Thursday, June 24, 2010

एस एस सी च्या विद्यार्थ्यांनी काय करायचे???

नेहमी प्रमाणे राज्य सरकार न्याय संस्थेपुढे उतानी पडली आणि ती पडणारच कारण त्यांनी कुठलाही जरी तोडगा आणला तरी तो समानतेच्या विरुद्धच राहणार आणि कोर्ट राज्य सरकारला चपराक मारणारच.

खरं म्हणजे सरकारने आय सी एस इ किवा सी बी एस इ बोर्ड आणि एस एस सी बोर्ड ह्यांच्या परीक्षे पद्धतीत मोठा फरक आहे तो न्याय संस्थे पुढे पुराव्यासकट ठेवला पाहिजे अन्यथा नेहमीच तोंडघशी पडावं लागेल. ह्या दोन बोर्डाच्या परीक्षा पद्धतीत फरक असल्या कारणाने दोघांना समान न्याय कसा लावणार? ह्या मध्ये मात्र गोची होते आहे एस एस सी च्या विद्यार्थ्यांची, चांगले गुण मिळवून देखील त्यांना चांगल्या कॉलेजेस पासून वंचित राहावं लागतय.

काल आय सी एस इ किवा सी बी एस इ बोर्डाच्या पालकांचा आनंद टी वी वर बघितला आणि वाईट वाटलं. सोळा लाख विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा निव्वळ काही हजार विद्यार्थी करत आहेत आणि आपण / आपले राज्य सरकार ह्या विद्यार्थ्यांसाठी काहीही करू शकत नाही हि कल्पनाच सहन होत नाही , थू आमच्या जिंदगानी वर ......

आपला विनोद

Friday, June 18, 2010

रेल्वे भरतीतील गैरव्यवहार सीबीआयकडून उघड

आता लालूला कळेल कि बिहारच्या मुलांची आय क़्यु महाराष्ट्राच्या मुलांपेक्षा जास्त का आहे ...... हे साले त्यांचे एजंट बसले आहेत ना त्यांना कामावर चीटकवायला ........

खालील माहिती सकाळ ह्या वृत्तपत्राच्या सौजन्याने .....

आपला विनोद

मुंबई - रेल्वे भरती मंडळाच्या अध्यक्षांच्या मुलासह आठ जणांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी पैशांसाठी प्रश्‍नपत्रिका फोडल्याप्रकरणी अटक केली. या कारवाईमुळे रेल्वे भरती प्रक्रियेतील कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आणल्याचा दावा सीबीआयने केला.

मुंबईतील रेल्वे भरती मंडळाचे अध्यक्ष एस. एम. शर्मा यांचा मुलगा विवेक भारद्वाज शर्मा याचा या गैरव्यवहारात समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सीबीआयने मुंबई, बंगळूर, रायपूर, कोलकाता आणि हैदराबादमध्ये एकाचवेळी छापे टाकले.

असिस्टंट लोको पायलट आणि सहायक स्थानक अधिकारी या पदांच्या परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका कोट्यवधी रुपयांना विकण्यात आल्याचे सीबीआयचे प्रवक्ते हर्ष भाल यांनी सांगितले. निवडीसाठी प्रत्येक उमेदवाराने साडे तीन लाख रुपये दिले होते. परीक्षेच्या एक दिवस अगोदर संबंधित विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले.

Tuesday, June 15, 2010

प्रताप आसबेंचा म टा मधील लेख

सादर करीत आहे प्रताप आसबेंचा म टा मधील लेख

आपला विनोद



बेरजेचे राजकारण अपरिहार्य?


विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभव शिवसेनेला चांगलाच झांेबलेला दिसतो. कुठलाही पराभव तसा जिव्हारीच लागतो. त्यामुळे साहजिकच अगदी हातघाईला आल्याप्रमाणे त्यांची वक्तव्ये चालू आहेत. राजकारण हे बुद्धी पणाला लावून करावे लागते. त्यात पराभव वाट्याला येतो तेव्हा एकतर अकलेचे दिवाळे निघालेले असते किंवा त्यांच्याच निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने तोेंडावर पाडलेले असते. अशावेळी लोक त्या पक्षातच दम नाही, असा निष्कर्ष काढून मोकळे होतात. राजकीय वाटचालीत पक्षाच्या पौरुषत्वाविषयीच निर्माण झालेले प्रश्न महागात पडतात. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुका जेव्हा अटीतटीच्या होतात, तेव्हा राजकारणात बऱ्याचवेळेला उलथापालथ झालेली आहे.

