफेक केली. मुंब्रा पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूवीर्च हे आंदोलनकतेर् पसार झाले होते.

Monday, August 16, 2010

दोन फुल एक हाफ

खालील लेख हा लोकसत्ता च्या लोकरंग ह्या पुरवणीतून घेतला आहे ......

विनोद



दोन फुल

‘तवंग कुठे आहे?’
‘साहेब, तो बघा तवंग. दिसला का?’
‘नाही दिसला बुवा. तुम्ही कुठे पाहता आहात तेच कळत नाही मला!’
‘डावीकडे बघा साहेब, मग जरासं उजवीकडे. हं, आता दिसला? तो जो काळपट रंगाचा पट्टा दिसतो ना, तोच तवंग आहे. दिसला?’
‘थांबा, थांबा. जरा नीट बघू द्या. हे हेलिकॉप्टर फार हलतं बुवा, त्यामुळं त्रास होतो. कुठं म्हणता? डावीकडे? अच्छा. थांबा थांबा, दिसला मला तवंग. अरे बापरे! केवढा मोठा काळा पट्टा आहे तवंगाचा! आणि त्या तवंगाच्या अगदी बाजूलाच ताजमहाल हॉटेल आहे. ते तेल हॉटेलमध्येही जाऊ शकतं..!’
‘ताजमहालच्या बाजूला? साहेब, तुम्ही नेमकं काय बघता आहात? अहो साहेब, जो काळपट पट्टा तुम्ही पाहिला ना, तो तवंग नव्हे, रस्ता आहे तो. इकडे या बाजूला बघा.’
‘अच्छा- रस्ता होता का तो? मला वाटलं, तवंग आहे. कधी पाहिला नाही ना यापूर्वी; त्यामुळं माहिती नाही नेमका कसा दिसतो ते.’
‘काही काळजी करू नका साहेब, मी दाखवतो तुम्हाला तवंग. तुम्हाला ते एका बाजूला कलंडलेलं जहाज दिसलं का?’
‘जहाज..? हो, दिसलं आत्ता. ते कलंडलेलं असूनही केवढय़ा वेगानं जात आहे.. कमाल आहे!’
‘वेगानं जात आहे? मला काही कळतच नाही साहेब, तुम्ही कुठलं जहाज बघता आहात? मी म्हणतो ते जहाज एकाच जागी थांबलेलं आहे कलंडून!’
‘मग एकाच जागी थांबलेलं जहाज मला कशाला दाखवता?’
‘साहेब, आपण तवंग बघायला आलो आहोत ना?’
‘म्हणून तर म्हणतोय- तवंग दाखवा, जहाज कशाला दाखवता? एक तर या पंख्याचा आवाज एवढा आहे की काही नीट ऐकायला येत नाही. एवढय़ा उत्साहानं आलो तवंग बघायला- आणि तवंगच दिसत नाही.’
‘साहेब, असे निराश नका होऊ. दिसेल तवंग. आधी मला सांगा- कलंडलेलं जहाज दिसलं का?’
‘अहो, तुम्ही मला सारखं सारखं जहाज पाहायला का सांगता? आधी मला तवंग दाखवा, मग मी ते कलंडलेलं जहाज पाहीन.’
‘सॉरी, सीएम साहेब. मला वाटत होतं की, जहाज दिसलं की तवंग पाहणं सोपं जाईल. बट इट्स ओके. आपण आधी तवंग पाहू, नंतर जहाज पाहू कलंडलेलं.’
‘ठीक आहे. सांगा- कुठं पाहू? डावीकडे की उजवीकडे?’
‘उजवीकडे पाहा साहेब.’
‘पण तुम्ही मघाशी डावीकडे म्हणाला होता ना? तुम्हाला तरी नक्की दिसला आहे ना तवंग? की उगाचच आपलं डावीकडे, उजवीकडे बघायला सांगता आहात?’
‘सर, आपलं हेलिकॉप्टर मूिव्हग आहे, त्यामुळं आपली पोझिशन चेंज होते सारखी, त्यामुळं तवंगाची पोझिशनही चेंज होते.’
‘बरं ठीक आहे. उजवीकडे बघतो.’
‘नो सर, आता अगेन डावीकडे सर. सॉरी सर!’
’ ’

‘साहेब, फोन आहे.’
‘अरे, नको फोन देऊ आत्ताच. मला नीट तवंग तरी बघू दे! कोण आहे फोनवर?’
‘मॅडम आहेत साहेब?’
‘मॅडम? त्या आल्या भारतात परत? दे बाबा, फोन दे. तवंग नंतर पाहता येईल. तो कुठं जातो?’
‘त्या मॅडम नाही साहेब, घरच्या मॅडम आहेत.’
‘बरं, तरी दे. घरच्या आहेत म्हणून काय झालं, मॅडमच आहेत ना? हॅलो.. बोल गं. अगं, हेलिकॉप्टरमध्ये आहे मी. तवंग बघायला आलो आहे.’
‘..’
‘तवंग, तवंग.. अगं, तू बातम्या बघत नाहीस का..? तर तो जो तवंग आहे ना पसरलेला समुद्रावर, तो बघायला आलोय.’
‘..’
‘जहाज? कलंडलेलं? तुलापण जहाज माहिती आहे का कलंडलेलं? बरं बरं, बघतो. हो. जेवायला बंगल्यावरच आहे आज. बरं, चल बाय. मी आता तवंग बघतो.’
‘तर. साहेब, आता आपण जरा कमी उंचीवर आलो आहोत. तो बघा- तिकडे डावीकडे.. समुद्राच्या पाण्यावर जी मोठी काळपट लेअर आली आहे ती..’
‘ती लेअर जाऊ दे, मला आधी ते कलंडलेलं जहाज दाखव. बायको म्हणत होती आत्ता की ते सॉलिड कलंडलं आहे म्हणून!’
‘सर, मी तुम्हाला तेच म्हणत होतो. तुमच्या साईटला एकदा ते कलंडलेलं जहाज लोकेट झालं ना, की मग तवंग चटकन् दिसेल. नाऊ, सी टू युवर लेफ्ट..’
‘अरे, माझी मान दुखायला लागली आहे, लेफ्ट-राइट पाहून. हा तवंग आहे कुठं? एक तर इथून सगळी जहाजं मला सारखीच दिसताहेत. त्यात कलंडलेलं जहाज कसं शोधायचं आता? मला सांगा- ते कुठल्या बाजूला कलंडलेलं आहे?
‘सर, आत्ता ते डाव्या बाजूला कलंडलेलं आहे. पण बाय द टाइम तुम्ही ते बघाल, तेव्हा मे बी ते उजवीकडे कलंडलेलं असेल.’
‘म्हणजे ते पाण्यात सारखं डुचमळत आहे का?’
‘नो सर, आपण हवेत डुचमळत आहोत. सॉरी सर. आता जरासं मागं वळून बघावं लागेल.. ऑर वेट फॉर टू मिनिट!’
‘आता हे तवंग- तवंग खूप झालं. तुम्ही सगळ्यांनी पाहिला ना तवंग? तुम्हाला सगळ्यांना दिसला ना तवंग? मग चला, हेलिकॉप्टर घ्या खाली!’
हेलिकॉप्टर खाली आलं- तर खाली उपमुख्यमंत्री उभे. मुख्यमंत्री म्हणाले,‘हे कसे काय माझ्या स्वागतासाठी आले?’ तर तेवढय़ात अधिकारी म्हणाला, ‘त्यांनाही हेलिकॉप्टरमधून तवंग पाहायचा आहे साहेब.’
मुख्यमंत्री उतरले. उपमुख्यमंत्री चढले. जाता जाता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना म्हणाले, ‘कलंडलेलं जहाज दिसतं का बघा आधी.’ उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘ते मी साहेबांशी बोलतो.’