तशी ती आताही झाली असती; पण या निवडणुकीत कमीअधिक झाले तर आपले मुख्यमंत्रीपदच पणाला लागेल, याची पुरती जाणीव अशोक चव्हाणांना होती. राष्ट्रवादीच काय पण काँग्रेसवालेही त्यांचा गेम करायला टपले होते. त्यामुळे अनेक नेते परदेशवाऱ्या करीत असताना सलग १५ दिवस त्यांनी सगळे लक्ष निवडणुकांवर केंदित केेले होते. अधिकृतपणे तीनच उमेदवार उभे केले. चौथ्याला अपक्ष म्हणून पाठिंबा दिला. हा सावधपणा लक्षात घेतला तर त्यांनी निवडणुका किती गांभीर्याने घेतल्या होत्या हे लक्षात येते. राष्ट्रवादीवाले धूर्त, चपळ आणि लवचिकही आहेत. त्यांच्या निवडणुकीची सगळी सूत्रे छगन भुजबळ आणि अजित पवार हाताळत होते. ते अगदी इरेला पडल्याप्रमाणे डावपेच टाकत होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या खेळीचा फटका आपल्याला बसू नये, याचीही काळजी मुख्यमंत्री घेत होते. अशाप्रकारच्या सत्त्वपरीक्षेला मुख्यमंत्री नवखे होते; पण त्यांनीही एकहाती प्रयत्न करून या निमित्ताने आपले स्थान बळकट करून घेतले, हे विशेष.

खरे म्हणजे, या निवडणुकीत सगळ्यांकडेच कमी मते होती. त्यामुळेच या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असा काँग्रेससह युतीचा प्रयत्न होता. पण राष्ट्रवादीने त्या तशा होऊ दिल्या नाहीत. अशावेळी युतीने चार जागा लढविणे जोखमीचे होते. सत्ताधाऱ्यांना सत्तेचा फायदा असतो. ते बाहेरून मते आणू शकतात. शिवसेना - भारतीय जनता पक्षाकडे अपक्षांसह प्रत्येकी ४७ मते होती. सत्ताधाऱ्यांप्रमाणेच भाजपने सगळे मार्ग अवलंबून बाहेरून तीन-चार मते आणली. शिवसेनेनेही तशीच मते आणली असती तर प्रश्न नव्हता. पण त्यांना ते जमले नाही. निवडणुका केवळ पैशाच्या जोरावर कधीच जिंकता येत नाहीत. त्यासाठी राजकीय कसब आणि विश्वासार्हताही तितकीच महत्त्वाची असते. शिवसेनेकडे रग्गड पैसे आहेत. पैसे नव्हते अशातला भाग नाही. तरीही सेनेचा का पराभव झाला, याचा विचार त्यांच्या नेत्यांनी केला पाहिजे. तसे पाहता दहा जागांकरिता केवळ ११ उमेदवार असल्याने व त्यातही गोपीनाथ मुंडे हे आपले सगळे कसब पणाला लावणार, हे उघड असल्याने सेनेने दुसरा उमेदवार उभे न करणे शहाणपणाचे होते. आणि अशाही स्थितीत त्यांना दुसरा उमेदवार निवडून आणायचा होता तर विजयाच्या दिशेने रणनीती आखणे आवश्यक होते. पण सेनेने या दोन्हीपैकी काहीच केले नाही. तरीही विजय गृहीत धरला, ही आश्वर्याची बाब होती; कारण निवडणूक सुरू झाल्यापासूनच सेनेचा उमेदवार पडेल, असा सार्वत्रिक समज होता आणि तो अनाठायी नव्हता.