एक हाफ

मुख्यमंत्री बंगल्यावर येऊन जेवायला बसले. त्यांच्या बायकोनं भाजीच्या पातेल्यावरचं झाकण उघडलं आणि ओरडल्या, ‘सखूबाई, अहो, किती तेल घातलंय भाजीत! तवंग केवढा आलाय बघा तेलाचा!’ आणि मुख्यमंत्र्यांनी तटरक्षक दलाच्या त्या अधिकाऱ्याला फोन लावला.. ‘दिसला बरं का मला तवंग!’ त्यावेळी तो अधिकारी भुजबळांना तवंग दाखविण्याचा कसोशीनं प्रयत्न करत होता. घरी गेल्यावर सीएमना तवंग कसा दिसला, ते मात्र त्याला कळलं नाही!

मराठी सिनेमासाठी कायदाच हवा!

म टा च्या सौजन्याने

मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइममध्ये मराठी सिनेमाचे १२२ शो करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कायदा करावा, अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. शनिवारी दिलेल्या दणक्यानंतरही मल्टिप्लेक्स मालक मराठी सिनेमाला दुय्यम दर्जाची वागणूक देणार असतील तर त्यांना पुन्हा दणके देऊ, असा इशारा राज यांनी दिला.

आज (सोमवारी) बोलावलेल्या मराठी सिनेनिर्मात्यांच्या बैठकीत बोलताना राज ठाकरे यांनी सरकारने केलेली तांत्रिक चलाखी उघडकीस आणली. राज्य सरकारने मल्टिप्लेक्समध्ये मराठी सिनेमाचे १२२ शो दाखवावेत असा जीआर काढला पण कायदा केलेला नाही. जीआरला कोर्टात आव्हान देता येते मात्र कायद्याला आव्हान देता येत नाही ; असे राज ठाकरेंनी सांगितले. मल्टिप्लेक्स मालकांनी जीआर असल्यामुळे कोर्टात जाऊन मराठी सिनेमांच्या शोची संख्या १२२ वरुन ४४ वर आणल्याचे राज यांनी स्पष्ट केले.

मराठी सिनेमा कात टाकतोय. अशा वेळी मल्टिप्लेक्समध्ये १२२ शो प्राइम टाइममध्ये झाल्यास मराठी सिनेमाला उर्जितावस्था येईल, असा विश्वास राज ठाकरेंनी व्यक्त केला. त्यांनी प्रत्येक मराठी कुटुंबाला पत्र पाठवून मराठी नाटक-सिनेमा पाहण्याचे आवाहन करणार असल्याची घोषणा केली.

मराठी सिनेसृष्टी उद्या 'राज'दरबारी

म टा च्या सौजन्याने


मुजोर मल्टिप्लेक्स मालकांना 'खळ्ळ आणि खटॅक ' चा दणका दिल्यानंतर , राज ठाकरे यांनी आता मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांची महत्त्वपूर्ण बैठक आज सोमवारी बोलावलीआहे. मराठी चित्रपट निर्मात्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना आखण्यासाठी राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावल्याने निदान थिएटर मालक तरी ' रिळासारखे सरळ ' होतील , अशी अपेक्षा मराठी सिने वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

वारंवार विनंती करूनही मराठी चित्रपट प्रदर्शित न करणा-या मल्टिप्लेक्समध्ये घुसून मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी जोरदार राडा केला. दादर , ठाणे , कांदिवली , वांद्रे भागातील मल्टिप्लेक्सची तोडफोड करण्यात आली. मनसेच्या या आंदोलनावरून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असताना , अनेक मराठी चित्रपट निर्माते , दिग्दर्शक व कलाकारांनी मात्र मनसेच्या कृतीचे जोरदार समर्थन केले आहे.

या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी १६ ऑगस्ट रोजी मनसेच्या वतीने मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांची बैठक बोलावण्यात आली आहे. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक होणार आहे. मराठी चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित व्हावेत तसेच प्राइम टाइममध्ये ते दाखवले जावेत या मुद्यावर व्यापक चर्चा करण्यासाठी उद्याची बैठक बोलावण्यात आल्याचे समजते. राज ठाकरे स्वतः या बैठकीला हजर राहून मराठी चित्रपट निर्मात्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत.