तो समज दूर करण्यासाठी जी राजकीय पावले उचलायला हवी होती, तीही उचलली गेली नाहीत. या विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे १३ आमदार असून त्यांनी सगळ्यांचीच अडचण केली, ही वस्तुस्थिती आहे. मनसे ही शिवसेनेच्याच वैचारिक मुशीतून निर्माण झालेली आहे. ही युतीची आणि विशेषत: शिवसेनेची जमेची बाजू होती. ही तेरा मते शिवसेनेने आपल्या बाजूने वळविली असती तर काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवाराचा पराभव निश्वित होता. इतकेच नव्हे तर राज्यसभेतील सहाव्या जागेसाठीही कडवी लढत देता आली असती. पण त्यासाठी युतीने आणि विशेषत: शिवसेनेने बेरजेचे राजकारण करायला हवे होते. राजकारणात देवाणघेवाण करावी लागते, ती केवळ पैशाची नसते. एखादी परिषदेची किंवा राज्यसभेची जागा दिली असती किंवा भविष्यात देण्याचे आश्वासन दिले असते तरी समीकरण बदलले असते. वेगळे राजकारण घडविता आले असते. तसे पाहता काँग्रेसवाल्यांना ही निवडणूक अवघड होती. पण त्यांनी लवचिक भूमिका घेऊन शिवसेनेची मनधरणी केली.

याउलट शिवसेना ताठर होती. मनसेने बदलापूरनंतरही एक-दोन सकारात्मक संकेत दिले होते. त्याची दखल घेतली गेली नाही. मनसेला स्वत:हून पाठिंबा द्यायचा असेल तर द्यावा नाहीतर ते काँग्रेसला विकले गेले, हा प्रचार करायचा असा कुठेतरी शिवसेनेचा दृष्टिकोन असावा. शिवसेनेची आणखी एक समस्या आहे ती म्हणजे ते मनसेचे अस्तित्वच मान्य करायला तयार नाहीत. एकाच विचाराचे दोन पक्ष असू शकतात ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही. त्यामुळे आपला सवता सुभा राखण्यासाठी दुसऱ्याला संपविणे, हेच शिवसेनेचे एकमेव उद्दिष्ट बनले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकाच वैचारिक परंपरेतील पक्ष आहेत. दोघेही परस्परांना पाण्यात पाहतात. संधी मिळेल तिथे कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. दोघांनाही एकमेकांना संपवून आपली वैचारिक मक्तेदारी स्थापन करायची आहे. पण तरीही ते एकत्र आहेत. परस्परांच्या अस्तित्वाचे वास्तव त्यांनी मान्य केले आहे. कारण एकवेळ वैचारिक विरोधकांवर मात करणे सोपे आहे; पण वैचारिक सार्धम्य असलेल्यांवर मात करणे अवघड असते. तो संघर्ष कमालीचा किचकट आणि प्रदीर्घ असतो. रस्त्यावर राडेबाजी करून याचा फैसला करता येत नाही. यावर सत्तेसाठी काँग्रेसवाले काहीही तडजोडी करतात, असा युक्तिवाद केला जातो. पण तो निरर्थक आहे; कारण ज्यांना सत्तेसाठीही तडजोडी करता येत नाहीत त्यांच्याकडे लोक तरी कशाला जातील ?