मल्टिप्लेक्सेसमध्ये खळ्ळ-खटॅक!

म टा च्या सौजन्याने


मुजोर मल्टिप्लेक्स मालकांना 'खळ्ळ आणि खटॅक ' चा दणका दिल्यानंतर , राज ठाकरे यांनी आता मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांची महत्त्वपूर्ण बैठक आज सोमवारी बोलावलीआहे. मराठी चित्रपट निर्मात्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना आखण्यासाठी राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावल्याने निदान थिएटर मालक तरी ' रिळासारखे सरळ ' होतील , अशी अपेक्षा मराठी सिने वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

वारंवार विनंती करूनही मराठी चित्रपट प्रदर्शित न करणा-या मल्टिप्लेक्समध्ये घुसून मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी जोरदार राडा केला. दादर , ठाणे , कांदिवली , वांद्रे भागातील मल्टिप्लेक्सची तोडफोड करण्यात आली. मनसेच्या या आंदोलनावरून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत असताना , अनेक मराठी चित्रपट निर्माते , दिग्दर्शक व कलाकारांनी मात्र मनसेच्या कृतीचे जोरदार समर्थन केले आहे.

या पार्श्वभूमीवर उद्या सोमवारी १६ ऑगस्ट रोजी मनसेच्या वतीने मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांची बैठक बोलावण्यात आली आहे. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक होणार आहे. मराठी चित्रपट मल्टीप्लेक्समध्ये प्रदर्शित व्हावेत तसेच प्राइम टाइममध्ये ते दाखवले जावेत या मुद्यावर व्यापक चर्चा करण्यासाठी उद्याची बैठक बोलावण्यात आल्याचे समजते. राज ठाकरे स्वतः या बैठकीला हजर राहून मराठी चित्रपट निर्मात्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत.

Monday, August 9, 2010

मलेरियाबाबत पालिकेची दिशाभूलः राज ठाकरे

म टा च्या सौजन्याने

मलेरियाबाबत मुंबई महापालिका दिशाभूल करीत असून मृतांचे आकडेवारी चुकीची देत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे केला. आरोग्याची जबाबदारीबाबत महापालिका आणि राज्य सरकार एकेमेकांकडे बोटं दाखवित आहेत, त्यामुळे आपणच यात लक्ष घातले पाहीजे, त्यामुळे प्रत्येकाना आजपासून स्वच्छता मोहिम हाती घ्या, असा आदेशही त्यांनी यावेळी मनसे पदाधिका-यांना दिला.

माटुंग्यातील यशवंतराव नाट्यगृहात मनसेतर्फे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे बोलत होते. या वेळी ते म्हणाले, देशभरात पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच मुंबईतही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मुंबईत पावसाळ्यात रोगराईची परिस्थिती अशी झाली आहे. पावसाळा संपायला आला की ही परिस्थिती आणखी बिकट होणार असल्याचे अनेक डॉक्टरांनी मला सांगितले आहे.
मुंबई महापालिका आणि राज्य सरकार एकमेकांकडे बोटं दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. महापालिका मलेरियाने झालेल्या मृत्यूंची आकडेवारी चुकीचे सांगत आहे. केईएममधील आकडेवारीची मी माहिती घेतली तर असे लक्षात आले की, जुलै महिन्यांपर्यंत मलेरियाने ५६ व्यक्तिंना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मलेरियाने मृत्यू झालेल्या माणसाचा वृद्धपकाळाने मृत्यू अशी नोंद करतात, हॉस्पिटलचे खरे रिपोर्ट पुढेच नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
या रोगराईपासून बचावासाठी आपणच रस्त्यावर उतरले पाहीजे, त्यामुळे आजपासूनच स्वच्छता मोहिम हाती घ्या. तसेच नागरिकांना भेटून त्यांनाही रस्त्यावर कचरा टाकू नका याचे आवाहन करा, केवळ फोटोबाजीसाठी स्वच्छता मोहिम हाती घेऊ नका. जनता केवळ फोटोद्वारेच तुमच्या कामाची दखल घेतल नाही. चांगले काम केल्यावरही दखल घेते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मलेरिया मुंबईत, महापौर तिरुपतीत!