निवडणुकांचे निकाल लागताच शिवसेनेने मनसेवर टीकेची झोड उठविली. पराभव जिव्हारी लागल्याने भाषा धारदार आहे. उत्तर प्रत्युत्तर तर शेंबडापासून शेणापर्यंत गेले. थैल्यांचे हिशेब चुकते झाले. तेव्हा जुन्या शिवसैनिकांनी राज-उद्धवच्या खांद्यावर हात ठेवणाऱ्या बाळासाहेबांचे होडिर्ंग लावून 'हे चित्र कधी दिसेल' असा भाबडा सवाल केला आहे. भाबडेपणाने का होईना पण त्यांनी वास्तव मान्य केले आहे. कधी ना कधी त्यांना एकत्र यावे लागणार, हे त्यांना पटले आहे. अर्थात शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरही अशीच टीका केली होती. भाषा कडवी होती. पण मराठी माणसांतील एक घटक ठामपणाने त्यांच्या मागे असल्याने मनसेचे राजकीय अस्तित्व कायम आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत मनसेने काँगेस आघाडीला मतदान केल्याने मराठी नेटकरांनी प्रेमभंग झाल्याप्रमाणे नेटवर तीक्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. याचा अर्थ मनसेचा सगळा पाठिंबा ओसरून जाईल, असे नव्हे. कारण शिवसेनेनेही यापूवीर् अनेकदा काँग्रेसच्या पथ्यावर पडणारे राजकारण केलेले आहे. त्यामुळे उगाच तोंडातली वाफ दवडून कटुता वाढवणे शहाणपणाचे नाही. कधी ना कधी त्यांना एकत्र यावे लागणार आहे. अगदी कायमच विरोधात बसायचे असेल तर ही चैन परवडेल. पण त्यातून पक्षाला मुठीतील वाळूसारखी गळती लागू शकते. त्यामुळे शिवसेनेला थोडेसे लवचिक होऊन बेरजेचे राजकारण करावे लागेल. कारण ते अपरिहार्य आहे.

Monday, June 14, 2010

राज साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज १४ जुन, राज साहेबांचा वाढदिवस. त्या निमित्ताने "मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा" तर्फे राज साहेबांना हार्दिक शुभेच्छा.

आपला

विनोद

Friday, June 11, 2010

आम्ही आमचा पक्ष चालवायचा कि त्यांचा?

कालच विधान परिषदेची निवडणूक झाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस च्या पारड्यात आपली मते टाकली म्हणून शिवसेनेचे मुखपत्र सामना ने (म्हणजे संजय राऊतांनी) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जेव्हा अंबरनाथ नगरपरिषदेत मनसे ने शिवसेनेला साथ दिली तेव्हा पत्रकारांनी उद्धव साहेबाना दिलमजाई होणार कि नाही हा प्रश्न विचारला होता त्यावेळेस उद्धव साहेब म्हणाले कि "मला ह्या गाळात उतरायचे नाही". जर तुमचे कार्याध्यक्ष अश्या प्रकारचे विधान करत असतील तर मनसे शिवसेनेला साथ देईल अशी अपेक्षा तरी का करता?

एक मत प्रवाह असाही होता कि मनसे ने तटस्थ राहायला पाहिजे होते, पण तटस्थ राहून काय उपयोग त्यानी पक्षाला काहीही फायदा झाला नसता व कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी चे आमदार तर निवडून गेलेच असते. त्यापेक्षा ह्या मत दानामुळे जर पक्षाला फायदा होत असेल तर मतदान करणे गरजेच होतं. आम्ही आमचा पक्ष चालवायचा कि त्यांचा? तेव्हा शिवसेनेने मनसे ला गृहीत धरू नये हेच उत्तम.

आपला

विनोद


Thursday, June 10, 2010

विबग्योर शाळेची मुजोरी

मित्रानो,

कालच स्टार माझा वर वीबग्योर शाळे ची बातमी बघितली. ह्या शाळेने पालकांनी फी वाढीबद्दल आंदोलन केले म्हणून एका मुलीला काहीही कारण न देता शाळेतून काढून टाकले. हे म्हणजे अतीच झाले आणि ही तर सरळ सरळ दादागिरी आहे. काल त्या शाळेची कोणी राठोड म्हणून प्रवक्ता आहेत, त्या सांगत होत्या की महाराष्ट्र शासनाचे कोणतेही नियम आम्हाला लागू होत नाही कारण वीबग्योर हे प्रायवेट स्कूल आहे. हा सरळ सरळ अन्याय आहे आणि आपण ह्या अन्याय विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे.