जनाची नाही निदान मनाची तर .......

म टा च्या सौजन्याने


अख्या मुंबईत मलेरियाने थैमान घातलेले असताना , महापौर मात्र
आपले नातेवाईक आणि पक्ष-कार्यकर्ते अशा १२०० जणांच्या लवाजम्यासह तिरुपतीला रवाना झाल्या आहेत. महापौर सोमवारी परतणार असल्याचे वृत्त आहे.

मलेरियाच्या विळख्यातून मुंबईची लवकरात लवकर सुटका होऊ दे अशी प्रार्थना आपण तिरुपतीकडे करणार असल्याचे श्रद्धा जाधव यांनी सांगितले. मात्र संपूर्ण शहर मलेरियाने त्रस्त असताना महापौरांनी तिरुपतीला जाणेकितपत योग्य आहे , असा सवाल उभा राहिला आहे. महापौर तिरुपतीच्या वाटेवर असताना शहरात आणखी २१६ जणांना मलेरियाची लागण झाली आहे.

याबरोबरच सरकारी रुग्णालयातल्या मलेरियाग्रस्त रुग्णांची संख्या १ , १४६ इतकी झाली आहे. काल दोघांचा मलेरियाने मृत्यू झाल्याने मलेरियाने मृतांची संख्या १० वर जाऊन पोहचली आहे. मात्र आपला तिरुपतीचा दौरा सुनियोजित होता , दौरा रद्द करणे शक्य नव्हते असं जाधव यांनी सांगितले. मलेरियाला आळा घालण्यासाठी महापालिकेने योग्य उपाययोजना केल्या आहेत , पुढच्या आठवडयापर्यंत मलेरियाच्या रुग्णांमध्ये नक्कीच घट होईल असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे. मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने जारी केलेली आकडेवारी मात्र विरोधाभास दर्शवते आहे.

दरदिवशी सरकारी रुग्णांलयांमध्ये मलेरियाचे सरासरी २०० रुग्ण भरती होत आहेत. यामध्ये शहरातल्या ७० टक्के रुग्णांवर उपचार करणा-या खाजगी रुग्णालयातल्या रुग्णांची माहिती पालिकेकडे उपलब्ध नाही. शहरात झपाटयाने पसरत चाललेल्या मलेरियावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने उच्च आरोग्य अधिका-यांनाशहराच्या आरोग्य खात्याची सूत्रे सोपवली आहेत.

Friday, August 6, 2010

आपल्या दुर्दशेला आपणच जबादार !!!

मुंबई, ठाणे आणि कल्याण सारख्या महानगरांमध्ये सध्या ची अवस्था फार वाईट आहे.

रस्ते खराब आहेत (खड्ड्यात रस्ते कि रस्त्यात खड्डे हे कळायला मार्ग नाही, कल्याण मधील रस्त्यांवर तर होडीतून प्रवास केल्यासारख वाटतं), पद पथाचा पत्ता नाही, गटार भरून वाहत आहेत, गटारांची झाकण मोडकळीस आलेली आहेत, काही ठिकाणी तर ती गायब झाली आहेत, कचरा वेळेवर उचलला जात नाही, कचरा पेटीच्या बाहेर ओसंडून वाहतो आहे, सर्वत्र दुर्गंधी आणि अस्वच्छता बोकाळली आहे.

आपण घरातून बाहेर पडल्यावर हि दृश्य सर्वत्र पाहतो, मग तेथील नगरसेवक / महापालिका अभियंता ह्यांना ह्या गोष्टी दिसत नाही काय? प्रत्येक विभागातील सत्ताधारी / विरोधी पक्षाचे विभागप्रमुख काय झोपा काढत आहेत काय? शहरात स्वच्छता राखणं हि पालिकेची / महानगरपालिकेची जबादारी आहे पण ते ती जबाबदारी पार पाडत नाही असच सध्या चित्र आहे ...

महा पालिका रस्ते दुरुस्त का करीत नाही, गटारांची झाकण का लावत नाही, कचरा नीट का उचलत नाही? ह्या सगळ्या गोष्टी आकलना पलीकडच्या आहेत. सत्ताधारी पक्ष काहीही म्हणो, मुंबई / ठाणे / कल्याणची दुर्दशा लोकां समोर आहे. आम्ही विरोधाला म्हणून विरोध करत नाही तर सत्य त्यांच्या समोर मांडतोय, मग त्याला राजकारणाचा संबंध का लावायचा? हे केवळ शिवसेना द्वेष आहे असं का म्हणायचं?? त्यापेक्षा तुमच्या नगरसेवकांना / विभागप्रमुखांना तुम्ही कामाला लावा ना. उद्या जर का महापालिका / पालिका तुमच्या हातून गेली तर परत तुम्ही आमच्याच नावाने ठणाणा करणार. ह्याला काही अर्थ आहे काय???

माझ्या मते ह्या सर्व दुर्दशेला आपण स्वतः देखील जबादार आहोत. आपण काम न करणाऱ्या नगरसेवकांना निवडून देतो, विभागात अस्वच्छता असेल तर आपण नगरसेवकाला किवां त्या विभागातील पालिका अधिकाऱ्याला कधी जाब विचारात नाही (बऱ्याच वेळेला आपल्या विभागातील पालिका अधिकारी कोण आहे ते देखील आपल्याला माहित नसते), मग परिस्थिती सुधारणार तरी कशी???





Thursday, August 5, 2010

राज यांच्या हस्ते मुंबईची दशा प्रदर्शनाचे उद्घाटन







म टा च्या सौजन्याने


लोणार सरोवराच्या नावाखाली रस्त्यात पडलेल्या मोठा जलमय खड्डा म्हणजे लोणार सरोवर...रस्त्यातील सडलेला भाजीपाला व फुले म्हणजे 'व्हॅली ऑफ फ्लॉव्हर्स'...पावसाचे तुंबलेले पाणी म्हणजेच 'बॅकवॉटर'... मुंबईच्या या दशेचे चित्रदर्शन मांडतानाच त्यांना अत्यंत समर्पक उपमा देणाऱ्या 'मुंबई देशा' या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी केले.

पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर कसे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे, तसेच इतरत्र पडलेल्या घाणीमुळे मुंबई कशी गलिच्छ झाली आहे, हे छायाचित्रांच्या माध्यमातून दाखविणारे प्रदर्शन मनसे आमदार नितीन सरदेसाई तसेच विभागाध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आयोजित केले होते. 'या छायाचित्रांतून मुंबईची दुर्दशा कशी झाले आहे हेच दिसत आहे. छायाचित्र एवढी बोलकी आहेत की मी वेगळे बोलण्याची गरज नाही', असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या प्रदर्शनाची दुसऱ्याशी तुलना करू नका, असेही ते यावेळी म्हणाले.

मुंबईतील बकालपणावर प्रकाश टाकण्यासाठी प्रदर्शनातील छायाचित्रांना आकर्षक 'कॅप्शन' देण्यात आल्या होत्या. मलेरियामुळे हॉस्पिटल्समध्ये पेशंट मोठ्या प्रमाणात भरती झाले असून त्याला 'गुरांचा दवाखाना' असे संबोधण्यात आले आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी पाण्याची डबकी तयार झाली असून त्याला 'महापालिका तरण तलाव योजना' असे म्हटले आहे. 'मलेरिया संवर्धन केंद' या विषयांतर्गत मच्छरची पैदास होणाऱ्या कचराकुंडी, गटारे यांची छायाचित्रे मांडण्यात आली आहेत.

काही खड्ड्यांचे उंचावरून छायाचित्रे काढण्यात आली असून त्याला 'हवाईचित्रण' असे नाव देण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या शेवटी मुंबई महापालिकेच्या इमारतीचे छायाचित्र असून मुंबईमध्ये प्रेक्षणीय स्थळे निर्माण केल्याबद्दल महानगर पालिकेचे जाहीर आभार मानण्यात आले आहेत.