खाली वीबग्योर शाळेचा पत्ता आणि इमेल आय डी दिला आहे .... मी आजच त्यांना इमेल पाठवत आहे कि त्यांनी अधिश्री ह्या पाल्या वर अन्याय केलं आहे आणि तिला परत शाळेत घेतलं पाहिजे

ही बातमी तुम्ही खालील लिंक वर देखील वाचू शकता


VIBGYOR High International School
Motilal Nagar-1
Srirang Sabde Marg
Off. Link Road, Goregaon (W)
Mumbai – 400 104
Phone: (022)-39577070
Email:
helpdesk.mumbai10@vibgyorhigh.com

विनोद


विबग्योर शाळेची मुजोरी

फी वाढी विरोधात बोलाल तर खबरदार, तुमच्या पाल्याला शाळेतुन सरळ काढुन टाकण्यात येईल, असा पवित्रा घेतलाय मुंबईतल्या एका खाजगी विबग्योर नावाच्या शाळेनं.

अधीश्री गोपालक्रिश्नन असं या मुलीचं नाव आहे, शाळा सुरु व्हायच्या फक्त १ दिवस आधी तिला शाळेनं पत्र पाठवुन तिला शाळेतुन काढून टाकण्यात आलंय असं कळवलं. आता तिचे आईवडील सरकार दरबारी जाऊन तिला न्याय मिळवुन देण्याची मागणी करतायत.


अधीश्रीने मुख्यन्याधीशांकडे दाद मागितली

निरागस अधीश्री आपल्या आईवडीलांबरोबर सरकार दरबारी खेटे घालतेय आपल्याल न्याय मागण्यासाठी. आज तर ती सरळ मुख्य न्यायाधीशांना भेटायला सरळ मुंबई उच्च न्यायालयात गेली, तिनं न्यायाची मागणी करणार पत्र दिलं. चिफ जस्टीस तर भेटले नाहीत पण ते पत्र त्यांच्यापर्यंत पोहोचतं केलं जाईल आणि अधीश्री न्याय मिळेल असं तिला वाटतंय.adhishree vibgour.jpg

काय कारण असेल अधीश्रीला शाळेतून काढून टाकण्याचं?
अधीश्री कुठलीही चुक नसताना तिच्या शाळेनं सरळ तिला शाळेतुन काढून टाकलं. तेही तिचं ऍडमिशन झालं असताना, तिच्याकडुन शाळेनं ३३ हजार रुपये इतकी फी घेतली आहे. शाळेनं तिला २०१०-२०११ या शैक्षणिक वर्षासाठी पुस्तक दिली असताना. अधीश्रीच्या आईनं फीवाढीविरोधात शाळेविरुद्ध आंदोलनं केलं होतं.

शाळेनं ही कारणं दिलेली ही वागणूक योग्य आहे का?

फीवाढी विरोधात अधीश्रीच्या आईबरोबर अनेक पालकांनीही फीवाढीविराधात आंदोलन केलं होत आणि कोर्टात याचिकाही दाखल केली होती. पण याचा फटका फक्त अधीश्रीलाच का? अशी विचारणा करणाऱ्या पालकांना मात्र तिला शाळेत !ऍडमिशन कोणत्याही अटीवर दिलं जाणार नाही असंच सांगितलं जातंय.

राज्य सरकार काहीच करू शकत नाही?

अगदी महाराष्ट्र सरकारनं हस्तक्षेप केला तरी इतकंच नाही तर शाळेनं अधीश्रीला याआधीच काढुन टाकलं नाही यासाठी अधीश्रीच्या पालकांनी शाळेचे आभार मानायला हवे असही विबग्योरच्या प्रवक्त्या हरप्रितकौर राठोड यांनी सांगितलंय.

मुजोर शाळा
अर्थ असाच होतो की कुणाचाही शिक्षणाचा अधिकार काढुन घेण्याइतकी ही शाळा मुजोर आहे.. जिथं शासन मुलींना शिक्षण मिळावं यासाठी नवनवीन कायदे करतंय आणि इथे ही शाळा प्रशासन मात्र आपल्याला हे नियम लागु करू शकत नाहीत असा उद्धटपणा दाखवतेय.







Wednesday, June 2, 2010

'अप्सरा' अभिनेत्रींवर मुख्यमंत्र्यांची कृपा

वा अशोकराव, तुमच्या कडून हीच अपेक्षा होती .......