उपहासात्मक भाष्य करणा-या प्रदर्शनातील फोटोंचे एक पुस्तक देखिल तयार करण्यात आले आहे.

दरम्यान, मनसेच्या या उपक्रमावर टीका करताना शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे यांनी दुसरे पुस्तक काढून त्या पुस्तकाला शिवसेना द्वेषा असे नाव द्यावे.

Tuesday, August 3, 2010

वांद्र्यात कोण बिल्डर येतो बघतो - राज

म टा च्या सौजन्याने


अनधिकृत झोपड्यांमध्ये राहणा -या परप्रांतियांना एसआरएयोजनेखाली अधिकृत घरे बांधूनदिली जातात . परंतु वर्षानुवर्षेसरकारी सेवा बजावणा - याकर्मचा - यांना मात्र वा - यावरसोडून दिले जाते , अशा शब्दांतनाराजी व्यक्त करतानाचवांद्र्याच्या सरकारी वसाहतीचाभूखंड म्हणे काही बिल्डरना देऊनटाकला आहे . त्याठिकाणी कोणबिल्डर येतो तेच मी बघतो , असा दम मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भरला आहे .

वांद्रे येथील सरकारी वसाहतीच्या पुनर्विकासासाठीचे काम कोणतीही निविदा मागवता डी . बी . रिअल्टर्स , आकृती आणि काकडे डेव्हलपर्स या तिघा बिल्डरनादेण्याचा निर्णय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सरकारने घेतला आहे . सरकारीकर्मचा - यांना याठिकाणी हक्काची घरे देण्याची मागणी धुडकावण्यात आल्याने यावसाहतीत राहणा - या सरकारी कर्मचा - यांचा या पुनर्विकासाला विरोध आहे . आतामनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतःच सरकारी कर्मचा - यांना पाठिंबा दिल्याने ,सरकार विरूद्ध राज असा संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत .

शिवडी मतदारसंघातील मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शनकरताना राज यांनी सरकारवर जोरदार टीका केली . सरकारी कर्मचारी इमानेइतबारेसरकारी सेवा करतात ; पण निवृत्त झाल्यावर हेच सरकार त्यांना घराबाहेर काढते ,परंतु अनधिकृत झोपडीवाल्यांना " एसआरए ' च्या योजनेत पक्की घरे देते . वांद्रे येथीलसरकारी कर्मचा - यांनी स्वतःहून तेथे घरे विकत घेण्याची तयारी दर्शविली असतानाचसरकारला त्यांची फिकीर नाही . कारण राज्यकर्ते मराठी पुढारी बिल्डरांच्या मागेठामपणे उभे राहत आहेत . वांद्र्यात कोण बिल्डर येतो तेच मी आता पाहतो ... असासज्जड इशारा राज ठाकरे यांनी दिला .

महाराष्ट्रात परप्रांतियांचे विशेषतः उत्तर भारतीयांचे लोंढे वाढत असल्याबाबत त्यांनीपुन्हा एकदा चिंता व्यक्त केली . उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवणारे पं . जवाहरलालनेहरू १५ वर्षे भारताचे पंतप्रधान होते . त्यानंतर इंदिरा गांधीही १५ वर्षे पंतप्रधानहोत्या . संजय गांधी , सोनिया गांधी , राहुल गांधी हे सगळेच उत्तर प्रदेशातून निवडूनआले . मग तरीही एवढ्या वर्षांत उत्तर प्रदेशचे भले का झाले नाही ? तेथील लोकआजही महाराष्ट्रात का येतात ? असा सवाल त्यांनी भाषणात केला .

शिवडी मतदारसंघातील मनसेचे आमदार बाळा नांदगावकर यांचेही यावेळी भाषणझाले . आजारपणामुळे गेले तीन महिने तुम्हाला वेळ देऊ शकलो नाही , त्याबद्दलत्यांनी दिलगिरी व्यक्त केली . यापुढे मी तुमच्यासाठी वेळ देणार असून , तुमच्यामनातील किंतु - परंतु काढून टाका , असे आवाहन नांदगावकर यांनी केले .