खालील लेख म टा च्या सौजन्याने .........

विनोद

वर्षानुवर्षे रसिकांचे मनोरंजन करून आयुष्याच्या संध्याकाळी हलाखीचे जीवन जगणारी अनेक वयोवृद्ध कलाकारमंडळी ' कुणी घर देता का घर... ' असा टाहो सरकारदरबारी फोडत असतात... परंतु त्यांचे गा-हाणे ' सरकार 'च्या कानीच पडत नाही... याउलट अवघ्या काही चित्रपटात कामे करून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या दोघा 'अप्सरां ' वर मात्र मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची खाशी मर्जी बसलेली दिसते. म्हणूनच की काय, या दोघींकडे आधीच घरे असताना पुन्हा ' म्हाडा ' चे आलिशान फ्लॅट देऊन मुख्यमंत्र्यांनी आपली मेहेरनजर त्यांच्यावर फिरवली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून १६ कलावंतांना म्हाडाची घरे देण्याचा निर्णय नुकताच अशोक चव्हाण यांनी घेतला. मात्र हा निर्णय घेताना मराठी सिनेसृष्टीतील दोघा अभिनेत्रींवर त्यांनी केलेली कृपा हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. नटरंग सिनेमातून फेमस झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि रेशम टिपणीस यांना यापूर्वीच म्हाडाची घरे देण्यात आली असताना, पुन्हा त्यांच्यावरच कृपादृष्टी दाखवण्याचे कारण काय, असा सवाल केला जात आहे.

दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कुटुंबियांना आधी मुख्यमंत्री कोट्यातून वर्सोवा येथील ९५३ चौ. फूटाचा २ बीएचके फ्लॅट देण्यात येणार होता. मात्र फुले कुटुंबियांना फ्लॅट नको. आमच्याऐवजी अभिनेत्री स्मिता शेवाळे हिला तो द्यावा, अशी विनंती फुले यांच्या कन्या गार्गी फुले-थत्ते यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. परंतु ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी तो फ्लॅट देण्यासाठी ' नटरंग ' ची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिची निवड केली. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी झालेल्या म्हाडाच्या लॉटरीमध्ये कलावंत कोट्यातून सोनाली कुलकर्णीला सहकार नगर, चेंबूर येथील म्हाडाचे घर वितरीत करण्यात आले आहे. आधीच मुंबईत घर असल्यास म्हाडाचे घर देता येत नाही, असा नियम आहे. परंतु म्हाडाचेच घर घेतले असताना, सोनाली कुलकर्णीला पुन्हा वर्सोव्याचा म्हाडाचा फ्लॅट देण्याचा निर्णय मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आहे. म्हाडाच्या दरानुसार या फ्लॅटची किंमत ४२ लाख रूपये असली तरी बाजारभावानुसार ती सव्वा कोटी रूपयांच्या घरात पोहोचते.

नृत्यासाठी प्रसिद्ध असलेली आणखी एक अभिनेत्री रेशम टिपणीस-सेठ हिच्यावरही मुख्यमंत्र्यांनी असाच कृपादृष्टीचा वर्षा व केला आहे. २००४ साली रेशम सेठ या नावाने तिला यापूर्वीच बिंबीसार नगर, गोरेगाव येथील २३ / सी इमारतीमध्ये ७०६ क्रमांकाचा फ्लॅट देण्यात आला होता. परंतु आता नवरा संजीव सेठ याच्याशी आपला घटस्फोट झाला आहे. घटस्फोट देताना झालेल्या तडजोडीनुसार, ते घर संजीवला देण्यात आले आहे. सध्या मुंबईत माझ्याकडे राहते घर नाही, असा युक्तिवाद रेशम टिपणीस हिने केला आहे. नियमानुसार, म्हाडाचे घर घेताना, यापूर्वी आपण म्हाडाच्या योजनेचा कधीही फायदा घेतलेला नाही, असे शपथपत्र द्यावे लागते. शिवाय किमान पाच वर्षे मिळालेले घर इतरांच्या नावे हस्तांतरीत करता येत नाही वा विकताही येत नाही.